Posts

Showing posts from October, 2017

“एकता दौड” मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

Image
पालकमंत्र्यांनी दिली एकता दिनाची शपथ यवतमाळ , दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय संकल्प दिनाचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज करण्यात आले. या दोन्ही दिवसानिमित्त समता मैदान येथून “ एकता दौड ” काढण्यात आली. यावेळी दौडमध्ये सहभागी विद्यार्थी आणि  नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. पालकमंत्री मदन येरावार यांनी मशाल व हिरवी झेंडी दाखवून एकता दौडचा शुभारंभ केला. तत्पूर्वी त्यांनी उपस्थितांना एकता दिनाची शपथ दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, पोलिस उपअधिक्षक (गृह) सेवानंद तामगाडगे, तहसीलदार सचिन शेजाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी पी.व्ही. जगताप, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये, राजू डांगे आदी उपस्थित होते. सदर एकता दौड समता मैदान येथून तिरंगा चौक, पाचकंदील चौक, शहर पोलिस स्टेशन, बस स्टँड, एलआयसी चौक मार्गे गेल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे स

वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

Image
यवतमाळ , दि. 31 : देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सरदार पटेल आणि आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, संदीप महाजन, नियोजन अधिकारी राठोड, राष्ट्रीय सुचना केंद्राचे (एनआयसी) राजेश देवते उपस्थित होते. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून पाळण्यात येते. सरदार पटेल यांच्यामुळे आपला देश अखंड आणि वेगळ्या स्वरुपात जगासमोर आला. त्यांच्या कार्यशैलीतून नेहमी एकात्मतेचा संदेश देण्यात आला. आज ही एकता व अखंडता अबाधित राखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तर इंदिरा गांधी यांनी देशाला एक कणखर नेतृत्व दिले, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्याचे सिंचन वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवा - पालकमंत्री मदन येरावार

Image
Ø पालकमंत्र्यांनी घेतली विविध विषयांबाबत आढावा बैठक यवतमाळ , दि. 31 : सिंचन हा जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. जिल्ह्यात 9 लक्ष 10 हजार हेक्टर क्षेत्र विविध पिकांच्या लागवडीखाली आहे. सिंचनामुळे मुलभुत विकास होणार असल्यामुळे जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवा, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.   जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निम्न पैनगंगाचे कार्यकारी अभियंता बी.पी.चाटे, एस.डी. कुंभारे, श्रीकांत उमप, रा.की. भरणे उपस्थित होते. बेंबळा व इतर प्रकल्पाच्या पुनर्वसनाचा आढावा घेतांना पालकमंत्री येरावार म्हणाले, जिल्ह्यातील सिंचनासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधीची कमतरता भासणार नाही. सिंचन क्षमता वाढविण्यासाठी गतीने काम होणे गरजेचे आहे. त्यामुळे उर्वरीत पाटस-यांची कामे त्वरीत पूर्ण करा. जिल्ह्यातील संपूर्ण पाणी अडविणे महत्वाचे आहे. जमीन अधिग्रहण टाळण्यासाठी पाईपलाईनद्वारे कामे सुरु आहे. पुनर्

पाणी टंचाई निर्मुलनासाठी योग्य नियोजन करा - केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर

Image
Ø जिल्हा विकास व सनियंत्रण समितीची बैठक यवतमाळ , दि. 31 : यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतींनी आराखडे तयार करून तात्काळ सादर करावे. तसेच पाणी टंचाई निर्मुलनासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशा सुचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे जिल्हा विकास व सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री मदन येरावार, आमदार डॉ. अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल उपस्थित होते. पाणी टंचाईचा सर्व्हे करून नळयोजनेचे प्रस्ताव त्‍वरीत पाठवावे, असे सांगून केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर म्हणाले, भारत निर्माण योजना, मुख्यमंत्री पेयजल योजनाची कामे लवकरात लवकर करावी. पाणी पुरवठा संदर्भातील सर्व रखडलेली कामे पुढील तीन महिन्यात पूर्ण झाली प

सहकाराच्या माध्यमातून शेवटच्या माणसांपर्यंत पोहचा - पालकमंत्री मदन येरावार

Image
Ø पं. दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी निमित्त सहकार परिषद यवतमाळ , दि. 29 : सहकाराच्या क्षेत्रात पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचे योगदान मोठे आहे. हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यांनी सांगितलेला अंत्योदयाचा विचार घेऊन सहकाराच्या माध्यमातून शेवटच्या माणसांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील श्रोतगृह सभागृहात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख मार्गदर्शक व उद्घाटक म्हणून सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर सरेगावकर, सहकारी बँकेचे संचालक नितीन खर्चे, सहकार भारतीचे अध्यक्ष अमित भिसे, सुदर्शन भालेराव, राजू जाधव, उपनिबंधक अर्चना माळवे आदी उपस्थित होते. देशाला सहकार क्षेत्राची ओळख महाराष्ट्राने करून दिली, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, “ बिना सहकार, नाही उध्दार ” ऐवजी आता “ बिना संस्कार…नाही सहकार ” असा विचार करण्याची गरज आहे. पंडीत दिनदयाल उपाध्याय यांनी सांगितलेल्या विचारावर मार्गक्रमण

कापूस, सोयाबीन खरेदी केंद्र

Image
जिल्हाधिका-यांनी घेतली आढावा बैठक यवतमाळ , दि. 23 : कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्रासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन, कापूस उत्पादन पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक सी.पी.गोस्वामी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी.एन. मगरे उपस्थित होते. जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करा. कोणताही शेतकरी नोंदणी पासून वंचित राहता कामा नये. तातडीने सर्वांनी नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. याबाबत शेतक-यांना विविध माध्यमातून जनजागृतीद्वारे माहिती द्या. शासनाच्या मागदर्शक सुचनांचे पालन करून नोंदणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करा, अशा सूचना केल्या. यावेळी त्यांनी सीसीआय आणि कॉटन फेडरेशनचे किती खरेदी केंद्र आहेत. तसेच सोयाबीनचे खरेदी किती केंद्रावर केली जाते. आतापर्यंत जिल्ह्यात किती शेतक-यांची नोंदणी झाली आदी बाबींची माहिती घेतली. जिल्ह्यात सीसीआयचे राळेगाव, खैरी, माळवी, मारेगाव, मुकुटबन, पांढरकवडा, शिंदोला,
Image
अनधिकृत किटकनाशक विकणाऱ्यांवर कडक कारवाई करा -          मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश Ø कर्जमाफी, कापूस-सोयाबीन खरेदी केंद्र, वैद्यकीय विभागाचा घेतला आढावा Ø वैद्यकीय महाविद्यालयात विषबाधित रुग्णांची विचारपूस यवतमाळ , दि. 22 : किटकनाशक फवारणीतून विषबाधेने शेतकऱ्यांचे झालेले मृत्यू अतिशय गंभीर बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आणि विशेष चौकशी पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नफा कमाविण्यासाठी शेतकरी, शेतमजूरांचे जीव घेणाऱ्यांना राज्य शासन योग्य धडा शिकवेल. यात कोणतीही हयगय केली जाणार नाही. त्यामुळे विषबाधेसाठी जबाबदार असलेले अनधिकृत बियाणे, किटकनाशकांची विक्री करणाऱ्यांवर यंत्रणेने कडक कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात फवारणी विषबाधा संदर्भात आज (दि. 22) मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला पालकमंत्री मदन येरावार, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार डॉ. अशोक उईके, राजेंद्र नजरधने, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी

शेतक-यांना सक्षमपणे उभे करण्यासाठी कर्जमाफी - पालकमंत्री मदन येरावार

Image
Ø जिल्ह्यातील 29 शेतक-यांना कर्जमाफीच्या प्रमाणपत्राचे वाटप यवतमाळ , दि. 18 : जून महिन्यात राज्य शासनाने केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणजे कर्जमाफीची घोषणा दिवाळीपूर्वी प्रत्यक्षात अंमलात आणली. शासनाने दिलेला शब्द पाळला असून पारदर्शकपणे आणि ऑनलाईन पध्दतीने केलेली ही ऐतिहासिक कर्जमाफी आहे. हे सरकार शेतक-यांच्या विकासासाठी कटिबध्द आहे. अडचणीतील शेतक-यांना सक्षमपणे उभे करण्यासाठी ही कर्जमाफी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे जिल्ह्यातील शेतक-यांना कर्जमाफी अंतर्गत कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रम आणि पात्र कुटुंबाचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. मंचावर वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, खासदार भावना गवळी, आमदार सर्वश्री डॉ. अशोक उईके, राजेंद्र नजरधणे, संजीवकुमार रेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जिल्हा मध्यवर्ती सहक

सुरक्षा रक्षक किट वापरूनच फवारणी करा - पालकमंत्री मदन येरावार

Image
Ø विषबाधित शेतक-यांना पालकमंत्र्यांकडून प्रत्येकी 65 धान्याचे वाटप यवतमाळ , दि. 17 : किटकनाशकाच्या फवारणीमुळे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूरांना विषबाधा झाली आहे. अळींचा प्रादुर्भाव, नैसर्गिक कारणे, दोन-तीन किटकनाशकांचे मिश्रण ही कारणे तर आहेच. मात्र थोडी काळजी घेतली की आपण आपला बचाव नक्कीच करू शकतो. त्यामुळे आता फवारणीसाठी सुरक्षा रक्षक किट वापरूनच फवारणी करा, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. यवतमाळ येथील तहसील कार्यालयात फवारणीमुळे बाधित शेतक-यांना धान्य व सुरक्षा रक्षक किटचे वाटप करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर तहसीलदार सचिन शेजाळ, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, पं.दे.कृ.वि. सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार, डॉ. सी.यू. पाटील, तालुका आरोग्य अधिकारी गुजर, संजय शिंदे उपस्थित होते. गत दोन-तीन महिन्यांपासून किटकनाशक फवारणी हा विषय जिल्ह्यात गंभीर झाला आहे, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, विषबाधा झालेल्या जवळपास 850 रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले आहे. संपूर्ण शासक

दिव्यांग व्यक्तिंसाठी मन संवेनदशील असावे - पालकमंत्री मदन येरावार

Image
यवतमाळ, दि 15 : दिव्यांग व्यक्ती हे समाजाचा घटक आहे. शरीराच्या एखाद्या अवयवाचे दुबळेपण समाजासमोर येऊ नये म्हणून अंध, अपंग, मुकबधीर या शब्दांऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग हा शब्द प्रचलित केला. दैवाने जे दिले ते दिले, मात्र यावर मात करून समाजात पुढे जाण्याचे दिव्यांगांचे प्रयत्न आहेत. त्यामुळे दिव्यांगांसाठी समाजमन संवेदनशील असावे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. दिव्य दृष्टी अपंग विकास संस्थेच्या वतीने टिळक भवनात “ पांढरी काठी ” दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष दीपक मोरखडे, अँग्लो-हिंदी महाविद्यालयाचे प्राचार्य कश्यप, कारागृह अधिक्षक कीर्ति चिंतामणी, मिना राशदवार, सारिका शहा, रेखा कोठेकर, दिव्या कासावार, यशवंत धोटे, संस्थेच्या सचिव किरण यादव उपस्थित होत्या. दिव्यांगांसाठी काम करणे हे एक सामाजिक दायित्व आहे, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, 15 ऑक्टो. 1964 पासून अमेरिकेमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात झाली. दिव्यांगांसाठी काम करणा-या हेलन केअर ह्या जन्माने अंध नव्हत्या तर उपचारादरम्यान त्यांची दृष्टी गेली

जिल्हाधिका-यांनी घेतली वैद्यकीय महाविद्यालयात आढावा बैठक

Image
यवतमाळ , दि. 12 : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्याबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी.जी.धोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डी.जी. चव्हाण, मेडीसीन विभागाचे डॉ. बाबा येलके उपस्थित होते. किटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीबाबत चौकशी करून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, औषधीचा पुरवठा रुग्णांना झाला पाहिजे. बाह्यरुग्ण विभागात डॉक्टरांनी वेळेवर उपस्थित राहावे. वैद्यकीय महाविद्यालयाला निधी देण्यात आला आहे. त्यातून औषधसाठा, उपकरणे आदी अद्ययावत ठेवा. परिसरात असलेल्या खाजगी बेकायदेशीर रुग्णवाहिकांचा बंदोबस्त करा, अशा सुचना त्यांनी केल्या. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विभागाचे डॉक्टर्स आणि प्राध्यापक उपस्थित होते.                                                       00000000

दुर्धर आजार असणा-यांवर मुंबईत मोफत उपचार - पालकमंत्री मदन येरावार

Image
Ø प्रवास आणि राहण्याची व्यवस्था शासन करणार यवतमाळ , दि. 12 : जिल्ह्यातील ज्या रुग्णांना कर्करोग, हृदयरोग आदी दुर्धर आजार आहेत व आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेता येत नाही, अशा निकषात बसणा-या रुग्णांवर आता मुंबईत मोफत उपचार करण्यात येणार आहे. या रुग्णांना ने-आण करणे तसेच त्यांची मुंबईत राहण्याची व्यवस्थासुध्दा शासनातर्फे करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी सांगितले. तहसील कार्यालयात लाभार्थ्यांना धनादेश व प्रमाणपत्राचे वाटप करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, तहसीलदार सचिन शेजाळ आदी उपस्थित होते. समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्ती, अपंग, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तिंच्या मदतीसाठी शासन नेहमी तत्पर आहे. लाभार्थ्यांना तात्काळ मदत मिळण्यासाठी आपले सरकार आग्रही आहे. कोणत्याही योजनेचा लाभ लाभार्थ्यांना लवकर मिळण्यासाठी प्रशासनाने गांभिर्याने काम करावे. तसेच दुर्धर आजार असणा-या रुग्णांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संपर्क साधावा. जेणेकरून त्यांना उपचारासाठी मुंबईला पाठविण्यात येईल. या संपूर्ण उपचाराचा खर्च मुख्यमंत्री

विषबाधित सर्व रुग्णांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळणार - पालकमंत्री मदन येरावार

Image
यवतमाळ , दि. 12 : जिल्ह्यात किटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांना बळीराजा चेतना अभियानातून दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व बाधित तसेच उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांनासुध्दा ही मदत मिळणार आहे, असे पालकमंत्री मदन येरावार यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, अतिरिक्त्‍ जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, मुख्यमंत्री वैद्यकीस सहायता निधी कक्षप्रमुख ओमप्रकाश शेटे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरवार उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेपेक्षा जास्त खर्च झाला असेल अशा रुग्णालयांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातर्फे मदत देण्यात येईल. अडचणीत असलेल्या सर्व शेतक-यांच्या वैद्यकीय उपचार

दारव्हा पाणी पुरवठा योजनेचे काम जलदगतीने करा - महसूल राज्यमंत्री संजय राठोड

Image
यवतमाळ , दि. 12 : यावर्षी संपूर्ण जिल्ह्यातच पाऊस कमी पडला. त्यातही दारव्हा आणि यवतमाळमध्ये पाण्याची समस्या गंभीर आहे. दारव्हा तालुक्यात पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या असून त्यासाठी निधीसुध्दा आला आहे. त्यामुळे संबंधित विभाग आणि कंत्राटदाराने हे काम जलदगतीने करावे, अशा सुचना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात दारव्हा येथील पाणी पुरवठा योजनेसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सुरेश चारथळ, नगर पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, दारव्हाचे न.प.मुख्याधिकारी धीरज गोहाड, दारव्हाचे नगराध्यक्ष बबनराव इरवे उपस्थित होते. दारव्हा पाणी पुरवठा योजना ही 34 कोटी रुपयांची आहे. येथील काम जलदगतीने होण्यासाठी जिल्हाधिका-यांनी संबंधित शासकीय यंत्रणेला आदेश द्यावे. तसेच या योजनेसाठी स्वतंत्र अभियंता द्यावा. पाण्याची समस्या अधिक उग्र रुप धारण करण्यापूर्वी हे काम होणे अत्यंत महत्वाचे आहे, असे महसूल राज्यमंत्री राठोड यांनी सांगितले. तर कंत्रा

रेल्वे भुसंपादनात योग्य मोबदला मिळण्यासाठी पाठपुरावा करू - महसूल राज्यमंत्री संजय राठोड

Image
Ø जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली सुनावणी यवतमाळ , दि. 11 : जिल्ह्याच्या विकासासाठी रेल्वे आवश्यक आहे. येथील शेतकरीसुध्दा रेल्वेच्या भुसंपादनासाठी आपली शेतजमीन देत आहे. मात्र या भुसंपादनाचा योग्य मोबदला मिळणे हा शेतक-यांचा हक्क आहे. भुसंपादनाबाबत काही तांत्रिक अडचणी असेल तर त्या त्वरीत सोडविण्यात येतील. तसेच शेतक-यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी शासन आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करू, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पाच्या भुसंपादनाबाबत आज (दि. 11) जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या सुनावणीला महसूल व वन विभागाचे सहसचिव सुभाष गावडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) चंद्रकांत जाजू, खाजगी सचिव रविंद्र पवार, दारव्हा, पुसद आणि उमरखेडचे उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, नितीन हिंगोले, स्वप्नील कापडनीस, रेल्वेचे उपमुख्य अभियंता एच.एल. कावरे, बी.एम. त्रिपाठी, सागर चौधरी उपस्थित होते. रेल्वेसाठी जमीन भुसंपादित करतांना प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पाहणी केली का, असे विचारून

आरोग्य यंत्रणेने संपूर्ण क्षमतेने काम करावे - आरोग्यमंत्री दीपक सावंत

Image
Ø   शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आढावा बैठक यवतमाळ , दि. 6 :   किटकनाशक फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यावर ओढावलेले संकट हे अतिशय गंभीर आहे. मोठ्या प्रमाणात विषबाधित रुग्णांना उपचार करून सुट्टी देण्यात आली आहे. मात्र अद्यापही जे भरती आहेत, त्यांची योग्य काळजी घ्या. वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणारे नागरिक हे ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील असतात. तज्ज्ञ डॉक्टरांची येथे कमी नाही. त्यामुळे अशा आपात्कालीन परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने संपूर्ण क्षमतेने काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी केले. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर, पालकमंत्री मदन येरावार, महसलू राज्यमंत्री संजय राठोड, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, खासदार भावना गवळी, जिल्ह्याचे पालकसचिव व्ही. गिरीराज, आरोग्य विभागाचे आयुक्त संजीवकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड आदी उपस्थित होते. विषबाधित रुग्णांच्य