Posts

Showing posts from November, 2022

अभिलेख व्यवस्थापनशास्त्र कार्यशाळेचे आयोजन

यवतमाळ,दि २८, जिमाका - शासनाच्या विविध विभागामध्ये अभिलेख जतन करण्याचे कामकाज सुरू असते. परंतु शास्त्रशुध्द माहीती अभावी महत्वाचे कागदपत्र, दस्तावेज, जुने महत्वपुर्ण कागदपत्र जतन करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे महत्वाचा दस्तावेज नामशेष होण्याची भिती असते. तसेच सर्वसामान्य जनतेची महत्वाची कागदपत्रे सुध्दा शासकीय कार्यालयामध्ये चांगल्या व सुस्थितीत कालांतराने उपलब्ध होत नाही. या सर्वांचे जतन कशा पध्दतीने करावे. यासाठी पुराभिलेख संचालनालयातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवन येथे १ डिसेंबरला एक दिवशीय अभिलेख व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेचा लाभ सर्व विभागातील अभिलेख सांभाळणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी तसेच शाळा, महाविद्यालये, लेखक, अभ्यासक, वाचनालये यामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. या कार्यशाळेस पुराभिलेख संचालनालयाची तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. दिवसभर ही कार्यशाळा चालणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत

समता पर्व आणि मंडणगड पॅटर्नचा शुभारंभ १०१ विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संविधान दौड

यवतमाळ,दि २८, जिमाका - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सामाजिक न्याय भवन येथे शनिवारी संविधान दिनानिमित्त समता पर्व आणि मंडणगड पॅटर्नचा शुभारंभ करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी मंडणगड पॅटर्न अंतर्गत ११ वी व १२ वीच्या विज्ञान शाखेच्या १०१ विद्यार्थ्यांना या शिबिरात जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. बाभुळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय, नेर, दारव्हा येथील मुंगसाजी महाराज महाविद्यालय, पुसद येथील बाबासाहेब नाईक इंजिनिअरिंग महाविद्यालाय, उमरखेड येथील गोपिकाबाई सितारामजी गावंडे महाविद्यालय, वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालय, कळंब येथील इंदिरा कला महाविद्यालय, शिवरामजी मोघे महाविद्यालय, केळापुर आदी महाविद्यालयाच्या प्रचार्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष माधव कुसेकर होते. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त दिलीपकुमार राठोड, संशोधनअधिकारी मंगला मुन, सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्ह

सुशिक्षित बेरोजगारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा

यवतमाळ,दि.२५ नोव्हेंबर (जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन 27 नोव्हेंबर 2022 पर्यंत करण्यात आलेले आहे. सदर मेळाव्याकरिता जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने विविध पदासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंती क्रम देत सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त विद्या शितोडे यांनी केले आहे. स्थानिक पातळीवर तसेच इतर ठिकाणी औद्योगिक संस्थांना मनुष्यबळाची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. मागणीला अनुसरून जिल्ह्यातील तसेच इतर ठिकाणाच्या कंपनीशी संपर्क साधून मुथूट फायनान्स यवतमाळ,आर.सी.सी.पी.एल. प्रा.ली. मुकुटबन व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यवतमाळ या कंपनी मार्फत एकूण 111 रिक्त पदाकरिता ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मेळाव्या करिता जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने विविध पदासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंती क्रम देत सहभागी होता येणार आहे. सदर मेळाव्यामध्ये किमान 12 वी.परीक्षा उ

संविधान दिनानिमित्त विविध विभागांकडुन रॅलीचे आयोजन

यवतमाळ, दि 25 नोव्हेंबर (जिमाका):- संविधान दिना निमित्य 26 नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ वाजता जिल्हा व सत्र न्यायालय येथुन 'संविधान जनजागृती' रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रॅलीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एस. व्ही. हांडे यांचे हस्ते होणार आहे. सदर रॅलीमध्ये जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायीक अधिकारी, सरकारी वकील, अध्यक्ष, जिल्हा वकील संघ, सर्व वकील मंडळी, कर्मचारी वर्ग तसेच अमोलकचंद विधी महाविद्यालय, यवतमाळ येथील विद्यार्थी- विद्यार्थ्यांनीचा सहभाग असणार आहे. सदर रॅलीचा मार्ग जिल्हा व सत्र न्यायालय, यवतमाळ येथुन पोस्ट ऑफिस चौक तसेच करवा मेडिकल ते पोस्टल ग्राऊंड ते एल. आय. सी. चौक ते जिल्हा न्यायालय येथे रॅलीची सांगता होईल.
महावितरणच्या कामावार पालकमंत्री यांची नाराजी नादुरुस्त रोहित्र तात्काळ दुरुस्त करुन जोडण्याचे आदेश यवतमाळ, दि २५ नोव्हेंबर, जिमाका:- सद्यस्थितीत रब्बी हंगामाला शेतकऱ्यांना सिंचनासाठी विजेची गरज लक्षात घेता नादुरुस्त असलेले रोहित्र तात्काळ दुरुस्त करून तीन दिवसाच्या आत जोडणी करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्यात. पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली वीज वितरण विभागाच्या अडचणी संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार सर्वश्री मदन येरावार, नामदेवराव ससाने संजय रेड्डी, डॉक्टर संदीप धुर्वे, प्रा. अशोक उईके, ईंद्रनील नाईक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, महावितरणच्या मुख्य अभियंता श्रीमती चव्हाण, अधीक्षक अभियंता सुरेश मडावी तसेच दुरदृष्य प्रणालीद्वारे महावितरणचे संचालक संजय ताकसांडे हे मुंबईतून उपस्थित होते. शेतकऱ्यांकडून सातत्याने
दोन दिवसात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्या पालकमंत्री संजय राठोड यांच्या सुचना कालवे सल्लागार समितीची बैठक संपन्न यवतमाळ, दि, २5 नोव्हेंबर, जिमाका:- सद्यस्थितीत रब्बी पिकाला पाण्याची आवश्यकता असून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मोठ्या व मध्य प्रकल्पातून पुढील दोन दिवसात पाणी सोडुन शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन मध्ये आयोजित कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री राठोड बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री प्रा.अशोक उइके, डॉक्टर संदीप धुर्वे, ईंद्रनिल नाईक, नामदेवराव ससाने, संजय रेड्डी बोदकुरवार, मदन येरावार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, सिंचन मंडळाचे अध्यक्ष तथा अधिक्षक अभियंता म.ना.राजभोज, उपअधीक्षक अभियंता ग.ल. राठोड उपस्थ

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगासाठी अर्ज आमंत्रित योजनेत महाराष्ट्र देशात प्रथम

यवतमाळ,दि.२३ नोव्हेंबर (जिमाका):- उद्योजक, शेतकरी, बेरोजगार युवक, महिला भागीदारी संस्था (एल.एल.पी) तसेच लाभार्थीमध्ये शेतकरी उत्पादक गट, कंपनी संस्था, स्वयंसहाय्यता गट, सहकारी, शासकीय संस्था यांनी कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग उभारणी किंवा त्यांचे विस्तारीकरण,स्तरवृद्धी व आधुनिकीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. सध्याच्या काळात शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषी व अन्न प्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे. तसेच आजच्या आधुनिक जगात पोटभर अन्ना बरोबरच भरपूर पोषणमूल्य असणाऱ्या प्रक्रिया उत्पादनांचीही मागणी वाढत आहे. यासाठीच स्थानिक, स्वदेशी, गावरान, रानमेवा, वनउपज, सेंद्रिय पारंपारिक उत्पादनांना वाव देण्यासाठी (“vocal for local”) केंद्र पुरस्कृत “आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (PM FME) ही योजना कृषी विभागामार्फत संपूर्ण राज्यभर राबविली जात आहे. नव्याने स्थापित होणाऱ्या किंवा सद्यस्थितीत कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना विस्तारीकरण,स्

गायरान जमिनीवरील अतिक्रमण या वर्षा अखेरीस काढून टाकण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

यवतमाळ, दि २४ नोव्हेंबर, जिमाका:- यवतमाळ जिल्ह्यात गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात निवासी, वाणिज्य, औद्योगिक आणि शेती या प्रयोजनासाठी नागरिकांनी अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या एका सुमोटो याचिकेवरिल निर्णयानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ६ महिन्यावरिल अस्तित्वात असलेली सर्व प्रकारची अतिक्रमणे ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 53( 2 )नुसार पंचायतीला असा कोणताही अडथळा किंवा अतिक्रमण काढून टाकण्याचा तसेच खाजगी मालमत्ता नसलेल्या कोणत्याही गायरानवर किंवा इतर जमिनीवर अनधिकृतपणे लागवड केलेले कोणतेही पीक काढून टाकण्याचा अधिकार आहे. खाजगी मालमत्ता नसलेल्या कोणत्याही खुल्या जागेतील मग ती जागा पंचायतीमध्ये समाविष्ट असो किंवा नसो त्या जागेवरील कोणतेही अनधिकृत अतिक्रमण काढून टाकण्याचा तसाच अधिकार आहे मात्र अशी जागा सरकारकडे निहीत असल्यास जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याची परवानगी प्रथम मिळवून घेणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीने असा अडथळा अ

चाईल्ड लाईन” से दोस्ती सप्ताहाचे उद्घाटन

यवतमाळ,दि.24 नोव्हेंबर (जिमाका):- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालय, व चाईल्ड लाईन इंडिया फाउंडेशन मुंबई अंतर्गत संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ द्वारा चाईल्ड लाईन 1098 से दोस्ती सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. चाईल्ड लाईन 1098 ही राष्ट्रीय पातळीवरील टोल.फ्री. क्रमांकाची मदत सेवा आहे. याद्वारे 18 वर्षा आतील आपत्कालीन स्थितीतील बालकांना आवश्यक ती संरक्षणात्मक सेवा पुरविण्यात येते. कोणतीही व्यक्ती 1098 या टोल फ्री.क्रमांक वर संपर्क करून अडचणीत सापडलेल्या बालकाला आवश्यक ती मदत पुरवू शकतो. याशिवाय वैद्यकीय सहाय्याची आवश्यकता असलेल्या बालकांना मदत पुरविणे मानसिक,शारीरिक व लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या बालकांना संरक्षण उपलब्ध करून देणे, सापडलेल्या किंवा हरविलेल्या बालकाला त्यांच्या कुटुंबात पुर्नस्थापित करणे, अनाथ व निराधार अथवा निवा-याची आवश्यकता असलेल्या बालकांना निवारा उपलब्ध करून देणे, अल्पवयात होणाऱ्या बालविवाहांना थांबवून बालविवाह प्रथा निर्मूलन करणे बालकामगारांना मुक्त करणे व पुनर्वसनात्मक सेवा पुरविणे त

जाणून घेऊ या भारताचे संविधान

भारत हा जगातील सर्वात बलवान लोकशाही असलेला देश आहे. आपल्या देशाचा राज्यकारभार ज्या नियम, कायद्यानुसार चालतो ते म्हणजे आपले *संविधान, भारताची राज्यघटना*. सर्वसमावेशक व सर्वन्यायी राज्यघटनेमुळेच भारताची जगात वेगळी ओळख आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती व संविधान समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद, मसुदा समितिचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितिच्या सदस्यांनी रात्रंदिवस एक करुन आपल्याला हे संविधान दिले आहे. प्रत्येक नागरिकाच्या घरात हे संविधान असायलाच हवे. कारण आपला सगळा जीवनप्रवास संविधानाने दाखविलेल्या मार्गानेच पूर्ण होणार आहे. २६ नोव्हेंबर या संविधान दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या संविधानाविषयी जाणून घेऊ या. खरे तर संविधानाच्या उद्देशिकेमध्येच संविधानाचा संपूर्ण सार आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता यावर आधारित आपले संविधान आहे. राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अंमलात आली. भारतीय संविधानात २२ भाग (प्रकरण), १२ अनुसूचि व दोन परिशिष्ट आहेत. दोन परिशिष्ट ही जम्मू काश्मीरसाठी आहेत. संविधानाची सुरुवात उद्देशिकेने होते. उद्देशिकेतील "हे

सैनिकी वसतिगृहात महीला स्वयंपाकी व सफाई कर्मचा-यांसाठी अर्ज आमंत्रित

यवतमाळ, दि.२४ नोव्हेंबर (जिमाका):- वीरमाता रमाबाई पंडित व जनरल पंडित सैनिकी मुलींचे वसतिगृह, सिव्हील लाईन्स, यवतमाळ येथे रोजंदारी पध्दतीने महिला स्वयंपाकी व महिला सफाई कर्मचारी भरती करवयाची आहे. सदर पदाकरीता यवतमाळ येथील ईच्छुक महिला उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे. ईच्छुक उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज नाव, पत्ता, मोबाईल क्रमांकासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, टांगा चौक, यवतमाळ येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे. अधिक माहितीकरीता दूरध्वनी 07232-245273/ मो.9284881604 वर संपर्क करावा

नव उद्योजकांसाठी 'मार्जिन मनी”योजना'

यवतमाळ,दि.२४ नाव्हेंबर (जिमाक):- केंद्र शासनाच्या “स्टॅड अप इंडीया” योजनेंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द समाजच्या घटकांकरीता “मार्जिन मनी” योजना सुरू करण्यात आलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील इच्छुक नव उद्योजक तरूणांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी 5 डिसेंबर अर्ज सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण रामसिंग चव्हाण यांनी केले आहे. या योजनेसाठी 18 वर्षावरील नव उद्योजक पात्र आहेत. उद्योग सुरू करण्यासाठी स्टँड अप इंडीया योजने अंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर झाल्यानंतर उर्वरीत फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नव उद्योजकांना प्रकल्प मुल्यांच्या 15 टक्के अनूदान राज्य शासनामार्फत मार्जिन मनी म्हणुन देण्यात येते. तसेच 10 टक्के स्वहिस्सा उमेदवाराला भरावा लागतो. सदर “मार्जिन मनी” योजना समाज कल्याण विभागमार्फत राबविण्यात येत आहे. शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सदर शासन निर्णय निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त,समाज कल्याण, पळसवाडी कॅम्प,दारव्हा रोड यवतमाळ या कार्यालयाशी संपर्क

वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन संकेतस्थळ पुन्हा सुरु अनुसुचित जमातिच्या विद्यार्थ्यांना २६ नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज

वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन संकेतस्थळ पुन्हा सुरु अनुसुचित जमातिच्या विद्यार्थ्यांना २६ नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज यवतमाळ दि.24 नोव्हेंबर (जिमाका): अभियांत्रकी, वैद्यकिय व विद्यापीठ अभ्यासक्रमासाठी २०२२- २३ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता वसतीगृह प्रवेशाचा अर्ज ऑनलाईन भरण्याकरीता 26 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन संकेतस्थळ पुन्हा सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. प्रकल्प कार्यालय पांढरकवडा अंतर्गत वसतीगृहात रिक्त असलेल्या जागा अशा आहेत. मुलांचे वसतीगृह कळंब-36, राळेगाव -28 , वणी -59, झरी जामणी -55 , पांढरकवडा - 11 , घाटंजी -29 तसेच मुलींचे वसतीगृह कळंब- 38 ,वणी - 20 झरी जमाणी- 29 , घाटंजी - 7 याप्रमाणे जागा उपलब्ध आहेत. सन 2022-23 या वर्षाकरीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता शासकिय वसतीगृहात प्रवेशासाठी https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळ ऑनलाईन अर्ज सादर करावा असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी,तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्

शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी विमा काढण्याचे आवाहन अंतिम मुदत 15 डिसेंबर निसर्गाची सुटता साथ, पिक विमा देईल हात

यवतमाळ, दि. 23 नोव्हेंबर (जिमाका):- प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2022-23 रब्बी व उन्हाळी हंगामाकरीता लागू करण्यात आली असुन शेतकऱ्यांनी बागायती गहू व हरभरा पिकासाठी विमा भरण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२२ व उन्हाळी भुईमूग पिकासाठी विमा भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2023 पर्यंत आहे. जास्तित जास्त शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी विमा काढण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा हप्त्यासह प्रस्ताव सादर करावा. यासाठी शासनाने भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड मुंबई क्षत्रिय कार्यालय, स्टॉक एक्सचेंज टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्ट्रिट, फोर्ट, मुंबई 400023. टोल फ्री क्रमांक 1800 419 5004 या कंपनीची निवड केलेली आहे. अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी पीक कर्ज घेतल्यास शेतकऱ्यांना देखील या योजनेत सहभाग घेणे बंधनरककारक नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा योजननेत भाग घेण्याच्या अंतिम मुदतिच्या किमान सात दिवस पूर्व संबंधित बँकेस पिक विमा न भरणे बाबत लेखी कळविणे गरजेचे आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आ

महारेशिम अभियान 2023 रेशिम शेतीसाठी शेतक-यांनी अनुदानाचा लाभ घ्यावा

यवतमाळ, दि. 23 नोव्हेंबर(जिमाका):- तुती लागवडीद्वारे रेशीम कोष उत्पादन ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येते. जिल्ह्यात महारेशीम अभियान 2023 अंतर्गत तुती, टसर क्षेत्र नोंदणी कार्यक्रम 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शेतक-यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. लाभार्थी निवडीचे निकष अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती (Nomadic Tribes), भटक्याविमुक्त जमाती (Denotified Tribes), दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे, महिलाप्रधान कुटुंबे, शारीरिक अपंगत्व प्रधान कुटुंबे. भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिराआवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन्यनिवास (वन अधिकारी मान्यता) अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती, कृषी माफी योजना सन 2008 नुसार अल्पभूधारक (एक हेक्टर पेक्षा जास्त दोन हेक्टरपर्यंत) व सीमांत शेतकरी (एक हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र) क्षेत्र मर्यादा प्रति लाभार्थी एक एकर राहिल. या योजनेअंतर्गत रेशीम विकास प्रकल्पासाठी तीन वर्षांमध्ये अकुशल व कुशल

संविधान दिनी विविध स्पर्धांचे आयोजन करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना जिल्ह्यात सर्वत्र उद्देशिकेचे होणार वाचन

यवतमाळ, दि २३ नोव्हेंबर, जिमाका:- भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास,श्रध्दा व उपासना यांचे स्वांतत्र्य, दर्जाची व संधीची समानता प्राप्त करुन देणारे भारतीय संविधान 26 नोव्हेंबर, 1949 रोजी देशाला अर्पण करण्यात आले. आपल्या संविधानाबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टिने दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयामध्ये भारताचे संविधान या विषयावर प्रश्नमंजुषा, बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा व विविध स्पर्धांचे आयोजन व उद्देशिकेचे वाचन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत. संविधानाचा स्वीकार करुन 71 वर्ष पूर्ण झाली आहेत. जगभरातील संविधान बारकाईने वाचल्यानंतर, त्यांचा अभ्यास केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मसुदा समितिने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला होता. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी तो भारतीय संविधान सभेसमोर मांडला. 26 जानेवारीपासुन या सं

जात पडतळणी शिबीराचे आयोजन २४ नोव्हेंबरला

यवतमाळ, दि.18 नाव्हेंबर (जिमाका):-मंडणगड पॅटर्नची अंमलबजावणी बाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी,समिती यवतमाळ यांच्या मार्फत यवतमाळ तालुक्यातील सर्व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात 24 नोव्हेंबर 2022 रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी,(व्हॅलेडीटी सर्टिफिकेट) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सन 2022-23 मधील प्रवेशित 11 व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांकरिता जात प्रमाणपत्र पडताळणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,पळसवाडी कॅम्प, दक्षता भवन पाठीमागे दारव्हा रोड,यवतमाळ येथे 11 ते 5 या वेळेत करण्यात येईल. सदर कार्यशाळेत 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आपला परिपूर्ण अर्ज https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरून त्याचे प्रिंट आऊट काढून कार्यशाळेत सादर करावे. सदर कार्यशाळेतील प्राप्त प्रस्ताव त्वरित निकाली काढून जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप सामाजिक न्याय दिनी 26 नोव्हेंबर रोजी समारंभ पूर्वक करण्यात येईल. सदर शिबिराचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा,असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे समितीचे अध्यक्ष डॉक्टर माधव कुसेकर व उपायुक्त दिलीप

कलावंतांनी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

यवतमाळ,दि.18 नोव्हेंबर (जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागामार्फत कला व साहीत्य क्षेत्रातील मान्यवर कलावंताकरीता वृध्द साहित्यक व कलावंत मानधन योजना राबविण्यात येते. त्यामध्ये निवड झालेल्या कलावंताना तहह्यात दरमहा मानधन संचालक,सांस्कृतिक कार्य संचलनालय,मुंबई यांचे स्तरावरून ऑनलाईन पध्दतीने कलावंताचे बॅंक खात्यात जमा करण्यात येते. सदर मानधन सुरळीत सुरू राहण्याकरीता मानधनधारक कलावंतानी नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांचा हयातीचा दाखला सादर करावा असे आवाहन करण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वृध्द साहित्यीक व कलावंत मानधन योजनेअंतर्गत पात्र मानधनधारक कलावंतानी त्यांचा नोव्हेंबर 2022 मधील हयात असल्याचा दाखला,बँक खात्याची झेरॉक्स प्रत व आधारकार्डची झेरॉक्सप्रत,संपर्क क्रमांक ई माहिती संबधीत पंचायत समिती कार्यालयात जमा करावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

कोळसा खाणी क्षेत्रात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन द्या पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि १८ नोव्हेंबर जिमाका:- वणी, माजरी क्षेत्रांतर्गत एकोणा, माजरी, निलजाई पैनगंगा, मुंगोली या कोळसा खाणीतून कोळसा वाहतूकची कामे स्थानिक लोकांना देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी वेस्टर्न कोल्ड फिल्डच्या अधिका-यांना केल्यात. कोळसा खाणीमध्ये स्थानिक लोकांना रोजगार देण्यासंदर्भात व तेथील स्थानिक वाहतूकदारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आज पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे बैठक पार पडली. बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे खनिकर्म अधिकारी शिरीष नाईक, वणीचे उपविभागीय अधिकारी, वेकोलिचे महव्यवस्थापक संजयकुमार, आभाश चंद्रासिंग, आलोक ललितकुमार, ए के सिंग, ओ पी दुबे, अनिल हेपट, बिनेज कुमार, रोहित रमेश तसेच कामगार अधिकारी प्र.रा. महाले, राहुल बालमवार,रविश सिंह आणि वेस्टर्न कोल्ड फीलचे अधिकारी उपस्थित होते. वनी व मांजरी क्षेत्रांतर्गत असलेल्या कोळसा खाणींमधून कोळशाची वाहतूक करण्यासाठी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात ट्रक विकत घेतले आहेत. परंतु कोळसा वाहतुकीचे काम मोठ्या कंत्राटदारांना दिल्यामुळे स्थानिक

मतदारांनी मतदार यादीतील नावाची खात्री करुन घ्यावी -जिल्हाधिकारी यांचे आवाहन

यवतमाळ, दि 17, (जिमाका):- एकीकृत प्रारूप मतदार यादी 9 नोव्हेंबरला प्रसिद्ध झाली असुन मतदार यादिवर 8 डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहे. तसेच मतदार नोंदणीसाठी 4 विशेष शिबिरे 19 आणि 20 नोव्हेंबर, 3 आणि 4 डिसेंबर रोजी होणार आहे. मतदारांनी आपले नाव मतदार यादित आहे का याची खात्री करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. तृतीयपंथी,देह व्यवसाय करणाऱ्या महिला, घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती या लक्षित घटकांसाठी विशेष शिबिरे 26 व 27 नोव्हेंबरला होणार आहे. दावे आणि हरकती 26 डिसेंबर पर्यंत निकालात काढण्यात येतील. अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी 5 जानेवारी, 2023 ला करण्यात येईल. सन 2023 च्या जानेवारी, एप्रील,जुलै, ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेला किंवा त्याच्या आधी 18 वर्ष पुर्ण करणारी व्यक्ती विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अर्ज क्र.6 भरुन आगाऊ मतदार नोंदणी करु शकतात. ऑनलाइन मतदार नोंदणीसाठी https://nvsp.in, https://voterportal.eci.gov.in या संकेतस्थळावर करता येईल. किंवा Voter Helpline हे मोबाइल ॲप दाऊनलोड

बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती सप्ताहाचे जिल्हाधिकारी यांचे हस्ते उद्घाटन* 20 नोव्हेंबरपर्यंत करणार जनजागृती

यवतमाळ दि. 16 नोव्हेंबर (जिमाका):- बालकामगार या अनिष्ट प्रथेतून राज्याला मुक्त करण्याचा निर्धार शासनाने केलेला असुन कामगार विभागाद्वारे 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे हस्ते महसुल भवन येथे करण्यात आले. कोणत्याही आस्थापना धारकांनी आपल्या आस्थापनेमध्ये बालकामगार ठेवू नये, सर्व आस्थापना धारकांची व देशातील प्रत्येक नागरीकांची सामाजिक जबाबदारी असून आपला जिल्हा,आपले राज्य व आपला देश बालकामगार मुक्त करण्याकरिता आपली सामाजिक बांधीलकी जोपासावी. तसेच यानंतर सुध्दा कोणत्याहीआस्थापनेमध्ये बाल कामगार आढळून आल्यास त्या आस्थापना धारकावर नियमानुसार कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही आस्थापना धारकांनी बाल कामगार ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले . यावेळी सरकारी कामगार अधिकारी प्र.रा.महाले ज्योती कडू जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, देवेन्द्र राजूरकरजिल्हा बाल संरक्षण अधिकारी, र.श.जतकर दुकाने निरीक्षक, विजय गुल्हाने , दाभाडकर चाईल्ड लाईन, व

राष्ट्रीय लोकअदालतीचे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजन भांडणापेक्षा समझोता बरा, मिळेल त्यातच आनंद खरा, सामंजस्याने वाद मिटविणं यातच खरं शहाणपण, त्यासाठी तुम्हाला मदत करेल विधी सेवा प्राधिकरण

यवतमाळ, दि. 11 नोव्हेंबर (जिमाका):- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार दिनांक 12 नोव्हेंबर,2022 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व जिल्हा वकील संघ, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये येथे राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भुअर्जन मामल्याची प्रकरणे, महसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद प्रकरणे, बॅका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे व तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपुर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघणार आहे. सदर लोकअदालतीमध्ये वाद मिटविण्याकरिता न्यायाधीश, तज्ञ वकील व सामाजीक कार्यकर्ते यांचे मंडळ पक्षकारांस मदत करेल. तसेच लोकअदालतीमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. तरी सर्व पक्षकारांना कळविण्यात करण्यात येते की, दिनां

शैक्षणिक गुणवत्तेत कमी असणा-या देशातिल १० जिल्ह्यात २२ नोव्हेंबरला मध्यावधी उपलब्धी सर्वेक्षण *परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना *विद्यार्थ्यांचा सराव करून घ्यावा *९४ शाळांमध्ये परीक्षा *१२३ नियंत्रण अधिकारी व क्षेत्र अन्वेषक म्हणून ११२ अधिकाऱ्यांची नियुक्ती

यवतमाळ, दि ११ नोव्हेंबर जिमाका:- शैक्षणिक गुणवत्तेत कमी असणा-या देशातिल १० जिल्ह्यात २२ नोव्हेंबरला विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी तपासण्यासाठी मध्यावधी उपलब्धी सर्वेक्षण (मीड टर्म अचीवमेंट सर्वे) घेण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा सराव करून घ्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. भारत सरकारने 2017 मध्ये देशातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यासाठी 2017 मध्ये राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षण (नॅशनल अचीवमेंट सर्वे) घेतला होता. यामध्ये देशात १० जिल्हे हे कमी शैक्षणिक गुणवत्ता असलेले आणि 300 गुणांपेक्षा कमी गुण असलेले आढळुन आले. यात यवतमाळ जिल्ह्याला २९९ गुण मिळाले होते. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान समितीने 2020 मध्ये कमी गुणवत्ता आढळून आलेल्या या १० जिल्ह्यांमध्ये तात्काळ शैक्षणिक उपक्रम राबवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार भारत सरकारने मार्च 2022 मध्ये या जिल्ह्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कार्यक्रम जाहीर केला. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने सुद्धा 27 ऑक्टोबर 20

१३ नोव्हेंबरला शासकिय योजनांचा महामेळावा

यवतमाळ, दि. 11 नोव्हेंबर (जिमाका):- पॅन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत गावोगावी दूर्गम भागात जावून जनसामान्यांना मोफत कायदेविषयक माहितीचा प्रचार व प्रसार पॅरा विधी स्वंयसेवकांमार्फत करण्यात येत आहे.त्याअनुषंगाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा प्रशासन यांचे संयुक्त विद्यमाने सामान्य नागरीकांना त्यांच्या सेवा योग्य वेळेत मिळाव्यात याकरीता शासकीय योजनांचा महामेळाव्याचे आयोजन 13 नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ वाजता “बळीराजा चेतना भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, येथे करण्यात आले आहे. यवतमाळ तालुक्यातील सर्व नागरीकांनी ह्या शासकीय योजनांच्या महामेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही.हांडे, यांनी केले आहे.

डॉ. एस. एस. गडकरी वार्षिक स्मृती पुरस्कारसाठी अर्ज आमंत्रित

यवतमाळ,दि.11नोव्हें,(जिमाका) : भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या वतिने 2016 पासून "लोकप्रशासनातील नवोपक्रमासाठी कै. डॉ. एस. एस. गडकरी वार्षिक स्मृती पुरस्कार" सुरू केला आहे. सन २०२२-२३ साठी प्रशासनातिल अधिकारी , कर्मचारी यांच्याकडून पुरस्कारासाठी योग्य नामांकन आणि नावीन्यपूर्ण कल्पनेच्या सारांशासह 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज भारतीय लोक प्रशासन संस्था महाराष्ट्र प्रादेशिक शाखा तळमजला, बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेजारी, मादम कामा रोड, मंत्रालय मुंबई येथे पाठवावा. भारतीय लोकप्रशासन संस्थेची महाराष्ट्र प्रादेशिक शाखा सार्वजनिक प्रशासनाच्या विकासाच्या क्षेत्रात काम करत असून शाखा विविध उपक्रम राबवते. प्रशिक्षण कार्यक्रम, परिषदा, लोकांसाठी निबंध स्पर्धा, वार्षिक स्मृती व्याख्याने, सार्वजनिक प्रशासनाशी संबंधित संशोधन प्रकल्प इत्यादी क्षेत्रात काम करते. नागरिकांच्या सेवेसाठी नाविन्यपूर्ण कल्पनांचा अवलंब करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार सार्वजनिक सेवा प्रदान करण्य

लोकसहभागातुन बांधणार वनराई बंधारे

यवतमाळ, दि. ११ नोव्हेंबर (जिमाका):- या वर्षात जिल्हयात मोठया प्रमाणात पाऊस झालेला आहे. सद्यस्थितीत ओढे-नाले भरुन वाहत आहेत. ओढे-नाले यामधील वाहून जाणारे पाणी अडवुन पिकांना संरक्षित सिंचन देणे, जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी लोकसहभागातुन जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. वनराई बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाणी, गुरांना पाणी, बंधाऱ्याच्या आजुबाजूला असलेल्या विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ तसेच रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला/कडधान्ये, कलिंगड यासारखी पिके घेण्यासाठी होतो. वनराई बंधारे पाणलोट क्षेत्रामध्ये व पाणलोट क्षेत्राच्या बाहेरही घेता येतात. वनराई बंधारे बांधण्याकरीता रिकामी पोती, रेती व काळी माती वापरुन बांध तयार करण्यात येतात. तसेच जास्तीत जास्त वनराई बंधारे बांधण्याकरीता जिल्ह्यातील सर्व लोकांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

रोजगार केंद्रामध्ये नांव नोंदवलेल्या उमेदवारांनी आधार क्रमांक जोडावा

यवतमाळ, दि. 11 नोव्हेंबर (जिमाका):- जिल्ह्यातील सर्व नोकरी ईच्छुक व नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपल्या नोंदणीला आपले आधार कार्ड www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने आधार लिंक पूर्ण करावे असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सर्व सेवा व सुविधा आता या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने पुरविण्यात येतात. याव्दारे उमेदवारांस प्रामुख्याने राज्यभरातील वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्याची सर्व माहिती मिळविणे आणि त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळविणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे, आणि सहभाग घेणे, आपली शैक्षणिक पात्रता वाढविणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल य
अग्निवीरवायु म्हणून तरुणांना वायुसेनेत नोकरीची संधी 23 नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज यवतमाळ, दि. 11 नोव्हेंबर (जिमाका):- भारतीय वायुसेनेच्या अग्निपथ या योजनेअंतर्गत अग्निवीर वायु म्हणुन भारतीय वायु सेनेत प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या तरुण- तरूणींना सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. अग्निवीरवायु या पदासाठी २३ नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. भारतीय वायु सेनेत सहभागी होणेकरीता अग्निवीर वायु पदाची परीक्षा देणे आवश्यक आहे. त्याकरीता http://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.

जिल्हा महिला रुग्णालयात स्त्री जन्माचे स्वागत रुग्णालयात झाली पहिली प्रसुती

यवतमाळ, दि 11 जिमाका: जिल्हा महिला व बाल रुग्णालयात ९ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजुन २७ मिनिटांनी पहिली प्रसूती झाली. जिल्हा महिला रुग्णालयात पहिलेच बाळ मुलगी जन्माला आल्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक आर. डी. राठोड यांनी मातेला साडी देऊन व बाळाला कपडे देऊन स्त्री जन्माचे स्वागत केले. शांता पळसकर असे प्रसुत महिलेचे नाव आहे. जिल्हा महिला व बाल रूग्णालय येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे देखील जिल्हा शल्यचिकित्सक यांनी प्रथम प्रसूतीसाठी अभिनंदन केले. स्त्री रोग तज्ञ डॉ. संध्या राठोड यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. रवी पटिल यांच्या मार्गदर्शनाखाली सुखरूप प्रसुती केली. जिल्हा महिला रुगणालय हे शंभर खाटांचे रुग्णालय असून मागील तीन महिन्यापासून सुरू झालेले आहे. तिथे आत्तापर्यंत बाह्य रुग्ण सेवा देण्यात येत होती. ९ नोव्हेंबरपासुन तिथे आंतर रुग्ण सेवा सुद्धा सुरू करण्यात आली आणि पहिली प्रसूती सुखरुप करण्यात आली. जिल्हा स्त्री रुग्णालयात अति जोखमीच्या माता वगळून इतर गरोदर मातांच्या नॉर्मल प्रसूती करण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. इथे सर्व गरोदर मातांची स्त्रीरोगतज्ञमा

समाधान शिबिराकरता अर्ज करण्यासाठी मुदत वाढ आता 25 नोव्हेंबर पर्यंत करता येणार अर्ज

यवतमाळ, दि ११ नोव्हेंबर जिमाका :- प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान होऊन जनतेचा वेळ, श्रम व पैशाची बचत व्हावी म्हणून सुवर्ण जयंती महाराज स्वाभिमान अंतर्गत पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या समाधान शिबिरासाठी नागरिकांनी त्यांच्या कोणत्याही समस्येसाठी अर्ज करण्याची मुदत १० नोव्हेंबर पर्यंत देण्यात आली होती. याला आता मुदतवाढ देण्यात आली असून नागरिक 25 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या तक्रारी, समस्या,वैयक्तिक मागणी संदर्भातील अर्ज करू शकतात. सर्व तहसिल कार्यालयामधील समाधान शिबीर कक्षामध्ये नागरीकांचे समाधान शिबिराचे अर्ज स्विकारण्यात येतील. तसेच जिल्हास्तरावर, तालुका स्तरावर सर्व विभागामध्ये तसेच ग्राम स्तरावर ग्रामपंचायती मध्ये निर्माण केलेल्या समाधान शिबीर कक्षाद्वारे नागरीकांचे अर्ज स्विकारण्यात येतिल. तालुकास्तरावर स्विकारण्यात आलेल्या अर्जांना टोकन क्रमांक देण्यात यावेत. विभागप्रमुखांनी कार्यालय स्तरावर स्विकारलेल्या अर्जांना विभागाचे / कार्यालयाचे नाव टाकून तालुक्याचे नाव व क्रमांक ट

जनावरांची काळजी व सुश्रुषा यावर ८० टक्के भर देऊन जनावरांना बरे करावे *- पशु संवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंग *बाभुळगाव,नेर, दारव्हा तालुक्यात केली जनावरांची पाहणी

Image
यवतमाळ दि,१० जिमाका:- महाराष्ट्रामध्ये लंपी चर्मरोग हा साथरोग हाताळणे हे पशुसंवर्धन विभागासमोर मोठे आव्हान होते. मात्र पशुसंवर्धन विभागाने हे आव्हान चांगल्या पद्धतीने हाताळले. यापुढेही दोन महिने हे आव्हान हाताळण्यासाठी पशुसंवर्धन अधिकारी आणि डॉक्टरांनी जनावरांची काळजी व सुश्रुषा ८० टक्के आणि २० टक्के मेडिसिन यावर भर देऊन जास्तित जास्त जानावरांना या आजारातुन बरे करावे अशा सूचना पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंग यांनी केले. लंपी चर्मरोग प्रादुर्भाव बाबत आज श्री सिंग यांनी यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय महसूल भवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स्य विद्यापीठाचे सहाय्यक अधिष्ठाता अनिल भिकाने, पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर क्रांती काटोले उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व पशुधन विकास अधिकारी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी दूरदृष्य प्रणाली द्वारे सहभागी

दिव्यांगांनी दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे जिल्हाधिकारी

यवतमाळ,दि.9 नोव्हेंबर (जिमाका): यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांग प्रमाणपत्र नसलेल्या दिव्यांगांसाठी 9 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2022 (जागतीक दिव्यांग दिनापर्यंत)या कालावधीमध्ये दिव्यांग व्यक्तीचा शोध घेवून दिव्यांग व्यक्तींची वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय यवतमाळ येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तपासणी करून ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून दिणेकारिता मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत. यवतमाळ जिल्हयातील एकुण 1335 दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त केलेले नाही. दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन नोंदणी केलेली असून तपासणी केली नाही अशा दिव्यांगांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामिण भागातील दिव्यांग व्यक्ती करिता संबधीत ग्रामसेवकामार्फत व शहरी भागातील दिव्यांग व्यक्ती करिता मुख्याधिकारी,नगरपरिषद मार्फत शोध घेऊन दिव्यांग व्यक्तींची विशेष मोहिमेतंर्गत तपासणी करून ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिलेत.

सर्वांनी कर्तव्य पार पाडले तर हक्क आपोआप मिळतील* एस.व्ही. हांडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे प्रतिपादन*

Image
यवतमाळ, दि ९ जिमाका: आर्थिक परिस्थीतीमुळे कुणीही न्यायापासुन वंचित राहू नये. जे न्यायालयामध्ये पोहचु शकत नाही त्यांच्यापर्यंत मोफत विधी सेवेची माहिती पोहचवा. शासकिय सेवेत सर्वांनी आपले कर्तव्य पार पाडले तर हक्क आपोआप मिळतात,असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांनी केले. राष्टीय विधी सेवा दिनानिमित्य विधी साक्षरते बाबत जनजागृती करण्यासाठी आज सकाळी राली काढण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा न्यायालयाचे सभागृहामध्ये आयोजित शिबीरात न्यायमुर्ती श्री हांडे बोलत होते. यावेळी डॉ. जी.पी. कवडीकर, जिल्हा न्यायाधीश-1, यवतमाळ, ए.ए. लऊळकर, जिल्हा न्यायाधीश-2, यवतमाळ तसेच अमित बदनोरे, अध्यक्ष, जिल्हा वकील संघ आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव के.ए. नहार उपस्थीत होते. राष्टीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट् राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशावरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांचे मार्गदर्शनाखाली 31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत पॅन इंडिया कार्यक्रमाअंतर्ग

मतदार जागृतिसाठी निघाली सायकल रॅली एकिकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध नागरिकांनी दावे व हरकती नोंदवाव्या* उद्या विशेष ग्रामसभेचे आयोजन*

Image
यवतमाळ, दि ९ जिमाका:- लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकांनी मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. पण मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत आपले नाव नोंदवणे आणि मतदार यादीत नाव आहे की नाही याची तपासणी करण्याचे कर्तव्य नागरिकांनी पार पाडून देशाचे भाग्यविधाते व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले अमृत महोत्सावानिमित्त १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रांसह मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार जागृतीकरीता आज सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी समता मैदान येथुन रॅलीला मार्गस्थ केले. ही रॅली समता मैदान येथुन पुनम चौक, मेनलाईन, तहसिल चौक, आर्णी रोड, आर्णी नाका, संविधान चौक, जिल्हाधिकारी कार्यालया समोरुन समता मैदान येथे समाप्त झाली. या सायकल रॅलीच्या समारोप प्रसंगी त्यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार व-हाडे, उपजिल्हाधिकारी निवडणूक स्नेहल कनिचे उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे उपस्थित होते. रॅलीत महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कर्मचारी सहभागी झाले हो

पदवीधर मतदार नोंदणीत प्रशासनाची जबाबदारी मोठी* -विभागिय आयुक्त दिलिप पांढरपट्टे* २४ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान मतदार नोंदणी सुरु राहिल

यवतमाळ, दि ७ जिमाका: इतर निवडणुकांची मतदार यादी तयार होताना मतदार स्वतःहून नाव नोंदणी करतात. मात्र पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पदवीधर मतदार स्वतःहून पुढे येत नाहीत. त्यामुळे यात प्रशासनाची जबाबदारी मोठी असून एकही मतदार यादीच्या बाहेर राहणार नाही यासाठी सक्रियपणे मतदार नोंदणी करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांनी दिल्यात. आज जिल्हाधिकारी कार्यालयात पदवीधर मतदार संघाच्या मतदान नोंदणीचा आढावा घेताना विभागीय आयुक्त बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार व-हाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहल कणीचे, तसेच इतर प्राधिकृत अधिकारी उपस्थित होते तर दृकश्राव्य पद्धतिद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी सहभागी झाले होते. ८ ते २२ नोव्हेंबर पर्यंत पदवीधर मतदार अर्जांची छाननी आणि छपाईसाठी राखीव ठेवलेला असून 23 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर २४ ते ९ डिसेंबर पर्यंत पुन्हा पदवीधर मतदार संघासाठी मतदारांना नाव नोंदणी करता येईल. त

कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा २००५ पिडित महिलेला कायदेशिर संरक्षणाचा अधिकार

यवतमाळ, दि ७: कुंटुबातील कोणत्याही पुरूष नातेवाईकांकडुन जर स्त्रिचा शारिरीक व मानसिक, आर्थिक, सामाजिक वा इतर प्रकारचा छळ होत असेल तर हया कायद्यांतर्गत दादच नाही तर संरक्षण मागता येते. स्त्रियांवर होणा-या कौटुंबिक अत्याचाराबाबत भारतीय दंड सहितेनुसार फौजदारी कायदा अस्तित्वात आहे. *संरक्षणासाठी स्त्रीला मिळणारे अधिकार असे आहे*. मदत मिळण्यासाठी अर्ज करणे ; संरक्षण आदेश, आर्थिक मदत, मुलांचा ताबा मिळणारे आदेश, निवास आदेश आणि नुकसान भरपाईचा आदेश, विनामुल्य कायदेविषयक मदत तसेच भारतीय दंड विधान कलम 498 अ नुसार तक्रार दाखल करणे तसेच पिडीत महिलेकरीता संरक्षण अधिकारी यांची नियुक्ती राज्य सरकारव्दारे केली जाते. *शिक्षेचे स्वरुप* घरगुती हिंसाचाराचे कृत्य करणा-या आरोपीला एक वर्षापर्यंत तुरूंगवास किंवा रू.२०,०००/- पर्यंत दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते यामध्ये संरक्षण अधिकारी यांनी आपले कर्तव्य पार पाडले नाही तर त्यांनाही एक वर्ष कैद व रू.२०,०००/- पर्यंत दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते. *तक्रार कुठे करावी* पिडीत स्त्रिला तक्रा

*7 नोव्हेंबरला लोकशाही दिन*

यवतमाळ, दि 2 नोव्हेंबर, (जिमाका) :- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते, त्याअनुषंगाने सोमवार 7 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाने ऐकूण घेतील व त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. लोकशाही दिनाला उपस्थित राहणाऱ्या अर्जदारांनी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.

पॅन इंडिया कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न* *१३ नोव्हेंबरपर्यंत विविध कायद्यांची करणार जनजागृती*

यवतमाळ दि. 2 नोव्हेंबर (जिमाका) :- जनसामान्य नागरीकांमध्ये कायदेविषयक माहितीचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण,मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने 13 नोव्हेंबर 2022 पर्यंत कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने 1 नोव्हेंबरला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथे पॅन इंडिया कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉक्टर जी.पी. कवडीकर यांचे हस्ते करण्यात आले. सकल भारत कायदेविषयक जनजागृती अभियांतर्गत नागरीकांचे सशक्क्तिकरण आणि “हक हमारा भी तो है' हा कार्यक्रम राबविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देशीत करण्यात केले आहे. १ नोव्हे ते १३ नोव्हेंबर या कालावधीत विविध माध्यामातुन जनतेपर्यंत कयादेविषयक माहिती पोहचविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती कवडिकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, यवतमाळ, के.ए. नहार, वकील मंडळी, पॅरा विधी सेवा स्वंयसेवक, अमोलकचंद विधी महाविद्य

पॅन इंडिया कार्यक्रमांतर्गत कायदेविषयक जनजागृती* *मोफत विधी सेवा कुणाला?*

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 39- क प्रमाणे सर्वांना समान न्याय आणि न्याय सर्वांसाठी या ब्रीद वाक्यानुसार समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेविषयक सहाय्य देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. यानुसार विधी सेवा प्राधिकरणाद्वारे दुर्बल नागरिक मोफत विधी सेवा मिळण्यास पात्र ठरतात. मात्र याबाबतची माहिती नागरिकांना नसल्यामुळे अनेकदा गरिब ,दुर्बल घटकांना त्यांच्या खटल्यासाठी परवडत नसताना वकिल नेमावे लागतात. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांसाठी असलेल्या कायद्यांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी पॅन इंडिया : कायद्यांचा प्रचार व प्रसार हा कार्यक्रम सर्वच न्यायालयांना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. १ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत विविध माध्यमातून नागरिकांच्या हिताच्या कायद्यांची माहिती पोहचविण्यात येणार आहे. *मोफत विधी सेवा मिळण्यास पात्र व्यक्ती* महिला व अठरा वर्षापर्यंतची मुले, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील व्यक्ती, विविध प्रकारची आपत्ती, जातीय हिंसा, पूर, भूकंप पीडित व्यक्ती, तुरुंगात ताब्यात असलेल्या व्यक्ती, मानवी तस्करी, शोषण किंवा वेठबिगारीचे बळी ठरलेल्या व्यक्ती, औद

राष्ट्रीय युवा पुरस्कारकरीता प्रस्ताव आमंत्रित*

यवतमाळ, दि 2 नोव्हेंबर, (जिमाका) :- सन 2020-21 या वर्षाकरिता राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. 15 ते 29 वर्षे या वयोगटातील युवक, युवती आणि नोंदणीकृत संस्था यांनी 6 नोव्हेंबर 2022 पर्यंत विहित शिफारसीसह प्रस्ताव https://awards.gov.in या केंद्र शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. राष्ट्रीय विकास व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य तसेच आरोग्य, संशोधन आणि नाविन्य, सांस्कृतीक, मानवाधिकार, प्रोत्साहन, कला व साहित्य, पर्यटन, परंपरागत औषधी, जागरुक नागरीक, समुदाय सेवा, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात विकासात्मक कार्य आणि स्मार्ट शिक्षण या क्षेत्रात काम करणारे युवक, युवती या पुरस्कारासाठी पात्र आहेत. 15 ते 29 वयोगटातील युवक-युवती व पंजिबध्द संस्था यांनी 6 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईल पध्दतीने भरुन त्या प्रस्तावाच्या प्रती आवश्यक सर्व कागदपत्रांसह व शिफारसीसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ या ठीकाणी सादर करणे आवश्यक आहे. https://awards.gov.in या पोर्टल व्यतीरीक्त इतर मार्गाद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही, असे जिल्हा क्रिडा अधिकारी नं

*28 नोव्हेंबर रोजी ‘सैनिक दरबार’*

यवतमाळ, दि 3 नोव्हेंबर (जिमाका) :- माजी सैनिक, सेवारत सैनिक व त्यांच्या कुटूबियांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली 28 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ज्या माजी सैनिक/सेवारत सैनिक व त्यांचे अवलंबितांच्या वैयक्तिक अडीअडचणी व तक्रार असतील त्यांनी पुराव्यासह सर्व कागदपत्रे, दुरध्वनी क्रमांक व पत्यासह दोन प्रतिमध्ये लेखी स्वरुपात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यवतमाळ येथे 15 नोव्हेंबर 2022 पुर्वी (कार्यालयीन वेळेमध्ये) सादर करून टोकन प्राप्त करावे. यापुर्वी लोकशाही दिनात सादर केलेली तसेच न्याय प्रविष्ठ प्रकरणे स्विकारण्यात येणार नाही. तसेच मुदतीनंतर अथवा ऐनवेळी दिलेल्या अर्जांचा विचार पुढील तक्रार निवारण आयोजनाचे वेळी करण्यात येईल. यवतमाळ जिल्ह्यातील माजी सैनिक/सेवारत सैनिक यांनी सैनिक दरबाराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी केले आहे.

सुरक्षित मातृत्व कार्यक्रमात जिल्ह्यातील संस्था राज्यात पहिली ठरावी* *-जिल्हाधिकारी* *आरोग्य विभागाच्या विविध विषयांचा घेतला आढावा*

* *शासकीय कार्यालय शैक्षणिक संस्था आणि आरोग्य संस्थेच्या १०० मीटर परिसरात धूम्रपान विक्रीस प्रतिबंध करावा* यवतमाळ, दि ३ नोव्हेंबर:- सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमात आपल्या जिल्ह्यातिल आरोग्य संस्थेची गुणात्मक कामगिरी राज्यात पहिल्या तीन आरोग्य संस्थांमध्ये असावी. यासाठी राज्यातील चांगले काम करणारे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण व उपजिल्हा रुग्णालय कशा पद्धतिने काम करतात याची माहिती घेऊन आपल्या जिल्ह्यात तशा पद्धतिने अंमलबजावणी करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयात आज आरोग्य विभागाच्या विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाला सदर सूचना केल्यात. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमन कार्यक्रम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, शालेय आरोग्य कार्यक्रम, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम तसेच गर्भधारणापुर्व व जन्मपुर्व निदान प्रतिबंध कायदा (PCPNDT) अशा विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमामध्ये सर्व गरोदर माता, सहा महिन्

विडमुळे निराधार झालेल्या ३१७ बालकांना बालन्याय निधीतुन आर्थिक सहाय्य* जिल्ह्यास 55 लक्ष रुपये प्राप्त; 31 लक्ष ,61 हजार खर्च कोविडमुळे निराधार झालेल्या उर्वरित बालकांनी तात्काळ अर्ज करावा महिला व बाल विकास विभागाद्वारे मिळाली आर्थिक मदत

यवतमाळ दि. 3 नोव्हेंबर (जिमाका) :- कोविड-19 मुळे अनेकांनी आपले जवळचे व्यक्ती गमावले. जिल्ह्यातील ५१८ बालकांनी आई किंवा वडील कोविडमुळे गमावले आहेत.(मुले- २७३ व मुली २४५)यातील १२ बालकांनी आई-वडील गमावले. या बालकांना सहाय्य म्हणून बाल न्याय निधी अंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यात आले. यामधून ३१७ बालकांना ३१ लक्ष ६१ हजार रुपये निधी त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. उर्वरित बालकांनी या आर्थिक सहाय्यासाठी तात्काळ अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. या निराधार बालकांना शासनाद्वारे विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयाद्वारे महिला व बाल विकास विभागास बाल न्याय निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून कोविड मुळे एक किंवा दोन्ही पालक दगावलेल्या बालकांना त्यांचे शालेय शुल्क, वसतीगृह शुल्क व शालेय साहित्य खरेदी करिता आर्थिक मदत देण्यात येत आहे. या बाल न्याय निधी अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यास ५५ लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला व या निधीतून मार्गदर्शन सूचनानुसार ३१७ कोविड मुळे पालक दगावलेल्या बालकांच्या बँक ख