दोन दिवसात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्या पालकमंत्री संजय राठोड यांच्या सुचना कालवे सल्लागार समितीची बैठक संपन्न यवतमाळ, दि, २5 नोव्हेंबर, जिमाका:- सद्यस्थितीत रब्बी पिकाला पाण्याची आवश्यकता असून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मोठ्या व मध्य प्रकल्पातून पुढील दोन दिवसात पाणी सोडुन शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन मध्ये आयोजित कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री राठोड बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री प्रा.अशोक उइके, डॉक्टर संदीप धुर्वे, ईंद्रनिल नाईक, नामदेवराव ससाने, संजय रेड्डी बोदकुरवार, मदन येरावार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, सिंचन मंडळाचे अध्यक्ष तथा अधिक्षक अभियंता म.ना.राजभोज, उपअधीक्षक अभियंता ग.ल. राठोड उपस्थित होते. यावर्षी पाऊस जास्त झाला असुन सर्व प्रकल्पात मुबलक पाणी साठा आहे. मात्र शेतक-यांना पाणी वेळेत उपलब्ध झाले तरच उपयुक्त ठरेल. त्यामुळे धरणातुन पाणी सोडण्याचे नियोजन तातडिने करण्यात यावे आणि त्याची प्रसिद्धी करावी. सिंचन करणारे शेतकरी आणि पाणी वापर संस्था सक्षम करण्यासाठी त्यांच्या कार्यशाळा, मेळावा घेऊन तज्ञांमार्फत मार्गदर्शन करावे. प्रकल्पनिहाय त्या त्या कार्य क्षेत्रातील आमदारांची बैठक आयोजित करून त्या भागतिल सिंचनासंबंधी असणारे प्रश्न निकाली काढावे. कालवा दुरुस्ती नसल्यामुळे शेवटच्या शेतक-यांपर्यंत पाणी पोहचत नसल्याच्या शेतक-यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नादुरुस्त कालवे दुरुस्त करण्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्यात. सोबतच पाणी पट्टी भरण्या संदर्भातही शेतक-यांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. जिल्ह्यात मागिल वर्षी ९७ हजार हेक्टर सिंचन झाले होते. यावर्षी १ लक्ष २७ हजार हेक्टर सिंचन करण्याचे नियोजन आहे. तसेच उन्हाळी पिकांसाठी सुद्धा पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहीती जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता म. ना. राजभोज यांनी दिली. यावेळी जलसंपदा व जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी