सर्वांनी कर्तव्य पार पाडले तर हक्क आपोआप मिळतील* एस.व्ही. हांडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे प्रतिपादन*

यवतमाळ, दि ९ जिमाका: आर्थिक परिस्थीतीमुळे कुणीही न्यायापासुन वंचित राहू नये. जे न्यायालयामध्ये पोहचु शकत नाही त्यांच्यापर्यंत मोफत विधी सेवेची माहिती पोहचवा. शासकिय सेवेत सर्वांनी आपले कर्तव्य पार पाडले तर हक्क आपोआप मिळतात,असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांनी केले. राष्टीय विधी सेवा दिनानिमित्य विधी साक्षरते बाबत जनजागृती करण्यासाठी आज सकाळी राली काढण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा न्यायालयाचे सभागृहामध्ये आयोजित शिबीरात न्यायमुर्ती श्री हांडे बोलत होते. यावेळी डॉ. जी.पी. कवडीकर, जिल्हा न्यायाधीश-1, यवतमाळ, ए.ए. लऊळकर, जिल्हा न्यायाधीश-2, यवतमाळ तसेच अमित बदनोरे, अध्यक्ष, जिल्हा वकील संघ आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव के.ए. नहार उपस्थीत होते. राष्टीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट् राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशावरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांचे मार्गदर्शनाखाली 31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत पॅन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत गावोगावी दुर्गमभागात जावून जनसामान्यांना मोफत कायदेविषयक माहितीचा प्रचार व प्रसार पॅरा विधी स्वंयसेवकांमार्फत करण्यात येत आहे. 1995 पासुन 9 नोव्हेंबर हा राष्टीय विधी सेवा दिन साजरा करतात. संविधानाने दिलेले अधिकार आणि कायद्याबाबत जेव्हा सर्वांना माहिती होईल तेव्हा या दिनाचे फलित होईल असे श्री हांडे यांनी यावेळी सांगितले. सदर कार्यक्रमामध्ये जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अमित बदनोरे यांनी विधी सेवेमार्फत ज्या काही कायदेशिर सेवा आहेत ते सामान्य नागरीकांपर्यत पोहचविणे हा या मागचा उद्येश असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा न्यायाधीश-1 डाॅ. जी.पी. कवडीकर, जिल्हा न्यायाधीश-2 ए.ए. लउळकर यांनीही समयोचित भाषण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन 5 वे सह दिवाणी न्यायाधीष क.स्तर एस.एस. मतकर, यांनी तर आभारप्रदर्शन के.ए. नहार यांनी केले. यावेळी यवतमाळ न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी, वकील मंडळी, कर्मचारी वर्ग, अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, महात्मा जोतीराव समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, पॅरा विधी स्वंयसेवक मोठया संख्येने उपस्थीत होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी