समाधान शिबिराकरता अर्ज करण्यासाठी मुदत वाढ आता 25 नोव्हेंबर पर्यंत करता येणार अर्ज

यवतमाळ, दि ११ नोव्हेंबर जिमाका :- प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान होऊन जनतेचा वेळ, श्रम व पैशाची बचत व्हावी म्हणून सुवर्ण जयंती महाराज स्वाभिमान अंतर्गत पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या समाधान शिबिरासाठी नागरिकांनी त्यांच्या कोणत्याही समस्येसाठी अर्ज करण्याची मुदत १० नोव्हेंबर पर्यंत देण्यात आली होती. याला आता मुदतवाढ देण्यात आली असून नागरिक 25 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या तक्रारी, समस्या,वैयक्तिक मागणी संदर्भातील अर्ज करू शकतात. सर्व तहसिल कार्यालयामधील समाधान शिबीर कक्षामध्ये नागरीकांचे समाधान शिबिराचे अर्ज स्विकारण्यात येतील. तसेच जिल्हास्तरावर, तालुका स्तरावर सर्व विभागामध्ये तसेच ग्राम स्तरावर ग्रामपंचायती मध्ये निर्माण केलेल्या समाधान शिबीर कक्षाद्वारे नागरीकांचे अर्ज स्विकारण्यात येतिल. तालुकास्तरावर स्विकारण्यात आलेल्या अर्जांना टोकन क्रमांक देण्यात यावेत. विभागप्रमुखांनी कार्यालय स्तरावर स्विकारलेल्या अर्जांना विभागाचे / कार्यालयाचे नाव टाकून तालुक्याचे नाव व क्रमांक टाकून टोकन क्रमांक देण्यात यावा. टोकन क्रमांकामध्ये कुठेही गोंधळ होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. आयोजित समाधान शिबिरासाठी आज पर्यंत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी दिनांक १२ नोव्हेंबरला मारेगाव, वणी, 14 नोव्हेंबर बाबुळगाव, 15 नोव्हेंबर घाटंजी,पांढरकवडा, 16 नोव्हेंबर नेर, दारव्हा, 17 नोव्हेंबर झरी जामणी,18 नोव्हेंबर आर्णी, दिग्रस 22 नोव्हेंबर महागाव, उमरखेड 23 नोव्हेंबर पुसद येथे भेटी देणार आहे. नागरिकांना यादिवशी -जिल्हाधिकारी यांना भेटता येईल. तसेच तक्रार करता येईल.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी