जिल्हा महिला रुग्णालयात स्त्री जन्माचे स्वागत रुग्णालयात झाली पहिली प्रसुती

यवतमाळ, दि 11 जिमाका: जिल्हा महिला व बाल रुग्णालयात ९ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजुन २७ मिनिटांनी पहिली प्रसूती झाली. जिल्हा महिला रुग्णालयात पहिलेच बाळ मुलगी जन्माला आल्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक आर. डी. राठोड यांनी मातेला साडी देऊन व बाळाला कपडे देऊन स्त्री जन्माचे स्वागत केले. शांता पळसकर असे प्रसुत महिलेचे नाव आहे. जिल्हा महिला व बाल रूग्णालय येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे देखील जिल्हा शल्यचिकित्सक यांनी प्रथम प्रसूतीसाठी अभिनंदन केले. स्त्री रोग तज्ञ डॉ. संध्या राठोड यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. रवी पटिल यांच्या मार्गदर्शनाखाली सुखरूप प्रसुती केली. जिल्हा महिला रुगणालय हे शंभर खाटांचे रुग्णालय असून मागील तीन महिन्यापासून सुरू झालेले आहे. तिथे आत्तापर्यंत बाह्य रुग्ण सेवा देण्यात येत होती. ९ नोव्हेंबरपासुन तिथे आंतर रुग्ण सेवा सुद्धा सुरू करण्यात आली आणि पहिली प्रसूती सुखरुप करण्यात आली. जिल्हा स्त्री रुग्णालयात अति जोखमीच्या माता वगळून इतर गरोदर मातांच्या नॉर्मल प्रसूती करण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. इथे सर्व गरोदर मातांची स्त्रीरोगतज्ञमार्फत संपूर्ण वैद्यकीय तपासणी रक्त तपासणी व इतर आवश्यक तपासणी सुद्धा करण्यात येतात. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगलपल्लेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमा बाजोरीया, जिल्हा महिला व बाल रूग्णालय वै. अधीक्षक डॉ. रवी पटिल, विधी सल्लागार पूनम महात्मे, तसेच जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी