समता पर्व आणि मंडणगड पॅटर्नचा शुभारंभ १०१ विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संविधान दौड

यवतमाळ,दि २८, जिमाका - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सामाजिक न्याय भवन येथे शनिवारी संविधान दिनानिमित्त समता पर्व आणि मंडणगड पॅटर्नचा शुभारंभ करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी मंडणगड पॅटर्न अंतर्गत ११ वी व १२ वीच्या विज्ञान शाखेच्या १०१ विद्यार्थ्यांना या शिबिरात जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. बाभुळगाव येथील शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय, नेर, दारव्हा येथील मुंगसाजी महाराज महाविद्यालय, पुसद येथील बाबासाहेब नाईक इंजिनिअरिंग महाविद्यालाय, उमरखेड येथील गोपिकाबाई सितारामजी गावंडे महाविद्यालय, वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालय, कळंब येथील इंदिरा कला महाविद्यालय, शिवरामजी मोघे महाविद्यालय, केळापुर आदी महाविद्यालयाच्या प्रचार्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष माधव कुसेकर होते. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त दिलीपकुमार राठोड, संशोधनअधिकारी मंगला मुन, सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी