चाईल्ड लाईन” से दोस्ती सप्ताहाचे उद्घाटन

यवतमाळ,दि.24 नोव्हेंबर (जिमाका):- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालय, व चाईल्ड लाईन इंडिया फाउंडेशन मुंबई अंतर्गत संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ द्वारा चाईल्ड लाईन 1098 से दोस्ती सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. चाईल्ड लाईन 1098 ही राष्ट्रीय पातळीवरील टोल.फ्री. क्रमांकाची मदत सेवा आहे. याद्वारे 18 वर्षा आतील आपत्कालीन स्थितीतील बालकांना आवश्यक ती संरक्षणात्मक सेवा पुरविण्यात येते. कोणतीही व्यक्ती 1098 या टोल फ्री.क्रमांक वर संपर्क करून अडचणीत सापडलेल्या बालकाला आवश्यक ती मदत पुरवू शकतो. याशिवाय वैद्यकीय सहाय्याची आवश्यकता असलेल्या बालकांना मदत पुरविणे मानसिक,शारीरिक व लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या बालकांना संरक्षण उपलब्ध करून देणे, सापडलेल्या किंवा हरविलेल्या बालकाला त्यांच्या कुटुंबात पुर्नस्थापित करणे, अनाथ व निराधार अथवा निवा-याची आवश्यकता असलेल्या बालकांना निवारा उपलब्ध करून देणे, अल्पवयात होणाऱ्या बालविवाहांना थांबवून बालविवाह प्रथा निर्मूलन करणे बालकामगारांना मुक्त करणे व पुनर्वसनात्मक सेवा पुरविणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत बालकांना आवश्यक ती संरक्षणात्मक सेवा जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने पुरविण्यात येते. 14 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय बालक दिन व 20 नोव्हेंबर रोजी जागतिक बालक दिनाचे औचित्य साधून “चाईल्डलाईन से दोस्ती” सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अमोल यडगे यांनी चाईल्ड लाईन से दोस्ती,स्वाक्षरी रथ व दोस्ती बंधन अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे केले. याप्रसंगी मुख्य कर्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उप जिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे ,उप मुख्यकार्यकारी अधिकारी प्रशांत भोयर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, बालकल्याण समिती अध्यक्ष वासुदेव डायरे, बालकल्याण समिती सदस्य प्राची निलावार, तसेच कामगार अधिकारी प्र.रा. महाले, बालन्याय मंडळ सदस्य ॲड.काजल कावरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, चाइल्ड लाईन 1098 चे जिल्हा केंद्र समन्वयक फाल्गुन पालकर, शासकीय बालगृहाचे शिक्षक व बालके तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड लाईन 1098 चे कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी