Posts

Showing posts from October, 2018

रस्ते सुरक्षा संदर्भात विशेष मोहीम राबविण्याच्या सुचना

Image
v जिल्हाधिकारी कार्यालयात खासदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक यवतमाळ, दि. 31 : रस्त्यांवरील अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तरुणाई कशाचीही तमा न बाळगता वाहने भरधाव वेगाने चालवितात. यात अल्पवयीन वयांच्या मुला-मुलींचासुध्दा समावेश आहे. अल्पवयीन मुले-मुली वाहने चालवितांना दिसली तर त्यांच्यावर तसेच संबंधित पालकांवर कारवाई करण्यात येईल. तसेच भरधाव वाहनांना आळा घालण्यासाठी पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने विशेष मोहीम राबवावी, अशा सुचना खासदार भावना गवळी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ते सुरक्षा संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्या उपस्थित होत्या. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वाढोकार, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले, वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक देवकाते आदी उपस्थित होते. वाहने चालवितांना गाडीची कागदपत्रे जवळ ठेवावी. तसेच ड्रायव्हिंग करतां

एमबीए युवकाने उभारला कुक्कुटपालन व्यवसाय

Image
v अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे 10 लक्ष रुपयांचे कर्ज v वर्षाकाठी चार लक्ष रुपयांचा निव्वळ नफा यवतमाळ, दि. 29 : एखाद्या कंपनीसाठी नोकरी करण्यापेक्षा आपणच व्यवसाय उभारू शकतो, असा आत्मविश्वास असलेल्या तरुणाने नोकरी सोडून कुक्कुटपालनाचा व्यवसाय उभारला आहे. बरं हा तरुण मार्केटिंग ॲन्ड फायनांन्समध्ये व्यवस्थापन शास्त्रातील (एमबीए) पदव्युत्तर आहे. पंकज अरुण आदमाने (वय 34) असे या तरुणाचे नाव असून तो दारव्हा तालुक्यातील पांढूर्णा येथील रहिवासी आहे.   नागपूरमध्ये शिक्षण घेतलेल्या पंकजने बी.कॉम आणि एमबीए केल्यानंतर बुट्टीबोरी एमआयडीसीतील दिनशॉ आईस्क्रीम कंपनीत नोकरी मिळविली. अनुभव आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर तो मार्केटिंग विभागात रुजू झाला. चार वर्षे दिनशॉमध्ये तर तीन वर्षे इतर कंपनीत असे एकूण सात वर्षे पंकजने नोकरी केली. पण आपण हे सर्व कंपनीकरीता करत आहोत. आपलासुध्दा व्यवसाय असावा, असा विचार त्याच्या मनात घोळत होता. अखेर नोकरी सोडून तो दारव्हा तालुक्यातील पांढूर्णा येथे आला. पंकजच्या आईच्या नावावर सात एकर शेती होती. येथे तो शेती करू लागला. शेतीसोबतच जोडधंदा म्

जलयुक्त शिवारमुळे पिकांना मिळाली संजीवनी

Image
v 98 हजार हेक्टरवर सिंचनाची सोय यवतमा ळ, दि. 26 : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी यवतमाळ जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. खरीप हंगामासाठी जुन - जुलै महिन्यात पडलेला पाऊस उपयुक्त ठरला. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा खंड पडल्यामुळे हातचे पीक जाते की काय, अशी परिस्थिती असतांनाच साखरा शिवारात (ता. घाटंजी) जलयुक्तच्या पाण्यामुळे पिकांना संजीवनी मिळाली. या पाण्यामुळेच यंदाचे पीक तरले, अशी प्रतिक्रिया शेतक-याने दिली. साखरा येथील केशव देवराव चौधरी यांच्याकडे साडेपाच एकर शेती आहे. यावर्षी त्यांनी कापूस आणि तूर लावली. सुरवातीला चांगला पाऊस झाला. शेतात पीकेसुध्दा डोलू लागली. मात्र उत्पादन येण्याच्या वेळीच परतीच्या पावसाची आवश्यकता होती. या पावसाने दडी मारल्याने हातचे पीक जाते की काय, असे केशव चौधरी यांना व शिवारातील शेतक-यांना वाटत होते. मात्र साखरा शिवारात नाला खोलीकरण केल्यामुळे त्यात पाणीसाठा झाला. त्यामुळे परिसरातील पाण्याची पातळीसुध्दा वाढली. विशेष म्हणजे हा पाणीसाठा सिमेंट नाला बांधातून ओव्हर फ्लो होऊ लागला. पावसाचा खंड पाहता केशव चौधरी यांनी इंजिन लावून साडेपाच एकरातील क

पांढरकवडा, राळेगाव तालुक्यातील शेतक-यांना दिवसा दहा तास वीज

Image
v पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने 16 कोटी तात्काळ मंजूर यवतमाळ, दि. 26 : पांढरकवडा व राळेगाव तालुक्यातील गावांमध्ये आता दिवसाचे भारनियमन बंद होणार आहे. या तालुक्यातील शेतक-यांना दिवसा दहा तास वीज देण्यात येणार असून आता रात्री-बेरात्री शेतक-यांना ओलित करण्यासाठी शेतात जाण्याची गरज नाही. या निर्णयाने परिसरातील शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पालकमंत्री मदन येरावार आणि शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या पाठपुराव्यामुळे यासाठी 16 कोटी रुपये तात्काळ मंजूर करण्यात आले आहे. पांढरकवडा व राळेगाव तालुक्यात सद्यस्थितीत नरभक्षक टी-वन वाघिणीचा वावर आहे. यासंदर्भात काही दुर्देवी घटनासुध्दा घडल्या आहे. त्यातच या परिसरात दिवसा भारनियमन होत असल्यामुळे शेतक-यांना शेतीचे ओलित करण्यासाठी रात्री-बेरात्री शेतात जावे लागत होते. शेतात काम करतांना शेतक-यांच्या मनात नरभक्षक वाघिणीची भीती राहत होती. ही भीती दूर करून शेतक-यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार आणि किशोर तिवारी यांनी या परिसरात दिवसाचे भारनियमन बंद करण्यासाठी पाऊले उचलली. याबाबत मुख्यमंत्री व वित्तमं

‘एक दिवस मतदारांसोबत’ मोहिमेंतर्गत 11 हजार नवमतदारांचे अर्ज प्राप्त

जिल्ह्यात आतापर्यंत 60 हजार नवीन नोंदणी   यवतमाळ, दि. 26 : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मतदार यादी शुध्दीकरणाचे काम   सुरु आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात ‘ एक दिवस मतदारांसोबत ’ ही मोहीम नुकतीच राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी 10 हजार 952 नवमतदारांनी नमुना 6 चे अर्ज भरुन दिले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने 18 वर्षावरील सर्व व्यक्तींचे नाव मतदार यादीत समाविष्ठ करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 24 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील 2 हजार 491 मतदार नोंदणी अधिकारी व 3 हजार 888 कर्मचारी असे एकूण 6 हजार 379 अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले. यात नवीन मतदारांची नोंदणी करणे, मय्यत, दुबार व स्थलांतरीत मतदारांना वगळणे आदी कामे करण्यात आली. या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघातील 10 हजार 952 नवमतदारांनी नमुना अर्ज 6 भरून दिला. यात 76 - वणी   मतदार संघात 1721, 77-राळेगाव मतदार संघात 1153, 78-यवतमाळ मतदार संघात 922, 79-दिग्रस मतदार संघात 2045, 80-आर्णी मतदार संघात 1574, 81-पुसद मतदार सं

आरोग्य विभागामार्फत जनजागृती रॅली

Image
v विविध उपक्रमांत सहभाग नोंदविणा-यांना बक्षीस वितरण यवतमाळ, दि. 25 : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यामाने आरोग्य विभागाच्यावतीने जनजागृती रॅली काढण्यात आली. पोस्टल ग्राऊंड येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते सायकल व पायदळ रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री. मनीष श्रीगिरीवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगलपल्लेवार, आय.एम.ए. अध्यक्ष डॉ. अनुप कोठारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ढोले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.पवार आदी उपस्थित होते. सदर रॅली पोस्टल ग्राउंड येथून एलआयसी चौकमार्गे गार्डन रोड, बसस्टँड चौक, दत्त मंदिर, नेताजी चौक, महादेव मंदिर रोड, एलआयसी चौक व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅलीची सांगता झाली. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश

मंजूर लाभार्थ्यांना त्वरीत कार्यारंभ आदेश द्या – जिल्हाधिकारी

Image
v दिग्रस येथे पंतप्रधान शहरी आवास योजनेचे भुमिपूजन यवतमाळ, दि. 25 : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरी व ग्रामीण भागात 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे हा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र व राज्य शासनाने मिशन मोडवर घेतला आहे. सुरवातीला यात अमृत शहरे व ‘ब’ वर्ग नगर पालिका समाविष्ठ करण्यात आल्या होत्या. आता मात्र सर्व नगर पालिका व नगर पंचायतींचा यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधान शहरी आवास योजनेंतर्गत मंजूरी मिळालेल्या लाभार्थ्यांना बांधकामासाठी त्वरीत कार्यारंभ आदेश देण्यात यावा, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केल्या. दिग्रस शहरातील विठ्ठलनगर व पाटील नगर येथे पंतप्रधान शहरी आवास योजनेचे भुमिपूजन व लाभार्थ्यांना मंजूरी आदेश देतांना ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, नगर पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, तहसीलदार किशोर बागडे, नगर पालिका मुख्याधिकारी शेषराव टाले आदी उपस्थित होते. मंजूरी मिळालेल्या लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम तात्काळ पूर्ण करावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, दिग्रस नगर पालिकेअंतर्गत एकूण 275 लोकांना

एक दिवस मतदारांसोबत मोहीम जिल्हाधिका-यांनी दिल्या घरोघरी भेटी

Image
v नागरिकांनी मतदार नोंदणीमध्ये सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन यवतमाळ, दि. 24 : जिल्हा प्रशासनाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात मतदार याद्यांच्या पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात मतदार नोंदणीकरीता विशेष मोहीम, घरोघरी भेटी आदींचा समावेश आहे. आज (दि.२४) राबविण्यात आलेल्या एक दिवस मतदारांसोबत या मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यवमाळ येथे घरोघरी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी नवमतदारांकडून नमुना – ६ अर्ज भरून घेतले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, मतदार नोंदणी अधिकारी आदी उपस्थित होते. मतदार नोंदणीकरीता जिल्हा प्रशासनापासून तर ग्रामस्तरापर्यंतचे सर्व अधिकारी-कर्मचारी घरोघरी पोहचत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, मतदार यादी परिपूर्ण आणि अचूक करण्यासाठी या मोहिमेत नागरिकांनी सक्रीय सहभाग घ्यावा. मतदार यादीत चूक असेल तर त्याची दुरुस्ती करण्याच्या सुचना संबंधितांना कराव्यात. तसेच आपले नाव, छायाचित्र आदी बाबी यादीत समाविष्ठ आहे की नाही, याची तपासणी करावी. जिल्ह्यातील महाविद्यालयांच्य

गोवर-रुबेला लसीकरण मोहीम 100 टक्के बालकांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट ठेवा – सीईओ जलज शर्मा

Image
यवतमाळ, दि. 23 : गोवर या रोगाचे निर्मुलन होण्याकरीता तसेच रुबेला या रोगावर नियंत्रण मिळविण्याकरीता संपूर्ण राज्यात नोव्हेंबरमध्ये गोवर - रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. 9 महिने पूर्ण व 15 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील जवळपास 7 लक्ष बालकांना या मोहिमेदरम्यान लस देण्यात येणार आहे. या लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी यंत्रणेने 100 टक्के बालकांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट ठेवावे, अशा सुचना जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी केले. गोवर-रुबेला लसीकरणच्या जिल्हा कार्यबल गटाच्या बैठतीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी मनोज तगलपल्लेवार, जागतिक आरोग्य संघटना यवतमाळ शाखेचे प्रतिनिधी डॉ. दिलीप देशमुख, जिल्हा समन्वयक डॉ. पी.एस. चव्हाण आदी उपस्थित होते. या मोहिमेकरीता विद्यार्थ्यांचा डाटा महत्वाचा आहे, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा म्हणाले, प्रत्येक पालकांना या मोहिमेबद्दल अवगत करणे आवश्यक आहे. त्यासाठी मोबाईलवर ध्वनीचित्रफित, मॅसेज आदींचा उपयोग कर

गोवर-रुबेला लसीकरण मोहीम 100 टक्के बालकांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट ठेवा – सीईओ जलज शर्मा

Image
यवतमाळ, दि. 23 : गोवर या रोगाचे निर्मुलन होण्याकरीता तसेच रुबेला या रोगावर नियंत्रण मिळविण्याकरीता संपूर्ण राज्यात नोव्हेंबरमध्ये गोवर - रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. 9 महिने पूर्ण व 15 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील जवळपास 7 लक्ष बालकांना या मोहिमेदरम्यान लस देण्यात येणार आहे. या लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी यंत्रणेने 100 टक्के बालकांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट ठेवावे, अशा सुचना जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी केले. गोवर-रुबेला लसीकरणच्या जिल्हा कार्यबल गटाच्या बैठतीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी मनोज तगलपल्लेवार, जागतिक आरोग्य संघटना यवतमाळ शाखेचे प्रतिनिधी डॉ. दिलीप देशमुख, जिल्हा समन्वयक डॉ. पी.एस. चव्हाण आदी उपस्थित होते. या मोहिमेकरीता विद्यार्थ्यांचा डाटा महत्वाचा आहे, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा म्हणाले, प्रत्येक पालकांना या मोहिमेबद्दल अवगत करणे आवश्यक आहे. त्यासाठी मोबाईलवर ध्वनीचित्रफित, मॅसेज आदींचा उपयोग कर

मतदार नोंदणी विशेष मोहिमेदरम्यान 27 हजार नवमतदारांचे अर्ज प्राप्त

v जिल्ह्यातील 2491 मतदान केंद्रावर चावडी वाचन v जिल्ह्यात 56 हजार मतदारांची नोंदणी यवतमाळ, दि. 22 : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.   या अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदार नोंदणीच्या तीन विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. यात एकूण 27 हजार 873 नवमतदारांचे नमुना – 6 चे अर्ज भरून घेण्यात आले. तर आतापर्यंत जिल्ह्यात 56 हजार मतदारांनी नोंदणी केली आहे. 30 सप्टेंबर 2018 रोजी राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी विशेष मोहिमेत 9482 अर्ज, 14 ऑक्टोबरच्या मोहिमेत 12032 अर्ज तर 21 ऑक्टोबरच्या विशेष मोहिमत 6359 नवमतदारांचे अर्ज भरण्यात आले. 28 ऑक्टोबर रोजी पुन्हा विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. मतदार याद्यांचे शुध्दीकरण करण्याच्यादष्टीने दिनांक 1 जानेवारी 2019 रोजी वयाचे 18 वर्ष पूर्ण होणा-या नवमतदारांना समाविष्ठ करणे, मयत, स्थलांतरीत व दुबार मतदार वगळणे हा कार्यक्रम जिल्हयात सर्वत्र राबविण्यात येत आहे. जिल्हयामध्ये एकूण 2491 मतदान केंद्रावर चावडी वाचन कार्यक्रम राबविण्

पालकमंत्र्यांनी घेतली कालवे सल्लागार समितीची बैठक

Image
यवतमाळ, दि. 20 : जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांच्या कालवे सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री मदन येरावार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, सिंचन विभागाचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काटपिल्लेवार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, जिल्ह्यात यावर्षी पाणीसाठा मुबलक असल्यामुळे पाण्याचे नियमित आरक्षण ठेवा. पाण्याची मागणी आली तसे पाणी सोडण्याचे नियोजन करावे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. सिंचन विभागाने पाणी सोडण्यापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. शेतक-यांकडून जेथे पाण्याची मागणी येत असेल तेथे शेतीसाठी पाणी सोडावे. जो पाणीसाठा उपलब्ध आहे, त्यातून आता रब्बीचे व्यवस्थित नियोजन करावे, अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या. यावेळी प्रकल्पाचे वार्षिक पाणी नियोजन करणे, प्रकल्पांची निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र यातील तफावतीबाबत