रस्ते सुरक्षा संदर्भात विशेष मोहीम राबविण्याच्या सुचना


v जिल्हाधिकारी कार्यालयात खासदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक
यवतमाळ, दि. 31 : रस्त्यांवरील अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तरुणाई कशाचीही तमा न बाळगता वाहने भरधाव वेगाने चालवितात. यात अल्पवयीन वयांच्या मुला-मुलींचासुध्दा समावेश आहे. अल्पवयीन मुले-मुली वाहने चालवितांना दिसली तर त्यांच्यावर तसेच संबंधित पालकांवर कारवाई करण्यात येईल. तसेच भरधाव वाहनांना आळा घालण्यासाठी पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने विशेष मोहीम राबवावी, अशा सुचना खासदार भावना गवळी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ते सुरक्षा संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्या उपस्थित होत्या. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वाढोकार, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले, वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक देवकाते आदी उपस्थित होते.
वाहने चालवितांना गाडीची कागदपत्रे जवळ ठेवावी. तसेच ड्रायव्हिंग करतांना मोबाईचा वापर करू नये. अल्पवयीन मुलांच्या हाती पालकांनी वाहने देऊ नये. तसेच स्कूल बस आणि स्कूल ऑटोचालकांवर नियमित लक्ष ठेवावे. ऑटोचालकांनी विद्यार्थ्यांच्या स्कूलबॅग आतमध्ये ठेवाव्या आदी सुचना यावेळी खासदार भावना गवळी यांनी केल्या.
यावेळी रस्त्यावरील अपघातास कारणीभूत ठरणा-य घटकांचा अभ्यास, प्रोटोकॉलनुसार ब्लॅकस्पॉटची ओळख, रस्ता सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी करणे, अपघातांची संख्या कमी करण्यासाठी विशिष्ट नियोजन करून कार्यवाही करणे, वेग मर्यादा व वाहतूक नियंत्रण करणे, जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानास प्रोत्साहन देणे आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी