‘एक दिवस मतदारांसोबत’ मोहिमेंतर्गत 11 हजार नवमतदारांचे अर्ज प्राप्त


जिल्ह्यात आतापर्यंत 60 हजार नवीन नोंदणी  
यवतमाळ, दि. 26 : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मतदार यादी शुध्दीकरणाचे काम  सुरु आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात एक दिवस मतदारांसोबतही मोहीम नुकतीच राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी 10 हजार 952 नवमतदारांनी नमुना 6 चे अर्ज भरुन दिले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने 18 वर्षावरील सर्व व्यक्तींचे नाव मतदार यादीत समाविष्ठ करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 24 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील 2 हजार 491 मतदार नोंदणी अधिकारी व 3 हजार 888 कर्मचारी असे एकूण 6 हजार 379 अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले. यात नवीन मतदारांची नोंदणी करणे, मय्यत, दुबार व स्थलांतरीत मतदारांना वगळणे आदी कामे करण्यात आली. या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघातील 10 हजार 952 नवमतदारांनी नमुना अर्ज 6 भरून दिला. यात 76 - वणी  मतदार संघात 1721, 77-राळेगाव मतदार संघात 1153, 78-यवतमाळ मतदार संघात 922, 79-दिग्रस मतदार संघात 2045, 80-आर्णी मतदार संघात 1574, 81-पुसद मतदार संघात 2472, 82-उमरखेड मतदार संघातील 1065 नवमतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात आजपर्यंत मतदार यादी पुर्नरिक्षण कार्यक्रमात एकूण 60099 अर्ज प्राप्त झाले आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी