Posts

Showing posts from 2019

ध्वजदिन निधी संकलनासाठी सढळ हाताने मदत करा - जिल्हाधिकारी जलज शर्मा

Image
Ø ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा यवतमाळ ,   दि.   09 : कर्तव्य बजावत असतांना सिमेवर वीरमरण आलेल्या शहिदांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येतात. त्यासाठी संपूर्ण देशात, राज्यात, जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकलित केला जातो. शहिदांच्या कुटुंबियांसाठी राबविण्यात येणा-या या योजनांकरीता ध्वजदिन निधीच्या माध्यमातून सर्वांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने बचत भवन येथे आयोजित ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून पोलिस अधिक्षक मेघनादन राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, सा.बा.विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, माजी कॅप्टन दिनेश तत्ववादी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ उपस्थित होते. ध्वजदिन निधी 2018 संकलनाचा शुभारंभ झाला, असे जाहीर करून जलज शर्मा म्हणाले, ध्वजदिन निधी संकलनात यवतमाळ जिल्हा हा अग्रेसर

आरोग्य विभागातार्फत एड्स प्रतिबंधकबाबत जनजागृती रॅली

Image
यवतमाळ दि. 04 : जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक यांच्या माध्यमातून जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी जनजागृती रॅलीस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. यावेळी त्यांनी शपथेच्या माध्यमातून युवकांना एचआयव्हीबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. सदर रॅलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगडपल्लेवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बाळासाहेब चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ढोले तसेच अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे डॉ. मनोज सक्तेपार, एआरटीचे विभागाचे डॉ. अविनाश बोरीकर उपस्थित होते. यवतमाळ शहरातील विविध संघटना, अशासकीय संस्था, आयएमए, निमा, रोटरी, लायन्स क्लब, फॅक्सी, वायओजीएस, संकल्प फाऊंडेशन, टिडीआरएफ, चाईल्ड लाईन कै. बाळासाहेब पांडे पतसंस्था यांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी, रक्तपेढी विभाग तसेच ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, आयटीआय कॉ

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व राष्ट्रीय निवृत्ती योजना सप्ताह

Image
* जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक यवतमाळ दि.01 : असंघटित कामगारांकरिता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व लघु व्यापाऱ्यांकडून राष्ट्रीय निवृत्ती योजना सप्ताह 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आढावा बैठक घेतली. यावेळी सरकारी कामगार अधिकारी रा.रा. काळे यांनी दोन्ही योजनांबाबत माहिती दिली. तसेच नागरी सुविधा केंद्र (सीएससी) च्या माध्यमातून सादरीकरण केले. या योजनेत सर्व संघटित कामगार व किरकोळ व्यापारी / दुकानदार किंवा स्वयंरोजगार करणारा, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, फेरीवाले, शेतमजूर, गृह उद्योगातील कामगार, माथाडी कामगार, बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यासारख्या विविध व्यवसाय गटातील असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व लघू व्यापाऱ्यांकरीता राष्ट्रीय निवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत असंघटीत क्षेत्रातील पात्र कामगारांनी तसेच किरकोळ व्यापारी / दुकानदार आदींनी नोंदणी करावी, असे आवाहन

ढाणकी नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

* 29 डिसेंबर रोजी मतदान यवतमाळ दि. 01 : ढाणकी नगरपंचायतीचे अध्यक्ष व सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार रविवार दिनांक 29 डिसेंबर 2019 रोजी मतदान होणार आहे. ढाणकी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पासून ते 12 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाइटवर भरण्याकरिता उपलब्ध असेल. तर नामनिर्देशन पत्र दिनांक 4 ते 12 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येईल. रविवार व सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार नाही. नामनिर्देशन पत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशन झालेल्या उमेदवारांची यादी शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम दिनांक बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2019 आहे. अपील असल्यास अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी 20 डिसेंबर पर्यंत केली जाईल. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्य

महिला ह्या उत्कृष्ट व्यवस्थापक – जिल्हाधिकारी गुल्हाने

Image
v ‘ एसबीआय चावडी’ उपक्रमाचे उद्घाटन यवतमाळ दि.27 : ‘चूल आणि मूल’ या पांरपरिक संकल्पनेतून महिला कधीच्याच बाहेर पडल्या आहेत. आज कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात महिलांचा वाटा आहे. दैनंदिन व्यवहारातील जमाखर्च, मुलांचे शिक्षण, घरचा ताळेबंद आदी जबाबदा-या त्या समर्थपणे सांभाळत आहेत. एकप्रकारे महिला ह्या उत्कृष्ट व्यवस्थापकाची भुमिका निभावत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले. पोस्टल ग्राऊंड येथे भारतीय स्टेट बँकेच्या क्षेत्रीय व्यवस्थापक कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘एसबीआय चावडी’ उपक्रमाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसबीआयचे उपमहाप्रबंधक रजत बॅनर्जी, अपर पोलिस अधिक्षक नुरूल हसन, क्षेत्रीय व्यवस्थापक सुहास ढोले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक डॉ. रंजन वानखेडे आदी उपस्थित होते. बँकेच्या वेगवेगळ्या योजना लाभार्थ्यांना कळाव्यात, या उद्देशाने भारतीय स्टेट बँकेच्यावतीने दोन दिवसीय चावडी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हान

घरफोडी करणारी कुख्यात आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Image
v स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई v 11 घरफोडीचे गुन्हे उघडकीस, 9 लाखांचा मुद्देमाल हस्तगत यवतमाळ, दि. 22 : भरदिवसा घरफोडी करणारी बुलढाणा जिल्ह्यातील आंतरराज्यीय टोळीला यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला असलेले 11 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी या टोळीकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला.   गेल्या काही दिवसांमध्ये यवतमाळ जिल्ह्यात दिवसा घरफोडीच्या धाडसी चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पोलिस अधीक्षक मेघनादन राजकुमार यांनी सदर चोऱ्या तात्काळ उघडकीस आणण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक प्रदीप शिरस्कर यांना विशेष पथक स्थापन करण्याच्या सुचना दिल्या. घडफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा सुगावा लावण्याकरीता या पथकाद्वारे राज्यातील विविध जिल्ह्याचे अभिलेख पडताळण्याचे काम हाती घेण्यात आले. चोरी करणा-या गुन्हेगारांच्या हालचालीची माहिती घेत असतांनाच 15   ऑक्टोबर 2019 रोजी पुसद शहरातील शिवाजी नगर व श्रीनगर या भागात अवघ्या चार   तासामध्ये पाच बंद घरे फोडून दिवसा घरफोड्या झाल्या होत्या. त्यामुळे घरफोड्या करणा-या अज्ञात

ग्राहक म्हणून चिकित्सक वृत्ती ठेवा – निवासी उपजिल्हाधिकारी

Image
v ‘जागो   ग्राहक जागो’ अंतर्गत सदस्यांचे प्रशिक्षण यवतमाळ दि.22 : भारत ही जगासाठी सर्वात मोठी व विश्वसनीय बाजारपेठ आहे. विकसनशील देशात अनेक बाबी विकण्यावर कंपन्यांचा जोर असतो. विविध प्रकारच्या जाहिरातींमधून आल्यावर उत्पादनांचा भडीमार सतत सुरू असतो. त्यामुळे ग्राहक म्हणून आपली फसवणून होणार नाही, यासाठी चिकित्सक वृत्ती जागृत ठेवा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी केले. बचत भवन येथे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमार्फत ‘जागो ग्राहक जागो’ या मोहिमेअंतर्गत अशासकीय सदस्यांच्या प्रशिक्षणात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी शालीग्राम भराडी, सहाय्यक पुरवठा अधिकारी एकनाथ बिजवे, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे हेमराज ठाकूर, नारायण मेहरे, हितेश सेठ, ॲङ अनुपमा दाते, वैधमापन शास्त्राचे सहाय्यक नियंत्रक श्री. ढाले, चंदू चांदोरे आदी उपस्थित होते. दैनंदिन जीवनात आपण प्रत्येक जण ग्राहक आहोत, असे सांगून निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे म्हणाले, सेवा देतांना किंवा वस्तु खरेदी करता

केंद्रीय पथकाने केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

Image
     यवतमाळ, दि. 22 : अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची पाहणी केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ.आर.पी.सिंग यांनी केली. नेर तालुक्यातील वटफळी, लोणी, मोझर, घारेफळ आणि सातेफळ येथील नुकसानग्रस्त सोयाबीन, कपाशी, मुग, उडीद आदी पिकांच्या नुकसानीचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आदी उपस्थित होते. वटफळी येथील ओंकार खोब्रागडे यांच्या शेतातील सोयाबीनची गंजी, लोणी येथे श्री. बाफना यांच्या शेतातील नुकसानग्रस्त कपाशीचे बोंड, मोझर येथील राजेंद्र साखरकर, घारेफळ येथील अनिल खोडे यांच्या शेतातील नुकसानग्रस्त कपाशी, सोयाबीन आदींची त्यांनी पाहणी केली. तर सातेफळ येथे शेतकऱ्यांनी नुकसान झालेले सोयाबीन, कपाशी, मुग, उडीद आदी शेतमाल गावाच्या चौफुलीवर आणून त्याचे दुकान थाटले होते. या दुकानातील नुकसानग्रस्त शेतमालाची पाहणी करून केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. सातेफळ येथे यशवंत देशमुख यांनी नुकसानग्रस्त मालाबद्दल डॉ.आर.पी. सिंग यांना माहिती दिली. अवकाळी व सततच्या पावसामुळे पूर्ण धान्य हातून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच ल

घरकूल योजनेसाठी बिटरगावचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

Image
यवतमाळ दि.21 : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत घरकूल योजनेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल उमरखेड तालुक्यातील बिटरगाव (बु.) ग्रामपंचायतीचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गावचे सरपंच प्रकाश पेंधे व लाभार्थी रुखमाबाई दासरवाड यांच्यासह जिल्हा परिषदेच्या टिमने राज्यपालांच्या हस्ते हा गौरव स्वीकारला. नरीमन पॉईंट मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, अपर सचिव असीम गुप्ता, ग्रामीण गृहनिर्माणच्या राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लाभार्थी रुखमाबाई दासरवाड व सरपंच प्रकाश पेंधे यांनी उपस्थितांसमोर मनोगत मांडले. यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी जलज शर्मा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानच्या जिल्हा समन्वयक अर्चना हिवराळे, प्रशांत कारमोरे यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने घरकूल योजनेत विशेष क

वनराई बंधा-यांसाठी श्रमदान करा – जिल्हाधिकारी गुल्हाने

Image
v बालकदिनी चिमुकल्यांसोबत बांधला बंधारा यवतमाळ , दि. 14 : पावसाळ्यातील मान्सूनचा पाऊस व परतीच्या पावसामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यातील नदी-नाले वाहू लागले आहे. वाहणारे हे पाणी आपल्या शिवारात अडविले तर पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही तसेच जमिनीतील पाण्याच्या पातळीतसुध्दा वाढ होईल. वनराई बंधारा बांधून हे पाणी शिवारातच अडविणे सहज शक्य आहे. त्यामुळे आपल्या गावाचे जलसमृध्दीचे स्वप्न साकारण्यासाठी वनराई बंधा-याच्या बांधकामाकरीता श्रमदान करा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात वनराई बंधाराबाबत आयोजित विविध सामाजिक संघटनाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, तहसीलदार कुणाल झाल्टे आदी उपस्थित होते. वनराई बंधारा बांधण्यासाठी वेळेचे बंधन असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, पुढील पंधरा दिवसात जिल्ह्यात जवळपास पाच हजार वनराई बंधारा बांधण्याचे नियोजन आहे. गावात वनराई बंधारा बांधण्यासाठी सध्याची वेळ उपयुक्त आहे. पुढील

जिल्हाधिका-यांच्या हस्ते वनराई बंधा-याचे उद्घाटन

Image
v जिल्ह्यात लोकसहभागातून बंधारे बांधण्याचा संकल्प यवतमाळ , दि. 13 : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नदी, नाले, आणि ओढ्यांमधून पाणी वाहत आहे. वाहणारे हे पाणी अडवून मृद आणि जलसंधारणाची चळवळ वृध्दींगत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प केला आहे. याच धर्तीवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी राळेगाव तालुक्यातील मौजे वाटखेड येथे वनराई बंधा-यांचे उद्घाटन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, राळेगावचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार डॉ. रविंद्रकुमार कानडजे, गटविकास अधिकारी रविकांत पवार, तालुका कृषी अधिकारी श्री. प्रधान आदी उपस्थित होते.   जिल्ह्यात यावर्षी पुरेसा पाऊस झाला असून नदी नाल्यातून वाहणारे पाणी अडविणे आणि जिरविणे हयासाठी वनराई बंधारे उपयुक्त ठरतात. या दृष्टीने राळेगाव तालुक्यामध्ये 300 वनराई बंधारे निर्माणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मौजे वाटखेड येथील नाल्यावर लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला असून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते या वनराई बंधाऱ्याच्या निर्माण कार्याचे उद्

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे अहवाल तात्काळ सादर करा - पालकमंत्री मदन येरावार

Image
v   तिवसा, बोधबोडण, हिवरी, अकोलाबाजार आदी गावातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी यवतमाळ , दि. 04 : जिल्ह्यात अतिवृष्टीने सोयाबिन, कपाशी, तुर, फळबागा, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे आहे. या शेतकऱ्यांना दिलाशा देण्यासाठी संबंधीत यंत्रणेने तात्काळ सर्व्हे करून अहवाल पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या तिवसा, बोधबोडण, हिवरी, भांब, रुई, अकोलाबाजार, खैरगाव, मांजर्डा, कामठवाडा, आकपूरी, कारेगाव, वडगाव, चिचघाट आदी ठिकांचा शेतमालाची पाहणी करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जि.प.चे सदस्य रेणूका शिंदे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, यवतमाळचे उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, तहसिलदार झालटे, यवतमाळचे उपविभागीय कृषी अधिकारी कैलाश वानखेडे आदी उपस्थित होते. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने भरघोष तरतुद केली आहे, असे सां

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासोबत स्नेहमिलन कार्यक्रम

Image
v जिल्हाधिकारी कार्यालय व ऋणमुल संस्था यांचा उपक्रम यवतमाळ, दि. 03 : जिल्हाधिकारी कार्यालय व मुंबई येथील ऋणमुल संस्था यांच्यावतीने जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब   व त्यांच्या पाल्यांसोबत स्नेहमिलनाचा   कार्यक्रम जिहाधिकारी कार्यालय येथे पार पडला. यावेळी ट्रस्टचे सचिव तथा संचालक ग्रामीण गृहनिर्माण धनंजय माळी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा आणि निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी   सदर कुटुंबाला व त्यांच्या पाल्याना मार्गदर्शन केले. वडिलांचे छत्र हरवलेल्या या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी साहाय्य करत असताना मुलाच्या आईला उपजीविकेचे साधन मिळवून देऊन कुटुंबाला आर्थिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्यातील आजी-माजी वरिष्ठ सनदी अधिकारी व उद्योगक्षेत्रातील प्रमुख व्यक्तींच्या संकल्पनेतून ऋणमुल ही संस्था अस्तित्वात आली. यात माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड (ट्रस्टचे अध्यक्ष), निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, माजी मुंबई पोलीस आयुक्त अरुप पटनाईक, ठाण

नुकसानग्रस्त कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही - आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके

Image
                                                           v अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी यवतमाळ , दि. 03 : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतक-यांच्या शेतमालाला चांगलाच फटका बसला आहे. केवळ सोयाबीनच नाही तर कपाशी, तूर आदी पिकांचेसुध्दा नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईसाठी शासनाने दहा हजार कोटींची तरतूद केली आहे. शेतक-यांना दिलासा देण्यासाठी त्वरीत सर्व्हे करून अहवाल पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहे. शासनाच्या मदतीपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले. बाभुळगाव तालुक्यातील वाटखेट, झपाटखेडा, कोटंबा आदी ठिकाणच्या नुकसानग्रस्त शेतांची त्यांनी पाहणी करून आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. अडचणीच्या या काळात पीक विम्याच्या रकमेपासून कोणीही सुटता कामा नये, असे सांगून आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके म्हणाले, सोयाबीनला तर फटका बसलाच आहे. याशिवाय परिसरातील कपाशी, तूर आदी पिकेसुध्दा हातची गेली आहेत. गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांनी सर्व्हे करतांना सर्व पिकांचा संयुक्त सर्व्हे करा