ढाणकी नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर



* 29 डिसेंबर रोजी मतदान
यवतमाळ दि. 01 : ढाणकी नगरपंचायतीचे अध्यक्ष व सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार रविवार दिनांक 29 डिसेंबर 2019 रोजी मतदान होणार आहे.
ढाणकी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पासून ते 12 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाइटवर भरण्याकरिता उपलब्ध असेल. तर नामनिर्देशन पत्र दिनांक 4 ते 12 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येईल. रविवार व सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार नाही. नामनिर्देशन पत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशन झालेल्या उमेदवारांची यादी शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम दिनांक बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2019 आहे. अपील असल्यास अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी 20 डिसेंबर पर्यंत केली जाईल. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी राहिल. निवडणूक मतदान रविवार दिनांक 29 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत घेण्यात येईल. मतमोजणी व निकाल 30 डिसेंबर रोजी जाहीर केला जाईल.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी, भूसंपादन लाभक्षेत्र, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांची तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार महागाव आणि ढाणकी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी