Posts

Showing posts from May, 2019

रखडलेल्या पाणी पुरवठा योजना त्वरीत पूर्ण करा - पालकमंत्री

Image
v जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळासंदर्भात आढावा बैठक यवतमाळ, दि. 31 : भविष्यात जिल्ह्याला टँकरमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल, राष्ट्रीय पेयजल तसेच विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे गावागावातील रखडलेल्या पाणी पुरवठा योजना त्वरीत पूर्ण करण्यासाठी अधिका-यांनी गांभिर्याने कामे करावीत, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते. नागरिकांना पाणी मिळावे म्हणून गावांमधील पाणी पुरवठा योजनांसाठी दोन वर्षात जवळपास 13 कोटी रुपये देण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, जिल्ह्यातील सर्व पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी स्त्रोतासाठी प्रस्तावित करा. विहीर अधिग्रहण आणि टँकरबाबतच्या प्रस्तावांचे अधिकार आता उपविभागीय स्तरावर देण्यात आले आहे. ज्या नागरिकांनी प्रकल्पांसाठी आपल्या जमिनी दिल्या अशा पुनर्वसित गावांमध

मतमोजणीकरीता 317 अधिकारी-कर्मचा-यांची नियुक्ती

Image
v प्रशासनातर्फे तयारी पूर्ण यवतमाळ, दि. 21 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 ची मतमोजणी गुरुवार दि. 23 मे रोजी यवतमाळ येथील दारव्हा रोडवरील शासकीय धान्य गोदामात होणार आहे. या मतमोजणीकरीता एकूण 317 अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आाली असून मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. 14 – यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल 2019 रोजी मतदान घेण्यात आले. या लोकसभा मतदारसंघात 34 – वाशिम, 35 – कारंजा, 77 – राळेगाव, 78 – यवतमाळ, 79 – दिग्रस आणि 81 – पुसद या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. प्रत्यक्ष मतदानापासून जवळपास दीड महिन्याच्या अंतराने म्हणजे येत्या 23 मे मतमोजणी होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने 107 मतमोजणी पर्यवेक्षक, 102 सहाय्यक आणि 108 सुक्ष्मनिरीक्षक असे एकूण 317 अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरवात होईल. शासकीय धान्य गोदामाच्या हॉल क्रमांक 1 मध्ये वाशिम विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी, हॉल क्रमांक 2 मध्ये कारंजा मतदारसंघ, हॉल क्रमांक 3 मध्ये राळेगाव, हॉल क्रमांक 4 मध्ये यवतमाळ, हॉल

मतमोजणीच्या दिवशी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू

यवतमाळ, दि. 21 : यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघाची मतमोजणी ही दिनांक 23 मे 2019 रोजी शासकीय धान्य गोदाम, दारव्हा रोड, यवतमाळ येथे होणार आहे. यवतमाळ शहरातील तसेच जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहणे आवश्यक असल्याची बाब विचारात घेता फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) अन्वये यवतमाळ जिल्ह्यात मतमोजणीच्या दिवशी (दिनांक 23 मे 2019) रोजी मतमोजणी केंद्रावर (शासकीय धान्य गोदाम, दारव्हा रोड, यवतमाळ) परिसरात जमाव करण्यास, मतमोजणी केंद्रावर मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट व ईतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्यास तसेच वाहनाचा मतमोजणी परिसरात अनाधिकृत प्रवेश यावर बंदी घालणे आवश्यक असल्याने मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिघाच्या आत भ्रमणध्वनी, तारविरहीत दुरध्वनी आणि बिनतारी संदेश संच इ. बाळगण्यास किंवा वापरण्यास कोणत्याही व्यक्तींना मुभा नाही. हा आदेश यवतमाळ शहराकरीता दिनांक 23 मे 2019 रोजी सकाळी 6 वा. पासून ते मतमोजणी प्रक्रीया संपेपर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात य

मतमोजणीच्या दिवशी दारव्हा रोड, शासकीय गोदाम रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद

यवतमाळ, दि. 21 : दिनांक 23 मे 2019 रोजी यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय धान्य गोडाऊन, दारव्हा रोड, रेल्वे क्रॉसींग जवळ यवतमाळ येथे होणार आहे. सदर मतमोजणी दरम्यान निवडणूक निकाल जाहिर होणार असल्याने सर्व पक्षाचे कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी दरम्यान यवतमाळ शहरातून बसस्थानक चौक ते दारव्हा रोडने जाणारी व येणारी जडवाहतूक करणारी वाहने चारचाकी वाहने, इतर वाहने तसेच एस.टी. बसेस नेहमीच मुख्य रस्त्यावरून सुरु राहिल्यास वाहतुकीची कोंडी होऊन अघटीत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यवतमाळ शहरातील दारव्हा रोडने येणारी व जाणारी जडवाहतूक करणारी वाहने, एस.टी.बसेस, चारचाकी वाहने तसेच ईतर संपूर्ण वाहनांची वाहतुक ही दारव्हा रोडने नेहमीच्या मुख्य रस्त्यावरून पुर्णत: बंद करून (अत्यावश्यक सेवेची वाहने, रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड, पोलीस वाहने वगळून) ती वाहने पांढरकवडा बायपास, धामनगाव बायपास, आर्णी बायपास, घाटंजी बायपास, कळंब बायपास कडून वळविण्यात येतील. सदर वाहने ही दिनांक 23 मे 2019 रोजी सकाळी 6 वाजता प

खरीप हंगामासाठी बियाणे व खते वेळेवर उपलब्ध करून द्या

Image
v पालकमंत्र्यांच्या कृषी विभागाला सुचना v खरीपासाठी 9 लक्ष 10 हजार हेक्टरवर नियोजन यवतमाळ, दि. 20 : यवतमाळ जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर आधारीत आहे. निसर्ग, पाणी आदी गोष्टी आपल्या हाती नसल्या तरी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यावर कृषी विभागाचा भर असला पाहिजे. खरीप हंगामाला सुरवात होत आहे. त्यामुळे शेतक-यांना वेळेवर दर्जेदार बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने तात्काळ करावे, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार ख्वाजा बेग, आमदार मनोहर नाईक, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते. कृषी विभाग हा गावस्तरावरील शेतक-यांपर्यंत पोहचणारा घटक आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, कृषी विभागाच्या योजना केवळ कागदावर ठेवू नका. शेतक-यांना हंगामात बियाणे व खतांची कमतरता जाणवणार नाही, याची काळजी घ्या. माती परि

पिण्यासाठी पाणी आणि हाताला काम मिळण्यासाठी नियोजन करा

Image
v मुख्यमंत्र्यांच्या यवतमाळ जिल्हा प्रशासनाला सुचना v जिल्ह्यातील सरपंचांसोबत ‘ऑडिओ ब्रीज’द्वारे संवाद यवतमाळ, दि. 13 : ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी ,   हाताला काम आणि जनावरांना चारा-छावणी मिळेल ,   असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यवतमाळ जिल्हा प्रशासनाला दिले. मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा निवासस्थानी ऑडिओ ब्रीज च्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधून पाणी टंचाई आणि रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा घेतला. मुख्यमंत्री म्हणाले ,   काही ग्रामस्थांनी मागणी केल्याप्रमाणे राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत पाण्याची व्यवस्था करावी. सरपंचांनी मागणी केल्याप्रमाणे पाण्याच्या बाबतीतील सर्व प्रस्ताव तातडीने मंजूर करावे. पिण्यासाठी जनावरे आणि ग्रामस्थांना पाणी मिळेल तसेच ग्रामस्थांना रोजगार हमीची कामे मिळतील याकडे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष द्यावे. मुख्यमंत्री यांच्या संवाद सेतू कार्यक्रमात त्यांनी जवळपास 40 सरपंचांशी संवाद साधला. पाण्याची टाकी बांधणे ,   नळपाणी पुरवठा योजनेची अर्धवट कामे पूर्ण करावी ,   स

वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन काळजीपूर्वक करा - विभागीय आयुक्त पियुष सिंह

Image
v जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, वॉटर कप आदी विषयांचा आढावा यवतमाळ, दि. 10 : पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी गत चार वर्षांपासून शासनाच्या वतीने वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे. यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेत शासकीय यंत्रणेसोबतच सामाजिक संघटना व नागरिकांनी भाग घेऊन सर्वांनी झाडांचे काळजीपूर्वक संवर्धन करावे, असे प्रतिपादन अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सहाय्यक जिल्हाधिकारी भुवनेश्वरी, उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते. शासनाच्यावतीने चार वर्षात राज्यात एकूण 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे सांगून विभागीय आयुक्त पियुष सिंह म्हणाले, यावर्षीच्या 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेमध्ये यवतमाळ जिल्ह्याला 137.11 लाखांचे उद्दिष्ट आहे. वन विभागासोबतच इतर शासकीय यंत्रणांनी यात सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. इतर विभाग

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ

Image
v बरबडा येथे जिल्हाधिका-यांनी केले श्रमदान यवतमाळ, दि. 9 : धरणातील सुपिक गाळ शेतीच्या कामी यावा व काढलेल्या गाळामुळे धरणात जास्त प्रमाणात पाणीसाठा निर्माण व्हावा, या उद्देशाने शासनाने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना सुरू केली आहे. या योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी बरबडा येथे केला. तसेच सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने येथे श्रमदान केले. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, घाटंजी येथील दिलासा संस्थेअंतर्गत समर्पण बहुउद्देशीय संस्था व प्रयास संस्थेच्यावतीने बरबडा येथे निरोळा धरणातील गाळ काढण्याचा शुभारंभ आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बरबडा येथील ई-क्लास जमिनीवर सलग समतल चर खोदून जिल्हाधिका-यांनी गावक-यांसोबत श्रमदानात योगदान दिले. मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, जलसंधारणाचे काम अतिशय महत्वपूर्ण आहे. प्रत्येक नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन गाव समृध्द करावे, असे आवाहनही त्यांनी केले. गतवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा बरबडा गावाने सत्यमेव जयत

अवैध उत्खनन प्रकरणी बेलोरा रेती घाटावर कारवाई

Image
v दोन पोकलँड मशीन व ट्रक जप्त यवतमाळ, दि. 7 : वणी उपविभागांतर्गत येणा-या बेलोरा रेती घाटावर रात्रीच्या दरम्यान अवैध रेती उत्खनन करणा-यांविरुध्द कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन पोकलँड मशीन व चार ट्रक जप्त्‍ करण्यात आले. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार श्याम धनमने, बेलोराचे तलाठी व पोलिस कर्मचारी यांच्या ताफ्यासह रात्री 11.30 वाजताच्या दरम्यान अचानक रेती घाटाची तपासणी केली असता येथे अवैध रेती उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी दोन पोकलँड मशीनने (मॉडेल क्रमांक SY 210 C-9 व SY 220 C-9) रेती उत्खनन करण्यात येऊन चार ट्रकमध्ये भरण्यात येत होती. सदर दोन्ही पोकलँड मशीन व चार ट्रक प्रशासनाच्या वतीने जप्त करण्यात आले आहेत. यावेळी ट्रक क्रमांक एमएच 31- सीबी 9086 (चालक शेख कयम), एमएच 04 - बीजी 810 (चालक रमेश पाटील), एमएच 31 - एपी 7333 (चालक गजानन अंड्रसकर) आणि ट्रक क्रमांक एमएच 40 - बीजी 3883 हे ट्रक रेती घाटावर दोन पोकलँड मशीनद्वारे अवैध रेती उत्खनन करून ट्रकमध्ये भरतांना पकडण्यात आले. एक पोकलँड मशीनचा चालक पळून

लोकसहभागातून दुष्काळावर मात शक्य – जिल्हाधिकारी गुल्हाने

Image
v रातचांदना येथे महाराष्ट्र दिनी अधिका-यांनी केले श्रमदान यवतमाळ, दि. 2 : पावसाच्या अनियमिततेने दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्यावतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. गावांना पाणीदार बनविण्यासाठी लोकसहभागातून श्रमदान केले तरच दुष्काळावर मात शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले. यवतमाळ तालुक्यातील रातचांदना येथे महाराष्ट्र दिनी श्रमदान करतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) सविता चौधर, उपजिल्हाधिकारी (नरेगा) संगीता राठोड, जिल्हा खनीकर्म अधिकारी राजेंद्र गोसावी आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिका-यांसह उपस्थित सर्व अधिका-यांनी श्रमदान केले. दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्यावतीने यवतमाळ जिल्ह्यातील सहा तालुक्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हा

महाराष्ट्रदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Image
यवतमाळ, दि. 2 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त पोस्टल ग्राऊंड येथे मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते.        महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, स्वातंत्र्यानंतर राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारसींनुसार वेगवेगळ्या घटक राज्यांच्या निर्मितीच्या प्रक्रियेने वेग घेतला.   याच अनुषंगाने 1 मे 1960 या दिवशी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. यासाठी मोठा लढा उभा करावा लागला. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले. हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या या राज्याने स्थापनेपासून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. एवढेच नव्हे तर संपूर्ण देशात महाराष्ट्र हे आर्थिक संपन्न आणि प्रगत राष्ट्र म्हणून ओळखले जाते. प्रगतीचे आणखी टप्प