गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ





v बरबडा येथे जिल्हाधिका-यांनी केले श्रमदान
यवतमाळ, दि. 9 : धरणातील सुपिक गाळ शेतीच्या कामी यावा व काढलेल्या गाळामुळे धरणात जास्त प्रमाणात पाणीसाठा निर्माण व्हावा, या उद्देशाने शासनाने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना सुरू केली आहे. या योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी बरबडा येथे केला. तसेच सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने येथे श्रमदान केले.
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, घाटंजी येथील दिलासा संस्थेअंतर्गत समर्पण बहुउद्देशीय संस्था व प्रयास संस्थेच्यावतीने बरबडा येथे निरोळा धरणातील गाळ काढण्याचा शुभारंभ आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बरबडा येथील ई-क्लास जमिनीवर सलग समतल चर खोदून जिल्हाधिका-यांनी गावक-यांसोबत श्रमदानात योगदान दिले. मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, जलसंधारणाचे काम अतिशय महत्वपूर्ण आहे. प्रत्येक नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन गाव समृध्द करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गतवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा बरबडा गावाने सत्यमेव जयते वॉटर कपमध्ये सहभाग घेतला असून सलग समतल चर ,माती नाला बांध या सारखे मोठे श्रमदान करून गावाला पाणीदार करण्याचा विडा उचलला आहे. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार शैलेश काळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता हुंगे, उपअभियंता अजय बेले, प्रयासचे डॉ. विजय कावलकर, प्रशांत बनगीरवार, प्रा. देशमुख, डॉ. आलोक गुप्ता, प्रयास कुटुंब, दिलासा संस्था चे मन्सूर भाई, सुनयना यवतकर तसचे मुख्यमंत्री ग्राम सामजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा समन्वयक कारमोरे, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक दिनेश खडसे, वैभव  इंझलकर, प्रतिक हेडावू, पाणी फाउंडेशन तालुका समन्वयक समाधान इंगळे, अश्विनी दवारे, ग्रामसेवक बनसोड, तलाठी पांडे, गोपाल महल्ले, दिलीप टाके, उपसरपंच वैशाली मेश्राम,ग्रा. प. सदस्य कैलास देसाई, गौरव राऊत, दिलीप शिबलेकर, वाघुजी लडके, गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी