Posts

Showing posts from February, 2019

अवैध रेती उत्खनन करणा-यांवर धडक कारवाई

जिल्हा प्रशासनाने केला 11 लाखांचा दंड वसूल * विशेष पथकाद्वारे होणार कारवाई यवतमाळ, दि. 28 : रेती घाटांवर उत्खननाची परवानगी नसतांना अवैधरित्या रेती उत्खनन करणा-यांवर जिल्हा प्रशासनाने विशेष पथकाद्वारे कारवाई करून 11 लाखांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई दि. 27 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या दरम्यान करण्यात आली.             जिल्ह्यातील सर्व उपविभाग व तहसील कार्यालयांतर्गत असलेल्या रेती घाटांचा लिलाव झालेला नसतांनासुध्दा अवैधरित्या होणा-या रेती उत्खननास आळा बसण्याच्या दृष्टीने सात पथके तयार करण्यात आली. यात यवतमाळ, उमरखेड, पुसद, केळापूर, वणी आणि दारव्हा येथील उपविभागीय अधिकारी तर बाभुळगाव येथील तहसीलदार यांच्या नेतृत्वात पथकाने 11 प्रकरणात कारवाई करून 11 लक्ष 46 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. यात आर्णि तालुक्यात सात प्रकरणे, महागाव तालुक्यात एक, घाटंजी तालुक्यात दोन तर राळेगाव तालुक्यातील एका प्रकरणाचा समावेश आहे. अवैध रित्या रेती उत्खनन करणा-या आर्णि येथील सात प्रकरणात एकूण 8 लक्ष 7 हजार 800 रुपयांचा दंड, महागाव येथील एका प्रकरणात 1 लक्ष 79 हजार, घाटंजी येथील दोन प्रकरणात 2 लक्ष

मतदार नोंदणीकरीता आणखी एक संधी

v जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुट्टीच्या दिवशी विशेष मोहीम यवतमाळ, दि. 28 : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 करीता गत पाच महिन्यांपासून जिल्ह्यात मतदार याद्या पुन:रिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. निवडणूक जाहीर होण्याचा कालावधी लक्षात घेता जिल्ह्यातील मतदारांना नोंदणीकरीता आणखी एक संधी भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. त्या अनुषंगाने शनिवार आणि रविवार दि.2 व 3 मार्च रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नोंदणीकरीता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या नागरिकांची अद्यापही मतदार म्हणून नोंदणी झाली नाही, अशा वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी व्होटर्स व्हेरिफिकेशन ॲन्ड इन्फोर्रमेशन प्रोग्राम या कार्यक्रमांतर्गत 2 आणि 3 मार्च रोजी नोंदणी करता येईल. याबाबत संबंधितांना सुचना देण्यात आल्या आहेत. सदर मोहिम जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी आयोजित करण्यात येईल. या कार्यक्रमांतर्गत सर्व मतदान केंद्रावर / मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी नागरिकांकडून नाव नोंदणीकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी उपस्थित राहावे. या मोहिमेदर

केंद्र व राज्य सरकारचे कृषी क्षेत्राला प्राधान्य – केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर

Image
v पाच दिवसीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन यवतमाळ, दि. 27 : देशात शेतीवर अवलंबून असणा-या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच सरकारच्या प्रत्येक धोरणावर शेती क्षेत्राची छाप असते. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून उत्पादन वाढीसाठी सरकार प्रयत्नशील आहे. शासनाने नुकतीच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या देशातील कृषी क्षेत्रालाच केंद्र आणि राज्य सरकारचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. पोस्टल ग्राऊंड येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या वतीने जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार भावना गवळी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, कृषी विज्ञान केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगीरवार, कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते. येथील शेतकरी हा अभ्यासू व श्रम करणारा आहे, असे सांगून केंद्रीय गृह राज्यमंत्री अहीर म्हणाले, आयात

दहा शासकीय रेतीघाटांची वाळू घरकूल योजनेकरीता राखीव

v पहिल्या टप्प्यात 16 रेतीघाटांचा ई-लिलाव यवतमाळ, दि. 25 : जिल्ह्यात सन 2018-19 या वर्षाकरीता पहिल्या टप्प्यातील 26 रेती / वाळूघाटांच्या प्रस्तावांना राज्यस्तरीय पर्यावरण आघात निर्धारण प्राधिकरणने मंजूरी प्रदान केली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात 16 रेतीघाटांचा लिलाव ई-पध्दतीने करण्यात येणार आहे. तर उर्वरीत दहा रेतीघाट शासकीय कामांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या दहा रेतीघाटांची वाळू घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी पाच ब्रास याप्रमाणे देण्यात येणार आहे. शासनाकडे राखीव असलेल्या रेतीघाटांमध्ये यवतमाळ तालुक्यातील भोसा तांडा, दारव्हा तालुक्यातील लिंग बोरी, दिग्रस तालुक्यातील लोणीमेंढी, घाटंजी तालुक्यातील घोटी शारी आणि निबर्डा, उमरखेड तालुक्यातील चालगणी आणि लोहारा खुर्द, महागाव तालुक्यातील संगम आणि भोसा तर वणी तालुक्यातील चिंचोली रेतीघाटाचा समावेश आहे. सन 2018-19 या वर्षासाठी जिल्ह्यात रेतीघाटांचे एकूण 161 प्रस्ताव दाखल झाले. यापैकी 72 रेतीघाट लिलावास योग्य असल्याचे प्रमाणपत्र भुजल सर्व्हेक्षण विभागाने दिले आहे. मात्र यापैकी आठ रेतीघाटांबाबत संबंधित ग्रामसभेने नकारात्मक ठ

शासन, प्रशासन शेतक-यांच्या पाठिशी – जिल्हाधिकारी गुल्हाणे

Image
v प्रधानमंत्री  किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ v कार्यक्रम सुरू असतांनाच शेतक-याच्या खात्यात रक्कम जमा यवतमाळ, दि. 24 : शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. एक अतिशय चांगली योजना देशाच्या पंतप्रधानांनी घोषित केली असून या योजनेचा देशपातळीवर शुभारंभ होत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेताक-यांना मदत करण्याचा उद्देश असून शासन आणि प्रशासन शेतक-यांच्या पाठिशी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि.प.सदस्या रेणू शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, तहसीलदार शैलेश काळे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे, प्रगतशील शेतकरी बेंडे आदी उपस्थित होते. अतिशय कमी कालावधीत जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे म्हणाल

जिल्ह्यातील उर्वरीत 751 गावांमध्ये दुष्काळी सवलती लागू

                               v आठ सवलती त्वरीत उपलब्ध करून देण्याच्या जिल्हाधिका-यांच्या सुचना यवतमाळ, दि. 23 : सन 2018 च्या खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी असलेल्या नऊ तालुक्यातील 1297 गावांमध्ये यापूर्वी दुष्काळी सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. इतर तालुक्यातील उर्वरीत 751 गावांमध्ये या सवलती जाहीर झाल्या नव्हत्या. आता मात्र या 751 गावांमध्ये दुष्काळसदृष्य परिस्थिती घोषित करून आठ सवलती लागू करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी या गावांमध्ये त्वरीत आठ सवलती लागू करण्याच्या सुचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. जिल्ह्यात 16 तालुक्यातील एकूण गावांची संख्या 2159 असून लागवडीयोग्य गावांची संख्या 2048 आहे. दि. 23 व 31 ऑक्टोबर 2018 च्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील यवतमाळ, बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव, केळापूर आणि मारेगाव या नऊ तालुक्यांमध्ये सन 2018 च्या खरीप हंगामात गंभीर / मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. तसेच 6 नोव्हेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार नेर, पुसद व घाटंजी या तीन तालुक्याती

यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून अजय गुल्हाणे रूजू

Image
यवतमाळ, दि. 21 : यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून अजय गुल्हाणे रुजू झाले असून त्यांनी आज (दि.21) आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची बदली झाल्यामुळे वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी असलेले अजय गुल्हाणे यांची यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे म्हणाले, जिल्ह्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची प्रभावी अंमलबजावणी, संभाव्य पाणी टंचाईबाबत नियोजन, दुष्काळग्रस्त तालुक्यात मदत निधीचे वाटप तसेच आगामी निवडणुका मुक्त आणि नि:ष्पक्ष वातावरणात पार पाडणे, हे प्राधान्य आहे. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी   अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी (महसूल) अनुप खांडे, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) सविता चौधर, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीष शास्त्री, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, जिल्हा खनीकर्म अधिकारी राजेंद्र गोसावी, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, तहसीलदार शैलेश काळे आदी

जिल्ह्यातील रेतीघाटांची ई-लिलाव प्रक्रिया आजपासून सुरू

यवतमाळ, दि. 21 : सन 2018-19 या वर्षाकरीता जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील 16 रेती / वाळूघाटांच्या प्रस्तावांना राज्यस्तरीय पर्यावरण आघात निर्धारण प्राधिकरणने 18 फेब्रुवारी 2019 रोजी मंजुरी प्रदान केली आहे.   या अनुषंगाने सन 2018-19 या वर्षाकरीता सदर वाळूघाटांचा लिलाव 30 सप्टेंबर 2019 पर्यंतच्या मुदतीकरीता ई-निविदा, ई-लिलाव पध्दतीने करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दि. 22 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजतापासून बीडर रजिस्ट्रेशन ऑनलाईन पध्दतीने (संगणकीय नोंदणी) सुरू होईल. दि. 5 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजतानंतर बीडर रजिस्ट्रेशन ऑनलाईन पध्दतीने (संगणकीय नोंदणी) बंद होईल. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजतापासून ई-निविदा ऑनलाईन पध्दतीने (संगणकीय) भरणे सुरू होईल. दि. 7 मार्च रोजी रात्री 8 वाजतानंतर ई-निविदा ऑनलाईन पध्दतीने (संगणकीय) भरणे बंद होईल. 8 मार्च रोजी ई-निविदा डाऊनलोड करून जिल्हाधिकारी   कार्यालय यवतमाळ येथे उघडण्यात येतील आणि त्याच दिवशी लिलाव करण्यात येईल. 8 मार्च 2019 रोजी लॉट क्रमांक 1 रेतीघाट क्रमांक 1 ते 16 वेळ दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत, तसेच दि. 27 फेब्रुवारी 2019 रोजी ई-नि

पालकमंत्र्यांच्या हस्ते डायलिसीस मशीनचे लोकार्पण

Image
यवतमाळ, दि. 18 : किडणीच्या रुग्णांकरीता आवश्यक असलेल्या डायलिसीस मशीनचे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरीवार, सहायक अधिष्ठाता डॉ. कांबळे, औषधवैद्यक विभागाचे विभागप्रमुख डॉ. बाबा येलके, माया शेरे आदी उपस्थित होते.             आज या मशीनचे लोकार्पण करतांना आनंद होत आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर सामान्य नागरिकांचा विश्वास कायम राहावा, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. अतिशय नामवंत डॉक्टर्स येथे उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या रुग्णांना हाताळण्याच्या अनुभवामुळेच डॉक्टरांना विशेष कौशल्य प्राप्त होते. त्यामुळे या रुग्णालयात अत्याधुनिक सुविधांचा अभाव राहणार नाही, यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. दरवर्षी रुग्णालयाच्या खात्यात एक कोटींचा निधी जमा केला जातो.             जिल्ह्यातील हे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिक सुसज्ज व अत्याधुनिक साधनांनी उपयुक्त ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात

जिल्ह्यात बांधकाम कामगारांची नोंदणी 78 हजारांवर - पालकमंत्री मदन येरावार

Image
v कामगारांना साहित्य कीटचे वाटप यवतमाळ, दि. 18 : सन 2012 पासून बांधकाम कामगारांच्या योजना अस्तित्वात असल्या तरी त्यांची नोंदणी होत नव्हती. मात्र गत चार वर्षांत राज्य शासनाने बांधकाम कामागारांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रभागनिहाय, पंचायत समितीनिहाय नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला. यवतमाळ जिल्ह्यातही या नोंदणीला कामगारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. त्यामुळेच तीन हजारांवरून ही नोंदणी आता 78 हजारांवर पोहचली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणीकृत कामगारांना सुरक्षा व आवश्यक किटचे वाटप करतांना ते बोलत होते. यावेळी इंडो ऐलाईड कंपनीचे सौरभ जैन उपस्थित होते. देश घडविण्याची क्षमता कामगारांमध्ये आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, शासनाने कामगारांच्या पाल्यांसाठी शिक्षण, वैद्यकीय सुविधा आदी योजना सुरू केल्या आहेत. तसेच कामगारांच्या मुलांसाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. पांढरकवडा येथील कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते कौशल्य विकासाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. कामगारांच्या

डॉ. बाबासाहेबांच्या विचारांच्या स्थळांचा शासनाकडून विकास - सामाजिक न्यायमंत्री बडोले

Image
Ø जेतवन हिवरी येथील विपश्यना केंद्राचा पायाभरणी समारंभ       यवतमाळ, दि. 14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी भूषण आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. तसेच डॉ. आंबेडकर हे ज्या ज्या ठिकाणी गेले अशा जवळपास 50 स्थळांचा शासनाकडून विकास करण्यात येत आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने हिवरी जेतवन येथे विपश्यना केंद्राच्या पायाभरणी समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी विमल रामशिंग भन्तेजी अमेरिका, भिखूनी खंती खेमा -अमेरिका, आनन्द भन्तेजी औरंगाबाद, अस्वजित भन्तेजी, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार उपस्थित होते. जेतवन येथे विपश्यना केंद्राचा पायाभरणी करतांना आनंद होत आहे, असे सांगून सामाजिक न्यायमंत्री बडोले म्हणाले, 1920-22 च्या दरम्यान लंडन येथे स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये शिकत असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर एनडब्लयू -३ या ठिकाणी वास्तव्यास होते. या घराचा लिलाव होत असल्याचे कळले. डॉ. आंबेडकरांचा वारसा आपण ज

विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे - सामाजिक न्याय मंत्री बडोले

Image
Ø   मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहाचे लोकार्पण   यवतमाळ, दि. 13 : सध्या स्पर्धेचे युग आहे. अनेक विद्यार्थी वसतीगृहात राहून शिक्षण घेत असतात. या विद्यार्थ्यांनी तक्रारी न करता शिक्षण घ्यावे. शिक्षणशिवाय तरणोपाय नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. हा मुलमंत्र विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावा. तसेच आजच्या युगात नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. राळेगाव येथे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे, भाविक भगत, प्रकाश भूमकाळे, पंचायत समिती सदस्य प्रशांत तायडे, सदाशिव महाजन, राजेंद्र डांगे, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे, सहायक आयुक्त किशोर भोयर आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सामाजिक न्यायमंत्री बडोले म्हणाले, यापुढे वसतीगृहात नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर सर्व सुविधा उपलब्ध करू

पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘मेडा’ कार्यालयाचे उद्घाटन

Image
       यवतमाळ, दि. 11 : यवतमाळ व वाशिम या दोन जिल्ह्यांसाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण (मेडा) कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल तायडे, जिल्हा व्यवस्थापक दिनेश सुरोसे, व्यवस्थापक विकास दाभाडे, विशेष कार्यकारी अधिकारी विलास चेले उपस्थित होते.             नवीन व नवकरणीय उर्जेच्या क्षेत्रात कार्य करणारे महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणचे कार्यालय यापूर्वी अमरावती येथे होते. आता यवतमाळमध्ये हे कार्यालय धामणगाव रोड येथे जिल्हा न्यायालयासमोर श्रीखंडे ले-आऊट (वॉर्ड क्रमांक ५) येथे कार्यरत झाले आहे.             सर्व नवीन व नवकरणीय उर्जा प्रकल्पांची अंमलबजावणी, पारेषण, संलग्न / विरहित सौर उर्जा प्रकल्प, अटल सौर कृषी पंप योजना आदी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उर्जा विकास अभिकरणाच्या कार्यालयाची आवश्यकता होती. मात्र सदरचे कार्यालय अमरावती येथे असल्यामुळे नागरिक, ग्राहक आणि शेतक-यांना त्रास सहन करावा लागत होता. या बाबींची दखल घेऊन नवीन व नवकरणीय उर्जा राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे

निवडणूक प्रक्रियेकरीता अधिकारी कर्मचा-यांची माहिती 13 फेब्रुवारीपर्यंत भरण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 8 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 करीता जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय / शाळा / महाविद्यालय / सार्वजनिक उपक्रम / बँक / शासकीय कंपनी / स्थानिक स्वराज्य संस्था व इतर शासकीय संस्था तसेच केंद्र शासनाचे कार्यालय / शाळा यांच्या कार्यालय प्रमुखांना कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकारी – कर्मचा-यांची माहिती विहित नमुन्यात सादर करण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचा-यांची माहिती संकेतस्थळावर भरण्याबाबत सुचनापत्र देण्यात आले होते. परंतु ज्या कार्यालयांनी अद्यापपर्यंत माहिती सादर केली नाही किंवा अपूर्ण माहिती सादर केली किंवा एनआयसी संकेतस्थळावर माहिती ऑनलाईन पध्दतीने भरली नाही त्यांनी 13 फेब्रुवारी 2019 पर्यंत माहिती सादर करावी.             विहित मुदतीत योग्य व प्रमाणित माहिती उपलब्ध न झाल्यास तसेच कार्यालयाकडून दिलेल्या संकेतस्थळावर माहिती अद्यापही भरली नसल्यास संबंधित विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी

पोस्टल ग्राऊंडच्या गाळे लिलावास प्रशासनाची मंजूरी

Image
Ø क्रीडा संकूल समितीकडे गाळ्यांचा ताबा Ø जिल्हाधिका-यांनी घेतली बैठक       यवतमाळ, दि. 8 : शहरातील पोस्टल ग्राऊंड (समता मैदान) येथील गॅलरीच्या खाली असलेल्या गाळ्यांचा आता व्यवसायासाठी लिलाव होणार आहे. अमरावती येथील विभागीय आयुक्तांनी या गाळ्यांच्या ऑनलाईन लिलावासाठी 6 फेब्रुवारी 2019 रोजी प्रशासनाला मंजूरी दिली. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन लिलावासंदर्भात प्रक्रिया त्वरीत करण्याच्या सुचना दिल्या. त्यामुळे गत पाच वर्षांपासून असलेला प्रश्न निकाली निघाला आहे.               गाळ्यांच्या ऑनलाईन लिलावाकरीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा संकूल समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर लिलाव प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार असून मिळणा-या उत्पन्नातून मैदानाची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे. येथे असलेल्या गाळ्यांमध्ये क्रीडा साहित्यांची दुकाने, स्टेशनरी, फुड प्लाझा (खावू गल्ली), लहान मुलांच्या खेळण्यांच्या दुकानासह इतर दुकाने ठेवण्याचे नियोजन आहे.             बैठकीला अपर पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव, निवासी उपजिल्हाध

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना सर्व्हेक्षणात शेतक-यांनी सहकार्य करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 7 : शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. अल्प व अत्यल्प भुधारक शेतक-यांना या येाजनेंतर्गत प्रति शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष 6 हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्‌य तीन टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.             जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी तथा ग्रामस्तरीय समितीमध्ये तलाठी हे प्रमुख असतील. ग्रामस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात येत असून त्यांना खरी माहिती पुरविण्यासाठी शेतक-यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.             संवैधानिक पद धारण करणारे   आजी-माजी व्यक्ती, राज्यसभा सदस्य, खासदार, मंत्री, राज्यमंत्री, महानगर पालिकेचे महापौर, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, शासनाचे सर्व अधिकारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांचे कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व

निवडणूक प्रक्रियेत सर्व यंत्रणांनी गांभिर्याने कामे करावी

Image
निवडणूक प्रक्रियेत सर्व यंत्रणांनी गांभिर्याने कामे करावी Ø जिल्हाधिका-यांनी घेतली आढावा बैठक       यवतमाळ, दि. 7 : आगामी लोकसभा निवडणूक प्रक्रियेला प्रशासनाच्यावतीने सुरवात झाली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडणे, हे टीमवर्क आहे. यात सहभागी सर्व यंत्रणांनी निवडणुकीच्या दरम्यान गांभिर्याने कामे करावीत, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.             जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी (महसूल) अनुप खांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामालवार, कार्यकारी अभियंता योगेश लाखानी, राष्ट्रीय माहिती व सुचना केंद्राचे राजेश देवते आदी उपस्थित होते.             निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी असले तरी सर्व यंत्रणांना महत्वाची जबाबदारी पार पाडायची आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, हे केवळ एकट्याचे काम नाही. निवडणूक प्रक्रियेदरम्यान ठराविक वेळेत ठराविक जबाबदारी

पालकमंत्र्यांच्या हस्ते पांदण रस्त्यांचे भुमिपूजन

Image
यवतमाळ, दि. 2 : गावांसाठी महत्वाचे असणारे पांदण रस्ते त्वरीत पूर्ण करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पांदण रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते तळेगाव आणि शिवणी (बु.) येथील पांदण रस्त्याच्या कामाचे भुमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार शैलेश काळे, तळेगावचे सरपंच नितीन मोरघडे, शिवणी (बु.) च्या सरपंचा सरीता शिवणकर आदी उपस्थित होते.             यावेळी पालकमंत्री म्हणाले, पांदण रस्ते हा गावाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. जिल्ह्यातील पांदण रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहे. त्या अनुषंगाने कामांचे नियोजन करण्यात येत आहे. सुरू करण्यात आलेली कामे त्वरीत पूर्ण केली जातील, असे त्यांनी सांगितले.             तळेगाव ते कार्ली हा दीड किलोमीटरचा पांदण रस्ता, शिवणी (बु.) ते येरद शिवारापर्यंतचा दोन किलोमीटरच्या पांदण रस्त्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भुमिपूजन करून काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी पालकमंत्र्यांकडून जेसीबी