पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘मेडा’ कार्यालयाचे उद्घाटन




       यवतमाळ, दि. 11 : यवतमाळ व वाशिम या दोन जिल्ह्यांसाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण (मेडा) कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल तायडे, जिल्हा व्यवस्थापक दिनेश सुरोसे, व्यवस्थापक विकास दाभाडे, विशेष कार्यकारी अधिकारी विलास चेले उपस्थित होते.
            नवीन व नवकरणीय उर्जेच्या क्षेत्रात कार्य करणारे महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणचे कार्यालय यापूर्वी अमरावती येथे होते. आता यवतमाळमध्ये हे कार्यालय धामणगाव रोड येथे जिल्हा न्यायालयासमोर श्रीखंडे ले-आऊट (वॉर्ड क्रमांक ५) येथे कार्यरत झाले आहे.
            सर्व नवीन व नवकरणीय उर्जा प्रकल्पांची अंमलबजावणी, पारेषण, संलग्न / विरहित सौर उर्जा प्रकल्प, अटल सौर कृषी पंप योजना आदी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उर्जा विकास अभिकरणाच्या कार्यालयाची आवश्यकता होती. मात्र सदरचे कार्यालय अमरावती येथे असल्यामुळे नागरिक, ग्राहक आणि शेतक-यांना त्रास सहन करावा लागत होता. या बाबींची दखल घेऊन नवीन व नवकरणीय उर्जा राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मेडाचे कार्यालय यवतमाळ येथे मंजूर करण्यात आले.
            कार्यक्रमाला महाउर्जाचे  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी