प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना सर्व्हेक्षणात शेतक-यांनी सहकार्य करण्याचे आवाहन


यवतमाळ, दि. 7 : शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. अल्प व अत्यल्प भुधारक शेतक-यांना या येाजनेंतर्गत प्रति शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष 6 हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्‌य तीन टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
            जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी तथा ग्रामस्तरीय समितीमध्ये तलाठी हे प्रमुख असतील. ग्रामस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात येत असून त्यांना खरी माहिती पुरविण्यासाठी शेतक-यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
            संवैधानिक पद धारण करणारे  आजी-माजी व्यक्ती, राज्यसभा सदस्य, खासदार, मंत्री, राज्यमंत्री, महानगर पालिकेचे महापौर, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, शासनाचे सर्व अधिकारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांचे कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व अधिकारी (ड-वर्गातील कर्मचारी वगळून), मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती, ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त आहे, असे निवृत्ती वेतनधारक, नोंदणीकृत व्यावसायीक, डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ आदी व्यक्तिंना या योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी