पालकमंत्र्यांच्या हस्ते डायलिसीस मशीनचे लोकार्पण



यवतमाळ, दि. 18 : किडणीच्या रुग्णांकरीता आवश्यक असलेल्या डायलिसीस मशीनचे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरीवार, सहायक अधिष्ठाता डॉ. कांबळे, औषधवैद्यक विभागाचे विभागप्रमुख डॉ. बाबा येलके, माया शेरे आदी उपस्थित होते.
            आज या मशीनचे लोकार्पण करतांना आनंद होत आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर सामान्य नागरिकांचा विश्वास कायम राहावा, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. अतिशय नामवंत डॉक्टर्स येथे उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या रुग्णांना हाताळण्याच्या अनुभवामुळेच डॉक्टरांना विशेष कौशल्य प्राप्त होते. त्यामुळे या रुग्णालयात अत्याधुनिक सुविधांचा अभाव राहणार नाही, यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. दरवर्षी रुग्णालयाच्या खात्यात एक कोटींचा निधी जमा केला जातो.
            जिल्ह्यातील हे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिक सुसज्ज व अत्याधुनिक साधनांनी उपयुक्त ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यास आपण नेहमीच तयार राहू. सद्यस्थितीत येथे किडणीच्या रुग्णांकरीता दोन डायलिसीस मशीनचे लोकार्पण करण्यात आले आहे. भविष्यात आणखी दहा मशीन येथे लावण्यात येतील. यावर्षी किटकनाशक फवारणीबाबत एकही दुर्देवी घटना डॉक्टरांनी घडू दिली नाही. जिल्ह्यातील तसेच लगतच्या जिल्ह्यातील फवारणीबाधित रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली, हे मोठे यश आहे. अशीच सेवा डॉक्टरांनी निरंतर द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
            यावेळी बोलतांना अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरीवार म्हणाले, गत सहा महिन्यांपासून हे युनिट सुरू करण्याचे नियोजन होते. राज्यातील हे पहिले वैद्यकीय महाविद्यालय आहे जेथे किडणीच्या रुग्णांकरीता दहा डायालिसीस मशीन प्रस्तावित आहेत. सन 2018-19 मध्ये दहा डायलिसीस मशीन व युनिट करीता 96 लक्ष रुपयांचा निधी मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
            कार्यक्रमाचे संचालन सुनील मालके यांनी तर आभार डॉ. बाबा येलके यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विविध विभागाचे प्राध्यापक, डॉक्टर्स आदी उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी