Posts

Showing posts from February, 2021

शनिवार सायंकाळपासून सोमवार सकाळपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी

               यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी सदर ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत निर्देशित केले आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या शहरी व ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याकरीता नियम लागू करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शनिवार सायंकाळी 5 वाजेपासून सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी घोषित केली आहे. या अंतर्गत दुध व दुग्धजन्य पदार्थ हे जिवनाश्यक / अत्यावश्यक असल्यामुळे तसेच ते नाशवंत पदार्थ असल्याने (दुध विक्रेते / डेअरी) आठवड्याचे सातही दिवस सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. तसेच शनिवार सायंकाळी 5 वाजेपासून ते सोमवार सकाळी 9 वाजेपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात आली   आहे. सदर संचारबंदीच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व दवाखाने, औषधी दुकाने (जनावरांचे दवाखाने व त्यांच्या औषधी दुकानासह), पेट्रोलपंप, गॅस वितरण इत्यादी अत्यावश्यक

कोरोना प्रादुर्भावाबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला यंत्रणेचा आढावा

Image
                यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी यंत्रणेचा आढावा घेऊन कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.             पॉझेटिव्ह आलेल्या रुग्णांचे हाय रिस्क आणि लो रिस्क संपर्कातील सर्वांचा शोध घेऊन त्यांच्या नमुन्यांची तपासणी करावी, अशा सुचना देऊन जिल्हाधिकारी म्हणाले, रोज किती जणांचे नमुने घेण्यात आले, तपासणीकरीता किती पाठविले आदींची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिका-यांनी देणे बंधनकारक आहे. भांबराजा येथे एकाच गावात मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्यामुळे संपर्कातील नागरिकांचा शोध आणि नमुने तपासणी त्वरीत करावी. जेणेकरून प्रादुर्भावाला आळा घालण्यास मदत होईल. रॅपीड ॲन्टीजन किट प्रत्येक तालुक्याला किती मिळाल्या

जिल्ह्यात 241 जण पॉझेटिव्ह, 154 जण कोरोनामुक्त

  Ø तिघांचा मृत्यु             यवतमाळ, दि. 26 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 241 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 154 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.              जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 60 वर्षीय व 82 वर्षीय पुरुष तर मानोरा (जि.वाशिम) येथील 81 वर्षीय पुरुषाचा   समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 241 जणांमध्ये 141 पुरुष आणि 100 महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ येथील 113 रुग्ण, दिग्रस येथील 44, पुसद येथील 38, घाटंजी येथील 9, नेर येथील 7, पांढरकवडा येथील 6, दारव्हा येथील 6, उमरखेड, वणी आणि झरी जामणी येथील प्रत्येकी 5, आर्णि, कळंब आणि महागाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.              शुक्रवारी एकूण 1374 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 241 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1133 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1427 ॲक्टीव्ह

जिल्ह्यात तीन मृत्यु, 140 जण पॉझेटिव्ह

  Ø 90 जण कोरोनामुक्त             यवतमाळ, दि. 25 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 140 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 90 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.              जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ तालुक्यातील 42 वर्षीय पुरुष, पुसद येथील 65 वर्षीय महिला आणि मारेगाव तालुक्यातील 55 वर्षीय महिलेचा   समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 140 जणांमध्ये 87 पुरुष आणि 53 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 45 रुग्ण, पुसद 32, दारव्हा 19, बाभुळगाव 14, महागाव 8, पांढरकवडा 6, वणी 5, दिग्रस 3, घाटंजी 3, कळंब 2, उमरखेड 2 आणि इतर ठिकाणचा 1 रुग्ण आहे.              गुरूवारी एकूण 1371 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 140 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1231 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1343 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची सं

जिल्ह्यात 215 जण पॉझेटिव्ह, 56 जण कोरोनामुक्त

  Ø एकाचा मृत्यु              यवतमाळ, दि. 24 : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 215 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 56 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.              जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील 71 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 215 जणांमध्ये 121 पुरुष आणि 94 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 100 रुग्ण, दारव्हा 28, पुसद 22, दिग्रस 17, पांढरकवडा 16, वणी 12, नेर 10, झरीजामणी 3, बाभुळगाव आणि उमरखेड प्रत्येकी 2, आर्णि, राळेगाव आणि इतर ठिकाणचा प्रत्येकी 1 रुग्ण आहे.              बुधवारी एकूण 1271 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 215 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1056 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1296 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 16716 झाली आहे. 24 तासात 56 जण कोरानामुक्

जिल्हाधिका-यांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस

Image
  Ø इतरांनीही घेण्याचे आवाहन              यवतमाळ, दि. 24 : जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला दारव्हा येथून सुरवात झाली आहे. सुरवातीला शासकीय अधिकारी व कर्मचा-यांना लस देण्यात येत असून याच अनुषंगाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज (दि.24) कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली.             पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागासह महसूल, पोलिस, नगर पालिका यंत्रणा, पंचायत राज व्यवस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांना लस देण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत एकूण 28324 जणांची नोंदणी झाली असून यापैकी 16133 जणांचे लसीकरण झाले आहे. तर उर्वरीत 12191 जणांचे लसीकरण बाकी आहे. जिल्ह्याची लसीकरणाची टक्केवारी 57 असून सर्वाधिक लसीकरणाची टक्केवारी पोलिस विभागाची आहे. कोव्हीडची लस ही पूर्णपणे सुरक्षित असून नोंदणी झालेल्या सर्वांनी   त्वरीत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे. ००००००

तर जिल्ह्यात 26 फेब्रुवारीपासून होऊ शकते ‘लॉकडाऊन’

Image
   कोरोना परिस्थितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा यवतमाळ, दि. 23 : जिल्ह्यात गत आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. नागरिकांकडून कोव्हीड संदर्भातील सुचनांचे काटेकोरपणे पालन आणि चाचण्यांसाठी नागरिक समोर आले नाही तर प्रशासनाला ‘लॉकडाऊन’ करण्याशिवाय पर्याय नाही. येत्या दोन – तीन दिवसात या परिस्थितीवर गांभिर्याने लक्ष ठेवले जाईल. अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात 26 फेब्रुवारीपासून किमान 10 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात येईल, असे राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते. नमुने तपासणी आणि चाचण्यांस

जिल्ह्यात 246 जण पॉझेटिव्ह, 158 जण कोरोनामुक्त

  Ø दोघांचा मृत्यु              यवतमाळ, दि. 23 : गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह 246 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 158 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.              जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील 70 वर्षीय महिला आणि दारव्हा तालुक्यातील   83 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 246 जणांमध्ये 154 पुरुष आणि 92 महिला आहेत. यात यवतमाळातील 132 रुग्ण, दिग्रस 39, पुसद येथील 25, दारव्हा 17, पांढरकवडा 17, नेर 5, वणी 4, आर्णि 3, बाभुळगाव 3 आणि महागाव येथील 1 रुग्ण आहे.              सोमवारी एकूण 1339 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 246 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1093 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1138 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 16501 झाली आहे. 24 तासात 158 जण कोरानामुक्त

जिल्ह्यात एका मृत्युसह 210 जण पॉझेटिव्ह

  Ø 107 जण कोरोनामुक्त              यवतमाळ, दि. 22 : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 210 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 107 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.              जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिमध्ये यवतमाळ येथील   87 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या 210 जणांमध्ये 129 पुरुष आणि 81 महिला आहेत. यात यवतमाळातील 114 रुग्ण, पुसद येथील 41, पांढरकवडा 33, दारव्हा 17, वणी 3, राळेगाव 1 आणि झरीजामणी येथील 1 रुग्ण आहे.              सोमवारी एकूण 1113 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 210 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 903 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1052 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 16255 झाली आहे. 24 तासात 107 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14755 आहे. तर जिल्

‘सुपर स्प्रेडर’ मुळे कोरोनाचा धोका जास्त – दीपक म्हैसेकर

Image
Ø संक्रमण रोखण्यासाठी लक्ष केंद्रीत करा Ø दुस-यांदा पॉझेटिव्ह आलेल्यांचे नमुने ‘एनआयव्ही’ ला पाठविण्याचे निर्देश Ø मृत्यु विश्लेषण अहवालाबाबत प्रशासनाचे कौतुक             यवतमाळ, दि. 21 : कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांनी कोरोना संपल्याचा गैरसमज करून घेतला. त्यामुळे शासन आणि प्रशासनाच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून नागरिक बिनाधास्त वावरत आहेत. ही बाब सर्वांच्या अंगलट आली असून कोरोना विषाणू पुन्हा आपले हातपाय पसरवित आहे. विशेष म्हणजे ‘सुपर स्प्रेडर’ मुळे कोरोनाचा धोका जास्त असल्यामुळे प्रशासनाने त्यावर लक्ष केंद्रीत करून संक्रमण रोखावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांचे सल्लागार दीपक म्हैसेकर यांनी दिले.              जिल्हाधिकारी कार्यालयात कोव्हीडच्या परिस्थितीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.       

जिल्ह्यात 237 जण पॉझेटिव्ह, एकाचा मृत्यु

  Ø 66 कोरोनामुक्त यवतमाळ, दि. 18 : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 237 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये यवतमाळ येथील 71 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 66 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 620 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 237 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 383 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 811 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 15699 झाली आहे. 24 तासात 66 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14446 आहे. तर जिल्ह्यात एकूण 442 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 149920 नमुने पाठविले असून यापैकी 149404 प्राप्त तर 516 अप्राप्त आहेत. तसेच 133705 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाध

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता निर्बंध लागू

  Ø दुकानांची वेळ रात्री 8 वाजेपर्यंत यवतमाळ, दि. 18 : जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे बाधित रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शहरी व ग्रामीण भागाकरीता संचारबंदीचे आदेश पारीत केले आहे. यात त्यानुसार शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी तसेच जमावाने एकत्र जमू नये. सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसम्मेलने, सामुहिक कार्यक्रम, सभा, बैठका ई. करीता केवळ 50 व्यक्तींना उपस्थित राहता येईल. तसेच मिरवणूक व रॅली काढण्यास पुढीलआदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे. लग्न समारंभाकरीता केवळ 50 व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. लग्न समारंभ खुले लॉन, मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 व्यक्तींच्या मर्यादेत सामाजिक अंतराचे पालन करून रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी अनुज्ञेय राहील. लग्न समारंभाकरीता स्थानिक प्रशासन (तहसिलदार, मुख्याधिकारी व पोलिस विभाग) यांना माहिती देणे आवश्यक राहील. अंत्यविधी प्रसंगी 20 पेक्

दोन मृत्युसह जिल्ह्यात 109 जण पॉझेटिव्ह

  Ø 78 कोरोनामुक्त यवतमाळ, दि. 17 : गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह 109 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये यवतमाळ येथील 54 वर्षीय पुरुष तर आर्णि येथील 71 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच आज वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 78 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 657 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 109 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 548 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 641 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 15462 झाली आहे. 24 तासात 78 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14380 आहे. तर जिल्ह्यात एकूण 441 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 149260 नमुने पाठविले असून यापैकी 148784 प्राप्त तर 476 अप्राप्त आहेत. तसेच 133322 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविल

……तर पुन्हा होऊ शकते ‘लॉकडाऊन’ – जिल्हाधिकारी सिंह

Image
  Ø वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर यंत्रणेचा आढावा Ø कडक कारवाई करण्याचे एसपींना निर्देश यवतमाळ, दि. 17 : गत तीन – चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या अशीच वाढतच राहिली तर जिल्ह्यात कोरोनाची पुर्ववत परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी निष्काळजीपणा सोडून शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे. अन्यथा पुन्हा ‘लॉकडाऊन’ करण्याशिवाय प्रशासनाला पर्याय राहणार नाही, असे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी स्पष्ट केले. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने यंत्रणेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते. जिल्ह्यात

बँकांकडील प्रलंबित प्रस्तावांबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

Image
  यवतमाळ, दि. 16 : विविध महामंडळांची कर्ज प्रकरणे, महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोनती अभियान अंतर्गत प्रस्ताव, आत्मनिर्भर योजनेंतर्गत किरकोळ व्यवसाईकांची निधी उपलब्धता प्रकरणे आदी प्रलंबित प्रस्तावांबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी बँकर्सच्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, आरबीआयचे उमेश बंन्साली, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये आदी उपस्थित होते. विविध महामंडळांचे कर्जाची प्रकरणे बँकाकडे प्रलंबित आहे, याबाबत काही अडचण आहे का, असे विचारून जिल्हाधिकारी म्हणाले, बँकांकडे कर्जाचे प्रस्ताव प्रलंबित असल्यास संबंधित अधिका-यांनी बँकेच्या नियमित संपर्कात असावे. केवळ प्रकरणे पाठवून नामनिराळे होता कामा नये. तर त्याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. बँकांनीसुध्दा असे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ निकाली काढून संबंधित लाभार्थ्यांना लाभ द्यावा. आत्मनिर्भर योजनेंतर्गत किरकोळ व्यवसाय करणा-या व्यावसाईकांना दहा हजार रुपयांचे भांडवल देणे आवश्यक आहे. त्यांच्या कागदपत्रांची त्वरीत पुर्तता करून संबंधितांना दिलासा द्यावा. विनाकारण प्रकरणे अडवून ठेवू नका, असे निर्देशही त्यां

जिल्ह्यात 34 जण पॉझेटिव्ह, 29 कोरोनामुक्त

  यवतमाळ, दि. 15 : गत 24 तासात जिल्ह्यात 34 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 29 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 126 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 34 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 29 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 606 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 15272 झाली आहे. 24 तासात 29 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14228 आहे. तर जिल्ह्यात एकूण 438 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 148078 नमुने पाठविले असून यापैकी 147719 प्राप्त तर 359 अप्राप्त आहेत. तसेच 132447 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ००००००००        

जिल्ह्यात 57 जण पॉझेटिव्ह, 28 कोरोनामुक्त

          यवतमाळ, दि. 12 : गत 24 तासात जिल्ह्यात 57 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 28 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.             जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 305 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 57 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 248 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 499 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 15004 झाली आहे. 24 तासात 28 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14068 आहे. तर जिल्ह्यात एकूण 437 मृत्युची नोंद आहे.             सुरवातीपासून आतापर्यंत 146970 नमुने पाठविले असून यापैकी 146567 प्राप्त तर 403 अप्राप्त आहेत. तसेच 131563 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ००००००००

एका मृत्युसह जिल्ह्यात 51 जण पॉझेटिव्ह

  Ø 66 कोरोनामुक्त          यवतमाळ, दि. 11 : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 51 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये घाटंजी तालुक्यातील 31 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 66 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.              जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 388 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 51 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 337 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 470 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 14947 झाली आहे. 24 तासात 66 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14040 आहे. तर जिल्ह्यात एकूण 437 मृत्युची नोंद आहे.              सुरवातीपासून आतापर्यंत 146698 नमुने पाठविले असून यापैकी 146262 प्राप्त तर 436 अप्राप्त आहेत. तसेच 131315 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागा

जिल्ह्यात 58 जण पॉझेटिव्ह, 39 कोरोनामुक्त

           यवतमाळ, दि. 9 : गत 24 तासात जिल्ह्यात 58 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 39 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.              जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 278 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 58 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 220 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 467 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 14842 झाली आहे. 24 तासात 39 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 13941 आहे. तर जिल्ह्यात एकूण 434 मृत्युची नोंद आहे.              सुरवातीपासून आतापर्यंत 145795 नमुने पाठविले असून यापैकी 145347 प्राप्त तर 448 अप्राप्त आहेत. तसेच 130505 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ००००००००

विकासासाठी सर्वाधिक निधी यवतमाळ जिल्ह्याला

Image
  v पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला सुयश v वित्त व नियोजन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागाचा आढावा         यवतमाळ, दि. 8 : कोरोनाच्या संकटामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी विकासासाठी प्रत्येक जिल्ह्याला संपूर्ण निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांचा नियोजनाचा आढावा घेण्यात आला. विशेष म्हणजे विभागात सर्वाधिक निधी यवतमाळ जिल्ह्याला मिळाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्यामुळे प्रारुप आराखडामध्ये 88 कोटींची वाढ करण्यात आली आहे.             सन 2021-22 मध्ये जिल्ह्यासाठी शासनाने दिलेली आर्थिक मर्यादा 237.78 कोटी एवढी निश्चित करण्यात आली होती. यात आता 88 कोटींची भर पडल्याने जिल्ह्यासाठी 325 कोटी मंजूर झाले आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्याला 300 कोटी, बुलडाणा 295 कोटी, अकोला आणि वाशिम प्रत्येकी 185 कोटींचा आराखडा मंजूर झाला आहे.             यावेळी बोलतांना वित्त व नियोजन मंत्री श्री. पवार म्हणाले, विकासासाठी असलेला संपूर्ण निधी खर्च हो

जिल्ह्यात 38 जण पॉझेटिव्ह, 23 कोरोनामुक्त

              यवतमाळ, दि. 5 : गत 24 तासात जिल्ह्यात 38 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 23 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.             जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 284 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 38 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 246 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 448 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 14591 झाली आहे. 24 तासात 23 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 13715 आहे. तर जिल्ह्यात एकूण 428 मृत्युची नोंद आहे.             सुरवातीपासून आतापर्यंत 144439 नमुने पाठविले असून यापैकी 144155 प्राप्त तर 284 अप्राप्त आहेत. तसेच 129564 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ००००००००