जिल्ह्यात 38 जण पॉझेटिव्ह, 23 कोरोनामुक्त

 


            यवतमाळ, दि. 5 : गत 24 तासात जिल्ह्यात 38 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 23 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

            जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 284 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 38 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 246 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 448 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 14591 झाली आहे. 24 तासात 23 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 13715 आहे. तर जिल्ह्यात एकूण 428 मृत्युची नोंद आहे.

            सुरवातीपासून आतापर्यंत 144439 नमुने पाठविले असून यापैकी 144155 प्राप्त तर 284 अप्राप्त आहेत. तसेच 129564 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी