Posts

Showing posts from March, 2019

निवडणुकीसाठी जिल्ह्यात 7827 शाईच्या बाटल्या

Image
v प्र त्येक विधानसभा मतदार संघनिहाय वाटप यवतमाळ, दि. 30 : निवडणूक प्रक्रियेमध्ये शाईचे अनन्यसाधारण महत्व आहे. बोटावर लावलेली मतदानाची शाई, ही लोकशाही प्रक्रियेत सामान्य मतदारांचा सहभाग दर्शविते. जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या 21 लक्ष 28 हजार 163 आहे. मतदान करणा-या नागरिकांच्या बोटावर लावण्यासाठी जिल्ह्यात 7827 शाईच्या बाटल्या प्राप्त झाल्या आहेत. यापैकी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय त्याचे वाटप करण्यात आले आहे. सुरवातीच्या काळात मतपत्रिकेवर मारण्यात येणा-या ‘फुली’ साठी इंकपॅड व त्याची शाई लागत होती. आता मतपत्रिकेची जागा ईव्हीएमने घेतल्यामुळे इंकपॅड व शाईची बचत झाली आहे. मात्र बोटावर लावण्यात येणा-या शाईचे महत्व अबाधित आहे. मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारा हा काळा ठिपका निवडणुकांचा अविभाज्य घटक बनला आहे. येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी राज्यात सुमारे 3 लाख शाईच्या बाटल्या लागणार

मतदान न केल्यास बँक खात्यातून पैसे वजा होणार असल्याची बातमी चुकीची

v विश्वास न ठेवण्याचे आवाहन यवतमाळ, दि. 28 : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान न केल्यास बँक खात्यामधून 350 रुपये वजा होणार असल्याची बातमी पूर्णतः चुकीची आहे. निवडणूक आयोगाकडून 350 रुपये वजा करण्याबाबत कोणत्याही सुचना नाही. त्यामुळे या बातमीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी     14 – यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघ यांनी आहे. सध्या समाज माध्यमांवर ही माहिती व्हायरल झाली असून ती तथ्यहीन आहे. एखाद्या व्यक्तिने मतदान न केल्यास त्याच्या खात्यातून पैसे वजा करण्याची बँकांना ताकीद देण्यात आल्याची माहितीही चुकीची आहे. तसेच बँक खाते नसलेल्या मतदारांकडून मोबाईल फोनचे रिचार्ज करताना 350 रुपये वसूल केले जाणार असल्याची माहितीसुध्दा तथ्यहीन आहे. नागरिकांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये. तसेच अशा बातेम्या समाज माध्यमांवर फॉरवर्ड करू नये, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी 14- यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघ यांनी केले आहे. तथापि, मतदान करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य असून मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक नागरीकाने लोकसभा निवडणुकीसाठी अवश्य मतदान करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सायफळ येथे वाहनातून सहा लाख रुपये जप्त, मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद

यवतमाळ, दि. 28 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. सायफळ (ता. घाटंजी) येथे वनविभाग चेक पोस्टवर नाकाबंदी दरम्यान बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी करीत असतांना सहा लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. सारकणी कडून येणारी बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एमएच 26 – एडी 5154 सायफळ येथील वनविभागाच्या चेक पोस्टवर तपासणीकरीता थांबविण्यात आली. यावेळी वाहनात एका पॉलेथिनमध्ये नगदी रोकड दिसून आली. याबाबत चालक प्रवीण मेश्राम (रा. दवाखाना उमरी, ता. केळापूर) याला विचारणा केली असता सदर रक्कम मालक विक्की उर्फ मनोज सिंघानिया यांची असून सारकणी येथील बनाणी सेठ यांच्याकडून लोखंडाच्या वसुलीची आणल्याचे सांगितले. मात्र याबाबत चालकाने कुठलाही कागदोपत्री पुरावा सादर केला नाही. वाहनातून मिळालेल्या रकमेमध्ये दोन हजार रुपयांच्या 107 नोटा (2 लक्ष 14 हजार रुपये), 500 रुपयांच्या 160 नोटा (80 हजार रुपये), 200 रुपयांच्या 455 नोटा (91 हजार रुपये), 100 रुपयांच्या 2100 नोटा (2 लक्ष 10 हजार रुपये), 50 रुपयांच्या 100 नोटा (5 हजार रुपये) असे एकूण 6 लक्ष रुपये जप्त

14- यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाकरीता केंद्रीय निरीक्षक

v शासकीय विश्रामगृह येथे कार्यालय यवतमाळ, दि. 26 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 करीता 14 – यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक नियुक्त केले आहेत. निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील सुधीरकुमार शर्मा (मो. 9422872010), निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून भारतीय महसूल सेवेतील विक्रम पगारीया (मो. 9057508250), निवडणूक निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून भारतीय पोलिस सेवेतील डी.एच. परमार (मो. 9422862010) आणि निवडणूक निरीक्षक (दिव्यांग मतदार) म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील पियुष सिंह (मो. 7798436337) यांचा समावेश आहे. सामान्य, खर्च आणि कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षकांचे कार्यालय शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे असून दिव्यांग मतदार निवडणूक निरीक्षकांचे कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे आहे. यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघात निवडणूक संदर्भात कुठलीही तक्रार किंवा निवडणूकसंदर्भातील इतर बाबीबाबत कुठलीही माहिती असल्यास उमेदवार किंवा मतदार निवडणूक निरीक्षकांशी प्रत्यक्ष किंवा भ्रमणध्वनीवर संपर्क साधू शकतात. ००००००  

14 – यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाकरीता शेवटच्या दिवशी 26 उमेदवारांनी दाखल केले नामनिर्देशनपत्र, मतदान करण्याकरीता भरपगारी सुट्टी अथवा तीन तासांची सवलत

v आतापर्यंत एकूण 37 उमेदवारांचे नामांकन       यवतमाळ, दि. 25 : 11 एप्रिल 2019 रोजी यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. या मतदारसंघासाठी आज (दि. 25) शेवटच्या दिवशी 26 उमेदवारांनी  नामनिर्देशनपत्र दाखल केले. यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत 37 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे.             नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी 18 मार्च रोजी दोन उमेदवारांनी, 20 मार्च रोजी दोन उमेदवारांनी, 22 मार्च रोजी 7 उमेदवारांनी आणि शेवटच्या दिवशी 25 मार्च रोजी 26 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. आतापर्यंत 37 उमेदवारांनी एकूण 51 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. ०००००० v आस्थापनाविरुध्द तक्रार आल्यास होणार कारवाई       यवतमाळ, दि. 25 : मतदानाच्या दिवशी विविध आस्थापनांनी आपल्या आस्थापनेवरील कर्मचा-यांना मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी किंवा तीन तासांची सवलत द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अशी सुट्टी किंवा सवलत प्राप्त न झाल्यास किंवा याबाबत तक्रार आली तर संबंधित आस्थापनाविरुध्द कारवाई करण्यात येईल. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा

दिव्यांग मतदारांसाठी विविध सुविधा

Image
v मतदान केंद्रावर व्हीलचेअर व रॅम्पची व्यवस्था v तक्रारीकरीता ‘पीडब्ल्यूडी’ मोबाईल ॲप उपलब्ध       यवतमाळ, दि. 24 : निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी   ‘ सुलभ निवडणुका ’ (Accessible Elections)   हे घोषवाक्य निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने दिव्यांग मतदारांना आगामी लोकसभा निवडणूक अधिक सुलभ होणार आहे. गरज असेल त्या मतदान केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून प्रत्येक केंद्रावर रॅम्पची सुविधा राहणार आहे. तसेच दिव्यांग मतदारांसाठी तक्रारीकरीता ‘पीडब्ल्यूडी’ मोबाईल ॲप सुरू करण्यात आले आहे. राज्यात दिव्यांग मतदारांची संख्या 2 लाख 24 हजार 162 इतकी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात दिव्यांग मतदारांची एकूण संख्या 4781 एवढी आहे. तर 14 – यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात हा आकडा 6562 आहे. यात अंधत्व किंवा कमी दृष्टी असलेले, मूकबधीर, शारीरिक अपंगत्व असलेले व इतर अक्षमता असलेल्या दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या 34 – वाशिम मतदारसंघात 1686 दिव्यांग मतदार, 35 – कारंजा मतदारसंघात 1515 दिव्यांग मतदार, 77 – राळे

जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेसाठी 20 हजारांवर मनुष्यबळ

Image
यवतमाळ, दि. 20 : 22 -   निवडणूक प्रक्रिया म्हटली की पुरेसे मनुष्यबळ हा महत्वाचा विषय असतो. आचारसंहिता लागण्यापूर्वी तीन-चार महिन्यांपासून प्रशासनाची तयारी सुरू असते. मतमोजणीपर्यंत ही सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्याची संपूर्ण जबाबदारी मनुष्यबळाच्याच आधारे केली जाते. येत्या 11 एप्रिल रोजी 14 – यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. या प्रक्रियेसाठी जिल्ह्यात जवळपास 20 हजारांच्यावर अधिकारी – कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.             संक्षिप्त मतदार याद्यांचा पुन:रिक्षण कार्यक्रमापासून जिल्हा प्रशासनाची निवडणुकीची तयारी सुरू होते. यात मतदार याद्या अद्ययावत करणे, नवीन मतदारांची नोंदणी, मयत तसेच स्थलांतरीत मतदारांची नावे वगळणे, अधिकारी व कर्मचा-यांचे प्रशिक्षण आदी कामांचा समावेश असतो. सद्यस्थितीत निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यात 19 हजार 839 अधिकारी व कर्मचा-यांची प्रत्यक्ष मदत घेण्यात आली आहे. याव्यतिरिक्त इतरही निवडणूक विषयक कामे करण्यासाठी वेगवेगळ्या टिमचे गठण करण्यात आले आहे.   पोलिस विभागाच्या जवळपास साडेचार हजार अधिकारी व कर्मचा-यांवर निवडणुकीची जबाबदारी आहे.

14-यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ दोन उमेदवारांचे नामांकन दाखल, वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाहिनीवरून उमेदवारांना द्यावी लागणार गुन्हेगारी प्रकरणांची माहिती, निवडणूक जाहिरातीत सुरक्षा दलातील व्यक्तिंच्या छायाचित्रांचा वापर नको

यवतमाळ, दि. 20 : 14 -   यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज (दि.20) दोन उमेदवारांचे नामांकन दाखल झाले. अंकित मोहन चांडक आणि समीर अरुण देशपांडे या दोघांनीही अपक्ष म्हणून नामांकन दाखल केले. ०००००० यवतमाळ, दि. 20 :   निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारावर गुन्हेगारी / फौजदार प्रकरणे असतील तर त्याची माहिती उमेदवारांना वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाहिनीवरून प्रसिध्द करावी लागणार आहे. ही माहिती संबंधित उमेदवाराने अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिनांकापासून ते मतदानाच्या दोन दिवसापूर्वी या कालावधीत तीन वेळा प्रसिध्दीस देणे आवश्यक आहे.             ज्या उमेदवारांची फौजदारी प्रकरणे प्रलंबित आहे किंवा ज्यांना यापूर्वी दोषी ठरविण्यात आले आहे, अशाच उमेदवारांनी ही माहिती द्यावी लागणार आहे. यासाठी येणारा खर्च हा संबंधित उमेदवाराने किंवा पक्षाने करावयाचा आहे. तसेच निवडणुकीच्या खर्चात त्याचा समावेश करणे आवश्यक आहे. वृत्त वाहिनीवर सकाळी 8 ते रात्री 10 या कालावधीत या माहितीचे प्रसारण करावयाचे आहे. याबाबत सर्व उमेदवारांना माहिती तसेच संबंधित नमुनेसध्दा देण्यात येत आहे. ०००००० v भारत निवडणूक आयोगाचे रा

मतदारांना मतदानासाठी 11 कागदपत्रांचा पर्याय

यवतमाळ, दि. 20 :   मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त आता 11 प्रकारच्या कागदपत्रांचा पर्याय मतदाराला देण्यात आला आहे. मतदान करण्यासाठी मतदाराकडे या अकरा कागदपत्रांपैकी एक कागदपत्र असल्यास पुरावा म्हणून तो ग्राह्य धरण्यात येईल.             आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करतांना केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे नागरिक मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाही, अशा मतदारांनी ग्राह्य अकरापैकी एक ओळखपत्र सादर केले तरी त्या मतदाराला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. निवडणूक आयोगाने या कागदपत्रांमध्ये पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसंन्स), केंद्र / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / सार्वजनिक मर्या. कंपनीचे सर्व्हीस ओळखपत्र, बँक / पोस्टाद्वारे वितरीत छायाचित्र असलेले पासबुक, पॅनकार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडीया यांच्याद्वारे नॅशनल पाप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित जॉब कार्ड, भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत निर्गमित हेल्थ इन्श्युरन्स स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र, खास

जिल्ह्यातील 13 मतदान केंद्राचे व्यवस्थापन महिलांच्या हाती

Image
यवतमाळ, दि. 19 : -  संसदीय लोकशाहीत प्रत्येकाच्या मताला समान मुल्य आहे. भारतीय राज्यघटनेने पहिल्या दिवसापासूनच पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मतदानाचा हक्क दिला आहे. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा, जास्तीत जास्त महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी आगामी निवडणुकीत महिलांद्वारे मतदान केंद्र चालविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अशा 13 मतदान केंद्राचे संपूर्ण व्यवस्थापन हे महिलांच्या हाती असणार आहे.             यवतमाळ जिल्ह्यात एकूण 21 लक्ष 28 हजार 163 मतदार आहेत. यात 11 लक्ष 5 हजार 370 पुरुष मतदार, 10 लक्ष 22 हजार 764 महिला मतदार आणि 29 इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघातील एकूण 13 मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया ही महिला अधिकारी व कर्मचा-यांमार्फत करण्यात येणार आहे. एकप्रकारे संबंधित मतदान केंद्राची संपूर्ण व्यवस्था महिला सांभाळणार आहेत.               यात यवतमाळ विधानसभा मतदार संघात यवतमाळ येथे मतदान केंद्र क्रमांक 230, जि.प.शासकीय कन्या शाळा व उर्दु ज्युनिअर कॉलेज आणि मतदान केंद्र क्रमांक 272 जि.प. उच्च माध्यमिक शाळा (काटेबाई)

14-यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ पहिल्या दिवशी दोन उमेदवारांचे नामांकन दाखल

यवतमाळ, दि. 18 : 14 -   यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्याच दिवशी दोन उमेदवारांचे नामांकन दाखल झाले. भारतीय बहुजन आघाडीच्या वतीने पवार रमेश गोरसिंग यांनी तर अपक्ष म्हणून सुनील नटराजन नायर यांनी अर्ज दाखल केला. तसेच रमेश पवार यांनी जनता दल (से) तर्फेसुध्दा नामांकन दाखल केले.      नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम दिनांक 25 मार्च 2019 असून उमेदवारांच्या पत्राची छाननी 26 मार्च रोजी करण्यात येईल. 28 मार्चपर्यंत उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार आहे. ००००००

आजपासून निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यास प्रारंभ

Image
v उमेदवारांच्या खर्चाचे मीटर सुरू यवतमाळ, दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 च्या निवडणुकीचा कार्यक्रम 10 मार्च   2019 रोजी   जाहीर केला आहे. त्यानुसार 14- यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघासाठी दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार असून निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरण्याला 18 मार्च 2019 पासून सुरवात होणार आहे. या नामनिर्देशन पत्र भरण्यासोबतच उमेदवारांचे खर्चाचे मीटर सुरू होणार आहे. आगामी लोकसभा निवडणूक राज्यात चार टप्प्यात होणार आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. या मतदार संघासाठी निवडणुकीची अधिसुचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 18 मार्च आहे. याच दिवसापासून उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरण्याला सुरवात होणार आहे. नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम दिनांक 25 मार्च 2019 असून उमेदवारांच्या पत्राची छाननी 26 मार्च रोजी करण्यात येईल. 28 मार्चपर्यंत उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार आहे. अर्ज दाखल करतांना संबंधित उमेदवाराने नामनिर्देशन पत्र नमुना 2 – अ, नमुना - 26 (नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे शपथपथ), शपथेचा किंवा दृढक

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वाहनातून 10.80 लक्ष रोख रक्कम जप्त

Image
यवतमाळ, दि. 17 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर आंतरजिल्हा नाकेबंदी अंतर्गत वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. चंद्रपूर –यवतमाळ दरम्यान वणी-कोपरणा मार्गावर तपासणी सुरू असतांना वाहनात 10 लक्ष 80 हजार रुपये आढळून आले. याबाबत विचारणा केली असता कुठलेही कायदेशीर कागदपत्रे नसल्यामुळे ही रक्कम सदर पथकाने जप्त केली आहे.             13 - चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने 76 – वणी विधानसभा मतदारसंघामध्ये शिरपूर येथील पोलिस पेट्रोलिंग पथक वणी ते कोपरणा राज्य मार्गावर रात्री 10.30 वाजता (दि.16) वाहनांची तपासणी करीत होते. आबई बसस्थानकाच्या परिसरात होंडा ॲसेट वाहन क्रमांक एम.एच.34 – बी.एफ. 8022 संशयित वाहन आढळल्यामुळे पोलिस पथकाने वाहनास थांबविले. तपासणी दरम्यान सदर वाहनात रोख रक्कम असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिस विभागामार्फत भरारी पथकाला पाचारण करण्यात आले. सदर वाहन शिरपूर येथील पोलिस स्टेशनमध्ये आणल्यावर त्याची तपासणी करण्यात आली.             या वाहनाचे मालक कोपरणा तालुक्यातील हेटी येथील रहिवासी आशिष विधाते व त्यांच्यासोबत असलेल्या सचिन गिरसावळे यांच्याकडे पांढ

उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर राहणार नियंत्रण

Image
v निवडणूक खर्च सनियंत्रण कक्षाची स्थापना v खर्च विषयक बाबींच्या पडताळणीसाठी विशेष चार पथकांचे गठण यवतमाळ, दि. 16 : आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा 70 लक्ष रुपये आहे. या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक खर्च सनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उमेदवारांकडून होणारा खर्च प्रत्यक्ष फिल्डवर तपासून त्याची पडताळणी करण्यासाठी चार विशेष पथकांचे गठण करण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पाठविण्यात येणा-या खर्च निरीक्षकांकडून या सर्व प्रक्रियेचे नियंत्रण होणार असून त्यांच्या मदतीला नऊ सहाय्यक खर्च निरीक्षक आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे हे खर्च नियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून तर उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी विजय देशमुख हे सहायक नोडल अधिकारी आहेत. त्यांच्या सोबतीला प्रत्यक्ष फिल्डवर उमेदवारांच्या खर्चाची पडताळणी करण्याकरीता खर्च तपासणी पथक (70 कर्मचा-यांचा समावेश), व्हीडीओ पाहणी पथक (24 कर्मचारी), व्हीडीओ सर्वेक्षण पथक (48 कर्मचारी) आणि फिरते पथक (70 कर्मचारी) या चार विशेष पथकाचा समावेश