निवडणुकीची कामे निर्धारीत वेळेत पूर्ण करा


v जिल्हाधिका-यांचे यंत्रणेला निर्देश
यवतमाळ, दि. 04 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामासंदर्भात आयोगाकडून दैनंदिन कामाचा आढावा घेणे सुरू आहे. जिल्हा प्रशासनसुध्दा यासाठी तत्पर आहे. निवडणुकीसंदर्भात विविध विभागांना देण्यात आलेली कामे निर्धारीत वेळेत करावीत, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहायक जिल्हाधिकारी भुवनेश्वरी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, स्वप्नील कापडनीस, व्यंकट राठोड, इब्राहिम चौधरी आदी उपस्थित होते.
निवडणुकीची घोषणा केंव्हाही होऊ शकते, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे म्हणाले, आचारसंहितेपूर्वी जी कामे आहेत, ते त्वरीत संपविणे गरजेचे आहे. निवडणुकीच्या काळात सुट्ट्या, येणारे सण हे सर्व मुद्दे गौण आहेत. त्यामुळे सर्व कामे अचुकतेने आणि प्राधान्याने करा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मतदार ओळखपत्र, मतदान केंद्र, प्रशिक्षण, उपलब्ध मनुष्यबळ आदींचा आढावा घेतला.
विशेष मोहिमेत सात हजार नवमतदारांची नोंदणी : जिल्हा प्रशासनाद्वारे 2 व 3 मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान जिल्ह्यात एकूण 7010 नवमतदारांची नोंदणी झाली आहे. यात 76-वणी मतदारसंघात 782 नवमतदारांची नोंदणी, 77-राळेगाव मतदारसंघात 1097, 78-यवतमाळमध्ये 928, 79-दिग्रसमध्ये 1153, 80-आर्णिमध्ये 1052, 81-पुसदमध्ये 739 आणि 82-उमरखेड मतदारसंघात 1259 नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. 320 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यात मतदार याद्यांमध्ये 922 दुरुस्त्या करण्यात आल्या असून इतर ठिकाणी स्थानांतरीत झालेल्या मतदारांची संख्या 223 आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी