जिल्ह्यातील 13 मतदान केंद्राचे व्यवस्थापन महिलांच्या हाती


यवतमाळ, दि. 19 : -  संसदीय लोकशाहीत प्रत्येकाच्या मताला समान मुल्य आहे. भारतीय राज्यघटनेने पहिल्या दिवसापासूनच पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मतदानाचा हक्क दिला आहे. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा, जास्तीत जास्त महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी आगामी निवडणुकीत महिलांद्वारे मतदान केंद्र चालविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अशा 13 मतदान केंद्राचे संपूर्ण व्यवस्थापन हे महिलांच्या हाती असणार आहे.
            यवतमाळ जिल्ह्यात एकूण 21 लक्ष 28 हजार 163 मतदार आहेत. यात 11 लक्ष 5 हजार 370 पुरुष मतदार, 10 लक्ष 22 हजार 764 महिला मतदार आणि 29 इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघातील एकूण 13 मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया ही महिला अधिकारी व कर्मचा-यांमार्फत करण्यात येणार आहे. एकप्रकारे संबंधित मतदान केंद्राची संपूर्ण व्यवस्था महिला सांभाळणार आहेत.
             यात यवतमाळ विधानसभा मतदार संघात यवतमाळ येथे मतदान केंद्र क्रमांक 230, जि.प.शासकीय कन्या शाळा व उर्दु ज्युनिअर कॉलेज आणि मतदान केंद्र क्रमांक 272 जि.प. उच्च माध्यमिक शाळा (काटेबाई), दिग्रस विधानसभा मतदार संघात दारव्हा येथे मतदान केंद्र क्रमांक 161 मनोहर नाईक उर्दु हायस्कूल आणि दिग्रस येथे मतदान केंद्र क्रमांक 316 न.प. उर्दु स्कूल क्रमांक 2, वणी विधानसभा मतदार संघात वणी येथे मतदान क्रमांक 143 पंचायत समिती सभागृह व मतदान केंद्र क्रमांक 107 बचत भवन, पुसद विभानसभा मतदार संघात पुसद येथे मतदान केंद्र क्रमांक 172 सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक मराठी शाळा क्रमांक 2, आर्णि विधानसभा मतदार संघात आर्णि येथे मतदान केंद्र क्रमांक 84 न.प. मराठी प्राथमिक शाळा क्रमांक 3, घाटंजी येथे मतदान केंद्र क्रमांक 121 एस.पी.एस बॉईज स्कूल क्रमांक 1 आणि पांढरकवडा येथे मतदान केंद्र क्रमांक 280 न.प.बचत भवन क्रमांक 1, उमरखेड विधानसभा मतदार संघात उमरखेड येथे मतदान केंद्र क्रमांक 202 न.प.इमारत टॅक्स विभाग आणि राळेगाव विधानसभा मतदार संघात कळंब येथे मतदान केंद्र क्रमांक 112 बेसीक शाळा आणि सावर (ता. बाभुळगाव) येथे मतदान केंद्र क्रमांक 70 जि.प.उर्दु शाळा यांचा समावेश आहे. या 13 मतदान केंद्रावर पुरुष आणि महिला मतदारांची एकूण संख्या 12 हजार 333 आहे.

अ.क्र.
विधानसभा मतदार संघ
मतदान केंद्र क्रमांक
एकूण मतदारांची संख्या
1
76 – वणी
143
924
107
898
2
77 - राळेगाव
112
724
70
953
3
78 - यवतमाळ
230
1074
272
1081
4
79 - दिग्रस
161
1367
316
1373
5
80 – आर्णि
84
734
121
802
280
501
6
81 - पुसद
172
1056
7
82 – उमरखेड
202
846

एकूण : 12333
    
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी