Posts

Showing posts from September, 2022

लोकशाही दिनाचे आयोजन आता 10 ऑक्टोबरला

यवतमाळ, दि 29 सप्टेंबर, (जिमाका) :- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते, परंतु दुगोत्सवामुळे सोमवार 3 ऑक्टोबर 2022 रोजी होणारा लोकशाही दिन आता सोमवार 10 ऑक्टोबर 2022 ला जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे आयोजित करण्यात येणार आहे. स याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाने ऐकून घेतील व त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. लोकशाही दिनाला उपस्थित राहणाऱ्या अर्जदारांनी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. उपस्थितांनी सॅनिटायझरने हात वारंवार स्वच्छ करणे, सामाजिक अंतर ठेवणे, मास्क घालणे आवश्यक राहील. कोविड प्रतिबंधक उपायोजना केल्यानंतरच नागरिकांना कार्यालयात प्रवेश देण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात वनहक्क कायद्याची उत्कृष्ट अमंलबजावणी Ø वनक्षेत्र व वनालगत असलेल्या ७६७ गावांना मिळाला सामुहिक वनाधिकार Ø ९०४ वनवासींना वैयक्तिक वनहक्क मंजुर

Image
Ø सेवा पंधरवाड्यात १६० प्रकरणे निकाली. Ø जिल्हाधिकारी यांची आदिवासींसाठी अनोखी संवेदनशिलता यवतमाळ, दि २९, जिमाका:- आदिवासींचे वन जमिनीवरील हक्क मान्य करून मुळ वनवासिंना उपजीविका आणि खाद्य सुरक्षितता देण्याचा हक्क सन २००६ च्या क्रांतिकारी वन हक्क कायद्याने दिला आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या ९०० गावातील वनवासींची सामूहिक आणि वैयक्तिक वन हक्काची प्रलंबित असलेली सर्व प्रकरणे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अतिशय संवेदनशिलपणे हाताळुन निकाली काढली असुन ७६७ गावांना सामूहिक वनाधिकार मिळाला आहे तर ९०४ आदिवासिंना वैयक्तिक वन हक्क दावे मंजूर केले आहेत. जंगल परिसंस्थेवर ज्यांची जीवनशैलीच नव्हे, तर अस्तित्व अवलंबून आहे, अशा मूळ वनवासींना त्यांचे अधिकार मिळवुन देण्याचे काम सन २००६ च्या वनहक्क कायद्याने केले आहे. या एका कायद्याने जल, जंगल, जमिनीवर जंगलात राहणाऱ्या पारंपरिक वनवासींना त्यांचा हक्क बहाल केला. या कायद्याने वनवासींना वनाशी संबंधित वैयक्तिक आणि सामूहिक असे दोन प्रकारचे हक्क दिले आहेत. वैयक्तिक वनहक्कांमध्ये वनजमिनीवर शेती करुन अन्न उत्पादन करण्याचा, निवारा मिळवण्याचा आणि घर कर

केळापूरच्‍या श्री जगदंबा देवस्‍थानाच्‍या ठिकाणी विविध विकासकामांसाठी उर्वरित ४ कोटी रू. निधी वितरीत

Image
सांस्‍कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भाविकांना नवरात्रोत्‍सवाची अनोखी भेट यवतमाळ, दि २९ जिमाका: राज्‍याचे वन व सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने यवतमाळ जिल्‍हयातील जगदंबा संस्‍थान केळापूर येथील विविध विकासकामांकरिता मंजूर ५ कोटी रू. निधी पैकी उर्वरित ४ कोटी रू. निधी वितरीत करण्‍यात आला आहे. पर्यटन व सांस्‍कृतिक कार्य विभागाने आज दिनांक २९ सप्‍टेंबर २०२२ रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. सांस्‍कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जगदंबा संस्‍थानच्‍या भाविकांना नवरात्रोत्‍सवाची अनुपम भेट दिली आहे. यवतमाळ जिल्‍हयातील केळापुर तालुक्‍यातील जगदंबा संस्‍थान, केळापूर हे अतिशय जागृत देवस्‍थान आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतंर्गत सन २०१९-२० मध्‍ये या धार्मीक स्‍थळाच्‍या ठिकाणच्‍या विविध विकासकामांसाठी ५ कोटी रू. निधी मंजूर करण्‍यात आला होता. मात्र या विकासकामांसाठी उर्वरित ४ कोटी रू. निधी अप्राप्‍त होता. हा निधी उपलब्‍ध व्‍हावा यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी तब्‍बल

सैनिकांच्या कार्यातून प्रेरणा घेत देशाला महासत्ता बनविण्याचा संकल्प करा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे युवकांना आवाहन सर्जीकल स्ट्राईक वर्धापन दिन व माजी सैनिक मेळावा संपन्न

Image
यवतमाळ दि. 29 सप्टेंबर (जिमाका) : देशाचे सैनिक हे कठीन भौगोलीक क्षेत्रात व विपरीत परिस्थितीत देखील आपल्या शिस्तीच्या बळावर व देशासाठी त्यागाच्या भावनेतून आपले रक्षण करत असतात, त्यामुळे आपण आपले काम शांततेने करत असतो. त्यांच्यामुळे देशाला लाभलेल्या शांतता व सुरक्षेच्या वातावरणात देश विकासाकडे अग्रेसर आहे. आज शौर्य दिनानिमित्त सैनिकांचे देशाच्या विकासात असलेल्या योगदानाबाबत कृतज्ञता व्यक्त करून व त्याचेपासून प्रेरणा व स्फुर्ती घेवून देशाला महासत्ता बनविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा वर्धापन दिन शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शौर्य दिन व माजी सैनिक मेळाव्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज शासकीय तंत्रनिकेतनच्या श्रोतृगृहात घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कवाली, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, कॅप्टन दिनेश तत्ववादी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. सैनिक

शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ येथील विद्यार्थ्यांचे सुयश

Image
यवतमाळ, दि. 28 सप्टेंबर - शासकीय तंत्रनिकेतन खामगाव तर्फे नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या टी.इ.सी.टी.- के.एम.इ.टी.- 2022 स्पर्धेत शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ येथील सिव्हील इंजिनिरिंग मधील दिशा मोगरे तृतीय वर्ष व देवजी मनीष येंडे, हर्ष विनोद भोंग ईलेक्ट्रोनिक्स इंजिनिरिंग यांनी प्रथम क्रमांक तसेच प्रगती खोलापुरे, तोष्वी पठाडे मेक्यानिकल इंजिनिरिंग यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी यवतमाळ तर्फे आयोजित सर्किट डिझाईन स्पर्धेत शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ येथील ईलेक्ट्रोनिक्स इंजिनिरिंग मधील गुरुप्रीतसिंग राठोड व अमित राठोड यांनी प्रथम क्रमांक, साहिल ठाकरे आणि यश येडलवार यांनी द्वितीय क्रमांक तसेच पारस गोहाने आणि प्रियंका राठोड यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ चे प्राचार्य डॉ.आर.पी. मोगरे तसेच सर्व विभाग प्रमुख आणि प्राध्यापकांनी अभिनंदन केले. --

शासनाच्या कर्ज योजनेचा लाभ घेवून जिल्ह्यात निर्यातक्षम उद्योग वाढवा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे उद्योजकांना आवाहन

यवतमाळ, दि. 28 सप्टेंबर (जिमाका):- यवतमाळ जिल्ह्यात औद्योगिक माल निर्यातीकरिता भरपूर वाव असून जिल्ह्यातील युवक व युवतींनी शासनाच्या कर्ज योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेत आपले उद्योग वाढविण्याचे व जिल्ह्यातून निर्यात वाढविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उद्योजकांना केले. उद्योग विभाग महाराष्ट्र शासन आणि जिल्हा उद्योग केंद्र, यवतमाळ यांचे तर्फे यवतमाळ जिल्ह्यातील उद्योजकांसाठी गुंतवणूक वृध्दी कार्यक्रम तसेच निर्यात प्रचलन तसेच एक जिल्हा एक उत्पादन या विषयावर 24 सप्टेंबर रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन हॉटेल झुलेलाल प्राईड, दारव्हा रोड, यवतमाळ येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अमरावती विभागाचे उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, रेमंड कंपनीचे कार्य संचालक नितीन श्रीवास्तव, मुंबईच्या मैत्री प्रकल्पाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव, तसेच प्रणय अहिरवार, मृत्युंजय पांडा, नंदकुमार सुराणा हे उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी निर्यातदारांना येणाऱ

पदवीधर मतदार संघासाठी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम घोषित पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

यवतमाळ दि. 28 सप्टेंबर (जिमाका) : अमरावती पदवीधर मतदार संघाचे विधान परिषद सदस्य यांची मुदत माहे फेब्रुवारी 2023 मध्ये संपत असल्यामुळे पदवीधर मतदार संघ निवडणूक 2023 चे अनुषंगाने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम येत्या 1 नोव्हेंबर पासुन सूरू होत आहे. सदर मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त पात्र व्यक्तींनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या प्रत्येक वेळी निवडणूकीपुर्वी नव्याने तयार करणे आवश्यक असल्याने, पात्र व्यक्तींनी विहित नमुन्यात (नमुना 18) नविन अर्ज सादर करावेत. प्रत्येक व्यक्ती जी भारताची नागरिक आहे, आणी त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी आहे आणि ती 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी (म्हणजे पात्रता तारीख) किमान 3 वर्षे आधी भारताच्या राज्यक्षेत्रातील विद्यापीठाची एकतर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली आर्हता धारण करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र आहे. पदवीधर मतदार यादीमध्ये नोंदणीकरीता मतदारांना नमुना 18 चा अर्ज तहसिल क

शेतीला द्या पुरक व्यवसायाची जोड ७५ टक्के अनुदानावर शेळ्या - मेंढ्याचा गट पुरवठा योजना

यवतमाळ, दि २३,जिमाका :- शेती हा पूर्णत: निसर्गावर अवलंबुन असलेला व्यवसाय असल्यामुळे कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ तर कधी किडींचा प्रकोप अशा आपत्तिंमुळे शेतीचे उत्पादन बेभरवश्याचे ठरत आहे. त्यामुळे शेतक-यांनी पारंपारिक पिक पद्धतिला फाटा देत पिकपद्धतित बदल स्वीकारण्यासोबतच शेतीला एखाद्या पुरक धंद्याची जोड देणे ही काळाची गरज आहे. शेतक-यांना शेती पुरक व्यवसायासाठी शासन सुद्धा प्रोत्साहन देत असुन अनुदान आधारित योजना राबवित आहे. 'शेळी पालन' हा शेतिशी निगडित असलेला असाच एक जोड व्यवसाय शेतक-यांसाठी फायदेशिर ठरत आहे. शेळी, मेंढी पालन या व्यवसायासाठी ७५ व ५० टक्के अनुदानावर शेळया - मेंढयाचा गट पुरवठा ही योजना शासनामार्फत राबविण्यात येते. ही योजना राज्य आणि जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेतुन सर्वधारण लाभार्थी यांना ५० टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती, अनुसूचित क्षेत्राबाहेरिल अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर १ बोकड व १० शेळयांचा एक गट पुरवठा करण्यात येतो. *एका गटाची किंमत* १ बोकड व १० शेळ्यांच्या एका गटाची किंमत स्था

जेष्ठ नागरीकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

यवतमाळ, दि. 23 सप्टेंबर (जिमाका):- “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” कर्तव्यपथ सेवा पंधरवडा अंतर्गत संत गजानन महाराज आयुर्वेदिक महाविद्यालय पुसद येथे दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी व दयाभाई मॅजिस्टीया आयुर्वेद महाविद्यालय लक्ष्मण कळसपुरकर आयुर्वेद रुग्णालय यवतमाळ येथे दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी जेष्ठ नागरीक यांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या निमित्य जेष्ठ नागरीकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.

या बालकांचे पालक कोण ? बालकल्याण समितीकडे संपर्क साधण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 9 सप्टेंबर (जिमाका):- शासकीय निरीक्षणगृह व बालगृह येथे बालिका भाग्यश्री अमरसिंह राठोड, रेणुका हरिभाऊ चव्हाण, बालक जयहिंद भीमराव राठोड, पंकज संजय जाधव, ही बालके वास्तव्यास असून बालकल्याण समितीद्वारे त्यांच्या पालकांचा शोध घेणे सुरू आहे. उपरोक्त चारही बालकांच वय 16 वर्ष असून ते सर्व स्व. विद्यारतन वडते बालगृह, धुंदी, तालूका पुसद या बालगृहात दाखल झालेले आहेत. प्रवेशित बालकास त्याचे पालक व नातेवाईक इतर कोणीही भेटण्यास आलेले नाही. ही बालके बालगृहात दाखल झाल्यापासून त्याचे पालक व नातेवाईक इतर कोणीही भेटण्यास आलेले नाही. जिल्हा बालकल्याण समितीद्वारे त्यांचा शोध घेण्यात येत आहे. तरी सदर बालकाच्या पालक आणि नातेवाइकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी पुढील 30 दिवसांच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यवतमाळ, अध्यक्ष, बाल कल्याण समिती यवतमाळ किंवा अधीक्षक, स्व. विद्यारतन वडते बालगृह, धुंदी, तालूका पुसद येथे तसेच 8766717125 व 986000118 या मोबाईल नंबरवर किंवा बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) जिल्हा बालसंरक्षण कक्ष, यवतमाळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय निरीक्षणगृह/बा

‘एक जिल्हा एक उत्पादन’ तसेच गुंतवणुक वृध्दीवर कार्यशाळा

यवतमाळ, दि. 23 सप्टेंबर (जिमाका):- उद्योग विभाग महाराष्ट्र शासन आणि जिल्हा उद्योग केंद्र, यवतमाळ यांचे तर्फे यवतमाळ जिल्ह्यातील उद्योजकांसाठी गुंतवणूक वृध्दी कार्यक्रम तसेच निर्यात प्रचलन तसेच एक जिल्हा एक उत्पादन या विषयावर 24 सप्टेंबर रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन हॉटेल झुलेलाल प्राईड, दारव्हा रोड, यवतमाळ येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेमध्ये उद्योग विभागाचे अधिकाऱ्यांमार्फत गुंतवणुक वृध्दी तसेच निर्यात प्रचलन आणि एक जिल्हा एक उत्पादन या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच उद्योजकांना येणाऱ्या समस्येबाबत परिसंवाद आयोजित केला असून त्यामध्ये सदर समस्या सोडविण्याबाबत चर्चा करण्यांत येणार आहे. उद्योग विभागाचे सहकार्याने उद्योग सुरु केलेल्या उद्योजकांचे उत्पादनांचे प्रदर्शन सुध्दा सदर ठिकाणी लावण्यात येणार आहेत. तरी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी सदर कार्यशाळेस व प्रदर्शनीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी केले आहे.

नेर येथे 30 सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

यवतमाळ, दि 23 सप्टेंबर (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ, व नेहरु महाविद्यालय, नेरपरसोपंत यांचे संयुक्त विद्यमाने 30 सप्टेंबर 2022 रोजी नेर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रोजगार मेळाव्या करीता एकूण 432 रिक्तपदे अधिसुचित करण्यात आली आहे. सदरची रिक्तपदे ही विविध नामांकित कंपन्याकडुन ( उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, नवकिसान बायो प्लॅनटेक प्रा.लि. नांदेड ,नवभारत फर्टिलायझर, प्रा.लि. अमरावती, डिस्टील एज्चुकेशन प्रा.लि. नागपूर, टिएम ॲटोमोटीव्ह पुणे, कॅलिबर बिझनेस सपोर्ट सर्व्हिसेस प्रा.लि. नागपुर नेट ॲम्बीट, नागपुर) उपलब्ध झालेली आहे असुन रोजगार मेळाव्याचे दिवशी सदर कंपनीचे अधिकारी / एच आर उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहे. सदर मेळाव्यामध्ये 10वी, 12वी, आय.टि.आय., पदविकाधारक, पदवीधर तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पुर्ण केलेले ईच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहुन या संधीचा लाभ घेता येणार आहे. सदर मेळाव्यास उद्योजकांकडून उमेदवारांशी प्रत्यक्ष थ

हत्तीरोग नियंत्रणासाठी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

राष्ट्रीय जंतनाशक दिन व हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा यवतमाळ, दि. 23 सप्टेंबर (जिमाका):- हत्तीरोग आजार व बालकांमध्ये जंतामुळे होणारे दुष्पपरिणाम आणि त्यावरील नियंत्रणाबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत. आरोग्य विभागाच्या जिल्हास्तरीय दक्षता समितीची सभा तसेच राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी काल घेतला. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर.डी.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.चव्हाण, जिल्हा माता व बाल संगोपान अधिकारी डॉ. पी.एस.ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तन्वीर शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमा बाजोरिया प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यात 10 ऑक्टोबर या जंतनाशक दिनी 1 ते 19 वयोगटातील बालकांना जंतनाशक औषधी देण्यात येणार आहे तसेच 6 ते 15 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्याच्या पुर्व भागातील यवतमाळ, कळंब, राळेगाव, घाटंजी, पांढरकवडा, मारेगाव, झरी जामणी व वणी या नऊ तालुक्यात एकदिवसीय सामुदायीक औषधोपचार मोहिमेंतर्गत हत्तीरोग नि

नवरात्रोत्सवात महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित अभियान’ 18 वर्षावरील 100 टक्के महिलांची आरोग्य तपासणी व्हावी यासाठी सुक्ष्म नियोजन करा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या सूचना

Image
यवतमाळ, दि. 23 सप्टेंबर (जिमाका):- नवरात्र उत्सवादरम्यान ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ या शासनाच्या अभियानांतर्गत जिल्ह्यात 18 वर्षांवरील 100 टक्के महिला, माता, गर्भवती यांची आरोग्य तपासणी करून प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले असून जिल्ह्यातील सर्व महिलांनी या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा आरोग्य समितीच्या नियोजन मंडळाची सभा जिल्हाधिकारी अमोले येडगे यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आर.डी.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.चव्हाण, जिल्हा माता व बाल संगोपान अधिकारी डॉ.पी.एस.ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. तन्वीर शेख, डॉ. रमा बाजोरिया, महाआयटीचे जिल्हा समन्वयक फिरोज पठाण, विस्तार अधिकारी (शिक्षण) राजू मडावी तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिक्षक उपस्थित होते. या अभियानात सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 18 वर्षांवरील महिलांची आरोग्य तपास

शौर्य दिन कार्यक्रम आणि माजी सैनिक मेळावा 29 सप्टेंबर रोजी

यवतमाळ, दि. 22 सप्टेंबर (जिमाका):- गुरुवार दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय (Govt.Polytechnic College), धामणगांव रोड, यवतमाळ येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे अध्यक्षतेखाली “शौर्य दिन” कार्यक्रम व माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मेळाव्यामध्ये युध्दविधवा / वीरमाता यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व माजी सैनिक / कुटुंबियांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, यांनी केले आहे.

आझाद मैदानातील जागा भाडे तत्वावर मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित

यवतमाळ, दि. 22 सप्टेंबर (जिमाका):- आझाद मैदान येथील मोकळी जागा (फटाका /स्वेटर आदि दुकानाकरीता तसेच समता मैदान येथे क्रिडा स्पर्धाकरीता शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपध्दतीनुसार विहित अटी व शर्तीवर भाडयाने देणेबाबत वेबसाईट – sdoyavatmal.in यावर 1 ऑक्टोबर 2022 पासून अर्ज करता येईल. हि वेबसाईट दिनांक 1 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे म्हणजे दि.30 सप्टेंबर 2022 चे मध्यरात्रीनंतर) सुरु होईल, याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी अनिरूध्द बक्षी यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात 28 सप्टेंबर रोजी विशेष आधार नोंदणी शिबीर नागरिकांनी आधार नोंदणीसाठी विशेष शिबीराचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

यवतमाळ, दि. 22 सप्टेंबर (जिमाका):- जिल्ह्यातील नागरिकांकरिता सर्व तालुक्यात दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी विशेष आधार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी आपली आधार नोंदणी करून शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे तर सर्व तालुका स्तरावर तहसिलदार यांचे मार्फत संपुर्ण जिल्ह्यात 28 सप्टेंबर या एकाच दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत आधार नोंदणी शिबीर आयोजित केले आहे. शिबीरात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला व लहान बालके यांना प्राधान्य देण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.

आश्रमशाळा, वसतिगृहातील स्वयंपाकी व् सहाय्यक यांचे प्रशिक्षण घेण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सुचना

Image
यवत्माळ, दि २१, जिमाक: मागील आठवड्यात आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना जेवणातून झालेल्या विषबाधा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हि जे एन टी यांच्यासाठी असलेल्या निवासी शाळा, बालगृह, अनुदानित व विनाअनुदानित वस्तीगृह तसेच विद्यार्थ्यांना भोजन दिले जाते अशा सर्व ठिकाणी स्वयंपाकी आणि स्वयंपाक घर सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना अन्नपदर्थ व अन्नधान्य हाताळण्या संदर्भात प्रशिक्षण देण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. स्वयंपाक करणारे व त्याला हाताळणाऱ्या सर्व लोकांची वैद्यकीय तपासणी बंधनकारक करावी. तीन महिन्यातून एकदा या व्यक्तींची तपासणी करून कोणताही संसर्गजन्य आजार नाही याची खात्री करावी असेही त्यांनी सांगितले. थोड्याच दिवसात नवरात्राला सुरुवात होऊन जिल्ह्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असेल. अशा काळात सार्वजनिक ठिकाणी जेवण दिले जाते त्या जेवणाची सुद्धा अन्न ल्व् औषध प्रशासनाने तपासणी करावी. दुर्गोत्सव मंडळांना अन्न पदार्थ हाताळण्या संदर्भातिल सूचना द्याव्यात. तसेच या काळात मोठ्या प्रमाणात मिठाईची विक्री होते. तेव्हा मिठ

अपघातग्रस्त शेतकऱ्यांना गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा आधार

यवतमाळ दि,21, जिमाका :- शेती करताना नैसर्गिक व अनैसर्गिक अपघातामुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा कायमचे अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा परिस्थितित अपघातग्रस्त शेतकऱ्यांस व त्यांच्या कुटुंबास आधार देण्याकरीता राज्य शासनाने स्व. गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागु केली आहे. महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य (आई,वडिल, शेतकर्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकुण दोन व्यक्क्तिंसाठी आता या योजनेचा लाभ देण्यात येतो. विमा संरक्षणासाठी समाविष्ट असलेले अपघात रस्ता, रेल्वे अपघात, उंचावरून पडून मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू, विषबाधा, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे होणारे अपघात, विजेचा धक्का, दंगलीमुळे शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व, वीज पडून म

तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्र देण्याकरिता विशेष मोहिम

यवतमाळ, दि. 21 सप्टेंबर (जिमाका):- तृतीयपंथी व्यक्तींसाठी http://transgrender.dosje.gov.in हे राष्ट्रीय पोर्टल सुरु करण्यात आलेले असुन त्यावर यवतमाळ जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्र प्रमाणपत्र प्रदान करण्याकरिता 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींनी ओळखपत्र मिळण्याकरिता आपला स्वघोषित पत्र, आधार कार्ड व पासर्पोट आकाराचा फोटो घेऊन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यवतमाळ येथे हजर राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यवतमाळ यांनी केले आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील उदयोजकांसाठी मनी मार्जिन योजना

यवतमाळ, दि. 21 सप्टेंबर (जिमाका):- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. तसेच दि. 17 सप्टेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 या सेवा पंधरवाडा कालावधीत यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकातील व्यक्तींना सदर योजनेकरिता इच्छुक लाभार्थी यांनी आपला प्रस्ताव दि. 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यवतमाळ यांचेकडे सादर करावा. सदर प्रस्ताव शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पुर्तता करून सादर करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.

अतिवृष्टीग्रस्तांसाठी 536 कोटी मदतनिधी तहसिलदारांकडे वितरित कर्जकपात न करता मदत निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

यवतमाळ, दि. 21 सप्टेंबर (जिमाका) :- अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्राप्त झालेला मदत निधी थेट त्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करण्याचे व त्यातून कोणतीही कर्जाची रकम कपात न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व तहसिलदार व बँक व्यवस्थापक यांना दिले आहे. माहे जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान-भरपाईसाठी जिल्ह्यास वाढीव दराने 529 कोटी 98 लाख 79 हजार रुपये आणि खरडून गेलेल्या व गाळ साचल्याने बाधीत झालेल्या शेत जमीनीसाठी 6 कोटी 5 लक्ष 16 हजार रुपये असा एकूण 536 कोटी तीन लक्ष 95 हजार रूपये मदत निधी यवतमाळ जिल्ह्याला प्राप्त झाला होता. तो निधी सर्व तहसिलदार यांना अर्थसंकल्पिय प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. सदर मदत निधीचे देयके तातडीने पारीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी कोषागार अधिकारी यांना दिल्या आहेत. तहसिलदार यांनी उपरोक्त निधीचे नुकसानग्रस्तांना वाटप करतांना शासन निर्णयातील विहीत अटी व शर्तीची पुर्तता होत असल्याची खात्री करावी, लाभार्थी निश्चित झाल्यानंतर वित्तीय शिस्तीच्या दृष्टीकोनातून प्रत्यक्ष गरजेनुसारच कोषागारातून रक्कम आहरित करू

लंपी स्कीन आजारासाठी एक लाखावर लस प्राप्त पशुसंवर्धन विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू

यवतमाळ, दि. 15 सप्टेंबर (जिमाका) :- यवतमाळ जिल्ह्यातील आठ गावात 16 गायवर्गीय जनावरांमध्ये लंपी स्कीन आजाराचा प्रार्दुभाव दिसून आला असून जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे सध्या तातडीने 79 हजार 300 लस तर राज्य पशुसंवर्धन विभाग यवतमाळ अंतर्गत 30 हजार लस उपलब्ध करण्यात आल्या असून आवश्यकतेनुसार अजून लस उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. सदर आजारा संबधाने जिल्हा प्रशासनाव्दारे प्रत्येक तालुक्यमध्ये भित्ती पत्राकाचे वाटप करुन गावांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. प्रामुख्याने सदर आजार बाधीत क्षेत्रापासून पाच कि.मी. परिसरातील जनावरांचे रिंगण स्वरुपात लसीकरण करण्यात येत आहे. ग्राम पंचायती मार्फत पशुंचे तसेच गोठा ठिकाणचे फवारणी करण्याबाबत निर्देश दिलेले आहे. त्याच प्रमाणे ज्या ग्रामपंचायत अथवा तालुक्यामध्ये सदर आजार आढळून आलेला आहे किंवा जनावरांमध्ये लक्षणे आढळून आलेले आहे अशा जनावरांना विलगीकरणात ठेवण्याबाबत सांगण्यात आलेले आहे. लक्षणे असलेल्या जनावरांची तपासणी, लसीकरण आणि आवश्यक औषध उपचार

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ नागरिकांच्या समस्यांचा जलद निपटारा करून त्यांना सुशासनाचा अनुभव द्या जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रशासकीय यंत्रणेला सूचना

यवतमाळ, दि. 15 सप्टेंबर (जिमाका):- नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी व समस्यांचा जलद आणि पारदर्शकपणे निपटारा करून त्यांना सुशासनाचा अनुभव द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज सर्व प्रशासकीय यंत्रणेला दिल्या. शासनामार्फत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला असून यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्व कार्यालय प्रमुखांना दूरदृष्यप्रणालीद्वारे निर्देश दिले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे तसेच सर्व कार्यालय प्रमुख दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. या सेवा पंधरवड्यात सर्व विभागांनी आपले सरकार, महावितरण व डि.बी.टी पोर्टलवरील सेवा, नागरी सेवा केंद्रामार्फत देण्यात येणा-या शासकीय सेवा, विभागाच्या स्वतःच्या योजनांशी संबंधित पोर्टलवरील प्रलंबित अर्ज, तसेच झिरो पेन्डन्सी, लोकशाही दिन प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, सुंदर माझे कार्यालय उपक्रमाची अंमलबजावणी, न्यायालयीन व लोकायुक्त यांचेकडील प्रकरणे, जुने अभिलेख अभिलेखागारात पाठ

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जात पडताळणीचे विशेष शिबीर

यवतमाळ, दि. 15 सप्टेंबर (जिमाका):- सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात 12 वी विज्ञान तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास ईच्छुक विद्यार्थ्यांसाठी जात पडताळणी समितीद्वारे उपविभागीय स्तरावर जात प्रमाणपत्र पडताळणीचे शिबीरे आयोजीत करण्यात आली आहेत. यवतमाळ उपविभागामध्ये शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय, बाभुळगाव येथे 20 सप्टेंबर रोजी, दारव्हा उपविभागामध्ये मुंगसाजी महाराज महाविद्यालय,दारव्हा येथे 23 सप्टेंबर रोजी, पुसद उपविभागामध्ये बाबासाहेब नाईक इंजिनियरींग महाविद्यालय, पुसद येथे 27 सप्टेंबर रोजी, उमरखेड उपविभागामध्ये गोपिकाबाई सितारामजी गावंडे कॉलेज उमरखेड येथे 30 सप्टेंबर रोजी, वणी उपविभागामध्ये लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथे 7 सप्टेंबर रोजी, राळेगाव उपविभागामध्ये इंदिरा गांधी कला महाविद्यालय राळेगाव येथे 11 ऑक्टोबर रोजी, तर केळापुर उपविभागामध्ये शिवरामजी मोघे महाविद्यालय केळापुर (पांढरकवडा) येथे 14 ऑक्टोबर 2022 रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीरात सन 2022-23 मधील 12 विज्ञान शाखेतील प्रवेशीत विद्यार्थी यांनी https:// bartievalidity.maharashtra.gov.in/ या संकेतस्थ

मुलींचे वसतिगृहाकरिता इमारत भाड्याने मिळणेसाठी प्रस्ताव आमंत्रित

यवतमाळ, दि १5 सप्टेंबर ( जिमाका ):- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, यवतमाळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे (नवनिर्मीत) शासकीय वसतिगृह कार्यरत आहे. सदर वसतिगृहाची विद्यार्थी मान्य क्षमता 100 इतकी आहे. वसतिगृह भाड्याचे इमारतीमध्ये कार्यरत असुन वसतिगृहाकरिता नविन इमारत भाडे तत्वावर घ्यायची आहे. तरी यवतमाळ शहरातील इच्छुक इमारतमालकांनी खाजगी इमारत भाड्याने देण्याबाबतचा प्रस्ताव दि. 23 सप्टेंबर 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत समाज कल्याण कार्यालयात सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव रामसिंग चव्हाण यांनी केले आहे.

ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन 20 सप्टेंबर पर्यंत सुरू उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन

यवतमाळ, दि 15 सप्टेंबर ( जिमाका ):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ या कार्यालयामार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन सुरू असून ते 20 सप्टेंबर 2022, पर्यंत राहणार आहे. स्थानिक पातळीवर तसेच इतर बाहेरील ठिकाणी औद्योगिक संस्थांच्या मागणीनुसार एकूण 78 रिक्त पदांकरीता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मेळाव्याकरीता जिल्हयातील ईच्छुक उमेदवारांना rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे. सदर मेळाव्यामध्ये किमान 12 वी परिक्षा उत्तीर्ण झालेले रोजगार इच्छुक उमेदवारांना त्यांचेकडील सेवायोजन कार्ड ( एम्प्लॉएमेंट कार्ड ) चा युझरनेम व पासवर्डने लॉगईन करुन सदर मेळाव्यामध्ये सहभागी होता येईल. या वेबपोर्टलवर जॉब सिकर या टॅब मध्ये जावून लॉगीन करावे. डाव्या बाजूला पं. दिनदयाल उपाध्याय जॉब फेयर या वर क्लिक करावे. येथे यवतमाळ जिल्हा निवडून दि.12 सप्टेंबर,2022 ते 20 सप्टेंबर 2022 दरम्यान रोजगार मेळाव्यामध्ये नोंदणीकृत उद्योजकांनी अधिसू

साक्षरता दिननिमित्य विद्यार्थीनींना शालेय साहित्याचे वाटप जिल्हा विधी सेवा व व अभ्यंकर कन्या शाळेचा उपक्रम

यवतमाळ, दि १5 सप्टेंबर ( जिमाका ):- शालेय जिवनात शिस्तीने राहुन आनंद घ्यावा असा संदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी विद्यार्थ्यांना दिला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अभ्यंकर कन्या शाळा यांचे संयुक्त विद्यमाने नुकतेच साक्षरता दिनानिमित्त विद्यार्थीनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के. ए. नहार, अे.पी. दर्डा संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र अग्रवाल, रमेश मुनोत, मोहन गांधी, किशोर देशमुख, मुख्याध्यापिका मोहना गंगमवार, जोशी सर व इतर शालेय शिक्षक वर्ग उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये उपस्थीत मान्यवरांचे हस्ते 267 विद्यार्थीनींना शालेय गणवेश, नोटबुक व कंपासचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका माधवी जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार विद्या मेश्राम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते. 000

जिल्हा महिला लोकशाही दिन 19 सप्टेंबर रोजी

यवतमाळ, दि. 15 सप्टेंबर (जिमाका):- चालू महिन्यातील जिल्हा महिला लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 15 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे करण्यात आले आहे. तक्रारग्रस्त महिलांनी त्यांच्या तक्रारी प्रथम दर महिन्याच्या चौथ्या सोमवारी आयोजित होणाऱ्या तालुकास्तरावरील लोकशाही दिनात मांडाव्यात. सदर तक्रारीवर संबंधीत विभागाकडून विहित कालावधीत निरसन न झाल्यास सदर तक्रार जिल्हा महिला लोकशाही दिनात तालुकास्तरीय लोकशाही दिनात केलेले अर्ज व टोकन क्रमांकासह दाखल करावी. लोकशाही दिनात न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसलेला व आवश्यक कागदपत्रे न जोडलेला अर्ज तसेच सेवाविषय, आस्थापनाविषयक, वैयक्तिक स्वरूपाचे निवेदन व तक्रारी स्विकारल्या जाणार नाही, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांनी कळविले आहे.

जिल्हा प्रशासनाचा एक दिवस बळीराजासोबत शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये .. शासन आपल्या सोबत - जिल्हाधिकारी अमोल येडगे

Image
*विविध योजनांची माहिती देवून शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या अडचणी यवतमाळ, दि. 14 सप्टेंबर (जिमाका):- अतिवृष्टी व दुष्काळ यासारख्या नैसर्गीक आपत्ती येत राहतील, पण त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. कोणत्याही संकटातून बाहेर निघण्यासाठी कुटूंबाला आपला भक्कम आधार आवश्यक आहे, आपण जगलो तर कुटूंबासाठी कोणत्याही संकटातून मार्ग काढता येईल. शासन देखील प्रत्येक संकटातून बाहेर काढण्यासाठी आपल्या सोबत आहे. त्यामुळे आत्महत्या करून आपल्या कुटूंबावरचे संकट वाढवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शेतकऱ्यांना केले. ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या शासनाच्या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांची चर्चा करून त्यांना योजनांची माहिती देणे व त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी जिल्ह्यातील 138 गावात काल रात्रीपासून महसूल, कृषी व पशुसंवर्धन विभागचे वरिष्ठ अधिकारी बळीराजासोबत मुक्कामी होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर हे केळापूर तालुक्यातील सोनुर्ली या गावात, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आर्णी तालुक्यातील लोणी येथे, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसि

कृषी व पशुपालन प्रशिक्षणासाठी कोलाम लाभार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

यवतमाळ, दि. 13 सप्टेंबर (जिमाका):- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत येत असलेल्या यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, राळेगांव, मारेगांव, वणी, केळापूर, घाटंजी, झरी-जामणी या 9 तालुक्यातील आदिम जमातींचे कोलाम लाभार्थ्यांसाठी आदिम जमाती विकास कार्यक्रम अंतर्गत कृषी आणि पशुपालकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून यासाठी आदिम जमातींचे कोलाम लाभार्थ्यांची तसेच कुमारी मातांची निवड करावयाची आहे. सदर योजनेचा लक्षांक -300 आहे. उक्त योजनेत कोलाम लाभार्थ्यांना शेतातील एकात्मिक रोग, कीड नियंत्रण व कृषि उत्पादनात वाढ, सेंद्रिय शेती व पध्दती, मृदा संवर्धन , शेळी पालन, कुक्कुटपालन व व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन, कृषि माल प्रक्रिया व विपणन, जल व्यवस्थापन, पांढरकवडा प्रकल्पामध्ये असणाऱ्या कुमारी माता यांना कृषी आधारित उत्पादन वाढ व रोजगार निर्मितीचे प्रशिक्षण इत्यादी शेतीबाबतची अद्यावत माहिती आदिम जमातीच्या कोलाम लाभार्थ्यांना व कुमारी मातांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सदर योजने करीता पात्र ठरण्यासाठी प्रशिक्षणासाठी शेतकरी हा आदिम जमातीचा (कोलाम) असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांना शे

तोफखाना रजिमेंटच्या माजी सैनिकच्या समस्या सोडविण्यासाठी 19 सप्टेंबरला संपर्क अभियान

यवतमाळ, दि. 13 सप्टेंबर (जिमाका):- तोफखाना रजिमेंटचा “196 वा गनर डे” दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी संभाजीनगर (औरंगाबाद) येथे साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमामध्ये आर्टीलरी रजिमेंटचे सेवानिवृत्त अधिकारी / जवान तसेच आर्टीलरी रजिमेंटच्या माजी सैनिक विधवांच्या निवृत्तीवेतन, ई.सी.एच.एस. हॉस्पिटल, इन्शुरन्स कंपनीच्या अडि-अडचणी सोडविण्याकरिता संबंधित कार्यालयाच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आले आहे. यवतमाळ, वाशिम आणि चंद्रपुर जिल्ह्यातील आर्टीलरी रजिमेंटचे सेवानिवृत्त अधिकारी / जवान तसेच आर्टीलरी रजिमेंटच्या माजी सैनिक विधवांच्या अडिअडचणी समजून घेण्याकरीता दिनांक 19 सप्टेंबर 2022 (सोमवार) रोजी दुपारी 4 वाजता संपर्क अभियानाचे आयोजन यवतमाळ येथे करण्यात येत असल्याबाबत कर्नल संदिप श्रीवास्तव, कमान अधिकारी, 169 मेडियम रजिमेंट यांनी कळविले आहे. तरी यवतमाळ जिल्ह्यातील आर्टीलरी रजिमेंटच्या सेवानिवृत्त अधिकारी / जवान तसेच आर्टीलरी रजिमेंटच्या माजी सैनिक विधवांनी त्यांच्या अडिअडचणी / तक्रारी असल्यास संबंधीत कागदपत्रासह दिनांक 19 सप्टेंबर 2022 (सोमवार) रोजी दुपारी 4 वाजता संपर्क अभियान अधिकाऱ्यांन

नागपूर सैन्य भरती मेळावा आयोजनाच्या स्थळात बदल

यवतमाळ, दि. 13 सप्टेंबर (जिमाका):- नागपूर येथे 17 सप्टेंबर ते 07 ऑक्टोबर 2022 या कालावधी दरम्यान घेण्यात येणाऱ्या सैन्य भरती मेळाव्याचे स्थान राज्य राखीव पोलीस गट क्र. 4, हिंगणा रोड, नागपूर कवायत मैदान क्र. 1 ऐवजी विभागीय क्रिडा संकुल, मानकापुर, कोराडी रोड, मानकापुर, नागपूर पिन-440030 येथे पुर्वनियोजीत वेळेत (दि. 17 सप्टेंबर 2022 ते 07 ऑक्टोंबर 2022) होणार आहे. तसेच उमेदवारांकरीता महाराष्ट्र परिवहन विभागातर्फे विशेष बस सेवा पुरविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील उमेदवारांनी योग्य वेळेत हजर राहुन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, ललीतकुमार वऱ्हाडे यांनी केले आहे.

खेळ पुरस्काराकरिता प्रस्ताव आमंत्रित

मेजर ध्यानचंद्र खेळ रत्न पुरस्कार, जिवन गौरव पुरस्कार, मौलाना अब्दुल कलाम ट्रॉफी अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, खेल प्रोत्साहन करीता नामांकन दाखल करता येणार खेळाडूंना अर्ज सादर करण्यास शिफारशीची आवश्यकता नाही यवतमाळ, दि. 13 सप्टेंबर (जिमाका):- भारत सरकार, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार, खेळामध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जिवनगौरव पुरस्कार, मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन ॲवार्ड, 2022 करीता पुरस्कारासाठी नामनिर्देशनाचा प्रस्ताव दि. 18 सप्टेंबर, 2022 रोजीपर्यंत आमंत्रित केले आहे. तसेच या वर्षीपासुन पात्र खेळाडूंनी पुरस्काराकरीता मार्गदर्शक तत्वानुसार अर्जदारांनी स्वत: फक्त ऑनलाईन पोर्टलव्दारे आपले विहीत नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची अथवा व्यक्तीची शिफारस न घेता थेट केंद्रशासनास abtyas-sports.gov.in या पोर्टलवर सादर करावे, असे सुचित केले आहे. तसेच ऑनलाईन अर्जाबाबत काही अडचण आल्यास Department of Sports At section.sp४moyas@gov.in किंवा 011-23387432 या

पी.एम.किसान योजनेत 76 टक्के इ.के.वाय.सी पुर्ण करून यवतमाळ जिल्हा आघाडीवर जमीन तपशील अपलोडची सर्व प्रकरणे महसूल विभागामार्फत निकाली पात्र शेतकऱ्यांनी इ-केवायसी तातडीने पुर्ण करण्याचे प्रशासनाचे आवाहन

यवतमाळ, दि. 13 सप्टेंबर (जिमाका):- शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्माननिधी (पी.एम. किसान) योजने अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात 76 टक्के इ.के.वाय.सी. चे काम पुर्ण करून यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे. इ-केवायसी साठी आवश्यक असलेले जमीन तपशील अपलोड करण्याचे काम महसूल विभागामार्फत पुर्ण करण्यात आले आहे, तरी उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर इ-केवायसी पुर्ण करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी केले आहे. इ.के.वाय.सी. चे काम पुर्ण करण्यासाठी महसूल विभागाला चार लाख 12 हजार 16 प्रकरणात जमीनीचा तपशिल अपलोड करावयाचा होता. त्यापैकी 78 हजार 23 रेकॉर्ड मय्यत किंवा अपात्र ठरल्याने वगळण्यात आली व तीन लाख 33 हजार 993 प्रकरणात जमीनीचा तपशिल ऑनलाईल अपलोड करण्यात येवून लॅण्ड डाटा डिटेल्स अपलोडची सर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली असल्याची माहिती ललीतकुमार वऱ्हाडे यांनी दिली आहे. पी.एम.किसान योजनेंतर्गत पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी 3 लाख 32 हजार 321 साभासदांचे आधार प्रमाणिकरण पुर्ण झाले असून 2 लाख 53 हजार 650 शेतकऱ्यांची इ-के.वाय.स

कौटुंबिक हिंसाचार मुक्त गाव अभियान राबवावे -जिल्हाधिकारी अमोल एडगे

जिल्हा महिला सल्लागार समितीच्या बैठकीत सूचना यवतमाळ, दि १२ :- महिलांना घरात सुरक्षित वातावरण मिळावे, त्यांच्यावर होणा-या अत्याचाराबाबत त्यांना कायदेशिर माहिती मिळावी, महिलांमध्ये महिलांविषयीच्या कायद्याबाबत समज यावी आणि गावात कोणत्याही महिलेवर अत्याचार होणार नाहीत याबाबत मोठ्या प्रमाणात नगरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कौटुंबिक हिंसाचार मुक्त गाव अभियान राबवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल हेडगे यांनी आज दिल्यात. सर्व समावेशक जिल्हा महिला सल्लागार समितीची बैठक आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीला महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एल. आगाशे, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील डॉ. रमा बाजोरिया,माविमचे जिल्हा समन्वयक डॉ रंजन वानखेडे, स्नेहा खडसे, सुरेश रामटेके, डॉ स्मिता पेठकर आणि के बी शर्मा इत्यादी उपस्थित होते. जिल्हास्तरावरील सर्व विभागांमार्फत महिलांकरिता असणाऱ्या वैयक्तिक, सामूहिक तसेच निवासी योजनांचा यावेळी आढावा घे

पशुधनातील लंपी स्किन आजार घाबरू नका, पण खबरदारी घ्या जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे पशुपालकांना दक्षता घेण्याचे आवाहन प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व बैलबाजार बंद करण्याचे आदेश

यवतमाळ, दि 12 सप्टेंबर, जीमाका :- जिल्ह्यात केवळ ९ जनावरांना आतापर्यंत लंपी स्कीन आजाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे, हा आजार पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुद्धा करण्यात आल्या असून पशुपालकांनी या आजारासंबंधी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी. जनावरांमध्ये कोणतेही लक्षणे आढळून आल्यास जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी आज केले आहे. लंपी स्किन आजाराचा जिल्ह्यात प्रादुर्भाव असेपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व बैलबाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी आज दिलेत. जिल्ह्यात झरी- जामणी मधील मुकुटबन येथे ६, बेमाडदेवी येथे २ आणि बाभुळगाव येथे १ अशा एकूण नऊ जनावरांना लंपी आजाराची लागण झाली आहे. त्यांच्यावर औषधोपचार चालू असून या तीन गावांच्या पाच किलोमीटरच्या परिघातील गावातील जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या आजाराला पायबंद घालण्यासाठी या आजाराची माहिती शेतकरी आणि पशुपालकांना व्हावी यासाठी ग्रामस्तरीय समित्या ॲक्टिव्ह करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. तसेच गावात

सुशासन नियमावलीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून सुशासन नियमावली करावी प्रशासनाचे व्हावे सुशासन...! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

यवतमाळ /मुंबई, दि. ८ : सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेऊन त्यांना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुलभरित्या मिळावा यासाठी सामान्यांच्या समस्या आणि शासकीय कार्यपद्धती यांची सांगड घालत सुशासन नियमावली करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. कृषी, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण आदिवासी विकास, रोजगार निर्मिती या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देऊन अन्य राज्यांना आदर्श ठरेल अशी नियमावली तयार करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सुशासन नियमावली तयार करण्याकरिता नियुक्त समितीची आज वर्षा निवासस्थानी बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या समितीचे अध्यक्ष निवृत्त तत्कालीन उपलोकायुक्त सुरेश कुमार, माजी मुख्य सचिव तथा समिती सदस्य जयंतकुमार बांठिया, स्वाधीन क्षत्रिय, के. पी. बक्षी, अजितकुमार जैन, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते. शासनाच्या सेवा नागरिकांना अधिक सुलभ व पारदर्शी पध्दतीने मिळाव्यात तसेच शासन व नागरिक यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी सुशासन नियमावलीमध्ये त्याचा अतर्भाव करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. प्रशासनाचे सु

किसान क्रेडीट कार्ड प्रदान करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत विशेष मोहीम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 8 सप्टेंबर (जिमाका) :- पी.एम. किसान सन्मान योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 1 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीमधे विशेष मोहीमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत ज्या पी. एम. किसान लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडीट कार्ड नाही त्यास नविन किसान क्रेडीट कार्ड देणे, ज्या लाभार्थी शेतकऱ्यांमकडे किसान क्रेडीट कार्ड आहे त्यांना आवश्यकतेनुसार मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन साठी वाढीव कर्जमर्यादा मंजुर करणे, आणि ज्या लाभार्थी शेतकऱ्यांकडील किसान क्रेडीट कार्ड अक्रियाशील आहे ते क्रियाशील करणे ही या मोहिमेची उद्दिष्ट्ये आहेत. जिल्ह्यातील ज्या पी.एम.किसान लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडीट कार्ड सुविधा नाही, अशा सर्व शेतकरी बांधवांनी त्वरीत आपले बँक शाखेशी संपर्क करून किसान क्रेडीट कार्ड उपलब्ध करुन घ्यावे व या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांनी बँकेचे निकषानुसार पिक कर्जवाटपाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाचे वतीने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा अग्रणी प्रबं

विधी सेवा प्राधिकरणद्वारे “एच.आय.व्ही.” आजारावर जनजागृती शिबिर

यवतमाळ, दि. 8 सप्टेंबर (जिमाका):- राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशावरून आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली 7 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 2 वाजता “एच.आय.व्ही” आजाराबाबत शासकीय सामान्य रुग्णालय, यवतमाळ येथे जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश के.ए.नहार हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण भोजने, पर्यवेक्षक प्रीती दास, समुपदेशक श्रीनिवास कुकडकर हे उपस्थित होते. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण भोजने व श्रीनिवास कुकडकर यांनी एच.आय.व्ही कशामुळे होतो व त्याबाबत काय उपाययोजना आहे याबाबत विस्तृत माहिती दिली. प्रीती दास यांनी एच.आय.व्ही पिडीतांकरीता असलेल्या कायद्याबाबत माहिती दिली. एच.आय.व्ही. झालेले व्यक्तींना कायद्यानुसार विशेष अधिकार आहे तसेच विहान काळजी व आधार केंद्र, यवतमाळ या संस्थेमार्फत एच.आय.व्ही. पीडित व्यक्तींकरिता योग्य ती सुविधा उपलब्ध होऊ शकते व त्यांना कोणतीही अडचण असल्यास प्रकल्प किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ या कार्या

कोविड सानूग्रह अनुदान मिळण्यासाठी बँक खाते आधार लिंक करावे

निवासी उपजिल्हाधिकारी यांचे पात्र अर्जदारांना आवाहन यवतमाळ, दि. 7 सप्टेंबर (जिमाका):- कोविड-19 आजारामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रुपये 50 हजार सानूग्रह सहाय्य प्रदान करण्याची योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेखाली ऑनलाईन पध्दतीने काही पात्र अर्जदारांच्या बँक खात्यात रुपये 50 हजार इतके सानूग्रह अनुदान NEFT/ABPS प्रणाली द्वारे जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. परंतू काही अर्जदार यांनी चुकीची बँक खात्याबाबत माहिती भरल्याने, बँक खात्याशी आधार लिंक नसल्याने त्यांना सानुग्रह मदत शासन स्तरावरुन जमा करण्यात आलेली नाही. करीता ज्या अर्जदारांनी अर्ज केला परंतु त्यांचे खात्यात सानुग्रह अनुदान जमा झाले नाही त्या अर्जदारांनी अर्जाचा टोकन आयडी, अर्जासोबत जोडलेले बँक खाते पासबुक व राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पासबुक घेऊन आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे कार्यालयीन वेळेत भेट देऊन अर्जाबाबतची माहिती अद्यावत करण्यास सहकार्य करावे, जेणे करुन संबंधित अर्जदारास सानुग्रह अनुदान मिळवून देण्याकरीता योग्य कार्यवाही करता येईल असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ललीत

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये स्वच्छता व आरोग्य यावर व्याख्यान संपन्न

Image
यवतमाळ, दि. 7 सप्टेंबर :- ग्रीन कॅम्पस इनिशिएटिव्हस अंतर्गत शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळ येथे स्वच्छ भारत मिशनचे समाजशास्त्रज्ञ महेंद्र गुल्हाने यांचे स्वच्छता व आरोग्य जागरूकता या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान नुकतेच संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉ. आर. पी. मोगरे हे होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते महेंद्र गुल्हाने यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, घरातील स्वच्छता व परिसरातील स्वच्छता कशी ठेवता येईल याबाबत सप्रयोग सखोल मार्गदर्शन केले. वरील कार्यक्रमाकरिता ग्रीन कॅम्पस इनिशिएटिव्हस या उपक्रमाचे समन्वयक एन. पी. ताठे, सर्व विभागाचे विभागप्रमुख, अधिकारी/कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांचा परिचय विज्ञान विभाग नियंत्रक उज्वला शिरभाते यांनी करून दिला, तसेच या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत सब्बनवार यांनी केले. 000

महारेन प्रणालीवर दैनंदिन व प्रागतिक पावसाचा अहवाल पुर्ववत उपलब्ध

यवतमाळ, दि. 7 सप्टेंबर (जिमाका):- महारेन प्रणालीमध्ये तांत्रीक सुधारणा पुर्ण करण्यात येवून पर्जन्यमानाचे महसुल मंडळ निहाय दैनंदिन व प्रागतिक अद्यावत अहवाल दि. 22 ऑगस्ट 2022 पासून प्रकाशित करण्यात येत आहे, त्यामुळे महसुल मंडळ निहाय दैनंदिन व प्रागतिक पर्जन्यमानाच्या आकडेवारीसाठी शेतकऱ्यांनी maharain.maharashtra.gov.in या संकेत स्थळाचे अवलोकन करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एन. एम. कोळपकर, यांनी केले आहे महावेध ही प्रणाली मे. स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि. यांनी विकसित केलेली असून त्यामधील एक वर्षापुर्वीची हवामानविषयक आकडेवारी सर्वांसाठी उपलब्ध आहे. तर महारेन ही प्रणाली सार्वजनीक संकेतस्थळावर (maharain.maharashtra.gov.in) असुन त्यावर दैनंदीन व प्रागतीक पर्जन्यमानाची आकडेवारी सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात येते. परंतु महारेन प्रणालीच्या अत्यावश्यक तांत्रीक देखभालीसाठी दि. 6 जुलै पासुन सदरचे संकेतस्थळ देखभाल-दुरूस्ती साठी बंद ठेवण्यात आलेले होते. परंतु असे असताना देखील शेतक-यांना दैनंदिन पर्जन्यमान पाहण्याकरीता थेट महावेध संकेतस्थळाच्या बाह्यलिंक द्वारे महारेन संकेतस्थळा

"मेरी पॉलीसी मेरे साथ"

यवतमाळ, दि. 7 सप्टेंबर (जिमाका):- केंद्र शासना मार्फत आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत प्रधानंत्री पिक विमा योजना व पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना हंगाम २०२२ साठी "मेरी पॉलीसी मेरे साथ" या उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी यवतमाळ जिल्ह्यात 1 सप्टेंबर पासुन राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम सन २०२२ मध्ये भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना त्यांची विम्याची पावती घरपोच देणारा “मेरी पॉलिसी मेरे हाथ" हा उपक्रम विमा कंपन्यांचे सहकार्याने राबविण्यात येत आहे. सदर अभियानात प्रधानमंत्री पिक विमा योजना व पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग बहार २०२२ अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा पॉलीसीच्या मुळ प्रति गावस्तरावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करुन वितरीत करण्यात येणार आहेत. मोहीमेचा अपेक्षित परिणाम : या मोहिमेतून पुढील परिणामांची अपेक्षा आहे. यात १. शेतकऱ्याला विम्याची रक्कम, विमा उतरवलेल्या पिकांचे प्रकार, विमा उतरवलेले एकुण क्षेत्र, विमा हप्त्याची रक्कम, इ. तपशिलांचा पुरावा/रेकॉर्ड प्राप्त होईल आणि हे भविष्यात उपयुक्त, ठरु शकते. विशेषतः विमा दाव्याच्या निश्चितीसाठी

पशुधनातील लंपी स्किन आजार घाबरण्याचे गरज नाही… पण खबरदारी आवश्यक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे पशुपालकांना दक्षता घेण्याचे आवाहन

Image
यवतमाळ, दि. 7 सप्टेंबर (जिमाका):- पशुधनातील लंपी स्किन आजार पसरू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असून या आजारामुळे जनावरे मृत्यूचे प्रमाण खुप कमी असल्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही मात्र पशुपालकांनी आजाराचे प्रमाण वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करून दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. काल नायगाव येथे एका पशुधनाला लंपी स्किन आजाराचे निदान झाल्याने सर्वांना माहिती देवून जनजागृती करण्यासाठी आज तातडीने व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व पशुसंवर्धन अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. क्रांती कोटोले व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी पुढे सांगितले की लंपी स्किन रोग व त्यावरील उपाययोजनाबाबत पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी नागरिकांना तातडीने माहिती द्यावी. जनावरांमध्ये रोग आढळल्यास वेळीच त्यांना विलग

शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील शिक्षकांशी संवाद

सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण यावर भर देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ---------- शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश मुंबई,/यवतमाळ दि.५: राज्यातील शाळांचा दर्जा वाढवितांनाच विशेषत: सरकारी शाळांचे सक्षमीकरण करण्याच्या तसेच पूर्व प्राथमिक स्तरांपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यातील शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. वर्षा येथील समिती सभागृहातून शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांशी मुख्यमंत्र्यांनी दूर दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सचिव रणजितसिंग देओल, संचालक कैलास पगारे उपस्थित होते तर राज्यातील जिल्हाधिकारी यांच्यासह शिक्षक दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वसमावेशक मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, महाराष्ट्राने शिक्षणामध्ये दिशादर्शक काम करुन देशाला नेहमीच नवनवीन प्रयोग आणि विचार दिले आहेत. राज्यातील सर्व मु

कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

यवतमाळ, दि 5 सप्टेंबर : खरीप हंगाम 2022-23 सुरू असून नुकत्याच पडलेल्या पावसामुळे पिकांना उभारी आली आहे. कपाशीचे पीक वाढीच्या व फुलपात्याच्या अवस्थेत आहे. कपाशी हे पीक पीकसंरक्षणाच्या अनुषंगाने काळजी घेऊन वेळीच कीड व रोगांचे व्यवस्थापन केल्यास पीकांचे समाधानकारक उत्पन्न मिळू शकते. कापूस पिकावरील गुलाबी बोडंअळीचे एकीकृत पणे व्यवस्थापन न केल्यास ही कीड प्रचंड पणे पिकांचे नुकसान करते यास्तव शेतकरी बांधवानी मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी जागृत राहून जाणीवपूर्वक वेळीच कपाशी वरील गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्याकरिता पुढीलप्रमाणे व्यवस्थापन करण्यात यावे. पिकांचा हंगाम डिसेंबर पर्यंत संपवून किडग्रस्त बोंडासहित पिकांचे अवशेष सेंद्रिय खतासाठी विल्हेवाट लावावी. कापूस संकलन केंद्र व जिनिंग फॅक्टरी मध्ये 15 ते 20 कामगंध सापळे जुलै ते डिसेंबर पर्यंत लावून पतंगाच्या मोठ्या प्रमाणात नायनाट करावा. हंगाम संपल्याबरोबर लगेच खोल नांगरणी करावी म्हणजे पतंगाचे जमिनीतील कोष उन्हाने किंवा पक्षाचे भक्ष होऊन नष्ट होतील. पूर्व मान्सून पेरणी शक्यतो टाळून हंगामात वेळेवर (जून ते जुल