लंपी स्कीन आजारासाठी एक लाखावर लस प्राप्त पशुसंवर्धन विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू

यवतमाळ, दि. 15 सप्टेंबर (जिमाका) :- यवतमाळ जिल्ह्यातील आठ गावात 16 गायवर्गीय जनावरांमध्ये लंपी स्कीन आजाराचा प्रार्दुभाव दिसून आला असून जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे सध्या तातडीने 79 हजार 300 लस तर राज्य पशुसंवर्धन विभाग यवतमाळ अंतर्गत 30 हजार लस उपलब्ध करण्यात आल्या असून आवश्यकतेनुसार अजून लस उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. सदर आजारा संबधाने जिल्हा प्रशासनाव्दारे प्रत्येक तालुक्यमध्ये भित्ती पत्राकाचे वाटप करुन गावांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. प्रामुख्याने सदर आजार बाधीत क्षेत्रापासून पाच कि.मी. परिसरातील जनावरांचे रिंगण स्वरुपात लसीकरण करण्यात येत आहे. ग्राम पंचायती मार्फत पशुंचे तसेच गोठा ठिकाणचे फवारणी करण्याबाबत निर्देश दिलेले आहे. त्याच प्रमाणे ज्या ग्रामपंचायत अथवा तालुक्यामध्ये सदर आजार आढळून आलेला आहे किंवा जनावरांमध्ये लक्षणे आढळून आलेले आहे अशा जनावरांना विलगीकरणात ठेवण्याबाबत सांगण्यात आलेले आहे. लक्षणे असलेल्या जनावरांची तपासणी, लसीकरण आणि आवश्यक औषध उपचाराची सेवा विनामुल्य देण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे जनावारांच्या मुक्त संचारावर प्रतिबंध घालण्यात आलेली आहे. सदर आजारामुळे जिल्ह्यामध्ये एकाही पशुचा मृत्यू झालेला नाही. आपल्याकडील जनावरामध्ये सदर आजाराची लक्षणे आढळून आल्यास वेळीच तपासणी आणि औषध उपाचार केल्यास सदर आजार बरा होते. सदर आजार जनावरामधून मनुष्यामध्ये संक्रमीत होत नाही त्यामुळे पशुपालकांनी घबरून न जाता आपल्या जनावरांचे लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यवतमाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी केले असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी