लोकशाही दिनात 142 तक्रारी प्राप्त

यवतमाळ, दि 5 सप्टेंबर (जिमाका) :- जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज एकूण 142 तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींचा निपटारा पुढील लोकशाही दिनापुर्वी करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रत्येक महिन्यातील पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांचेसह निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे व विविध विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल