१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ नागरिकांच्या समस्यांचा जलद निपटारा करून त्यांना सुशासनाचा अनुभव द्या जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रशासकीय यंत्रणेला सूचना

यवतमाळ, दि. 15 सप्टेंबर (जिमाका):- नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी व समस्यांचा जलद आणि पारदर्शकपणे निपटारा करून त्यांना सुशासनाचा अनुभव द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज सर्व प्रशासकीय यंत्रणेला दिल्या. शासनामार्फत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला असून यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्व कार्यालय प्रमुखांना दूरदृष्यप्रणालीद्वारे निर्देश दिले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे तसेच सर्व कार्यालय प्रमुख दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. या सेवा पंधरवड्यात सर्व विभागांनी आपले सरकार, महावितरण व डि.बी.टी पोर्टलवरील सेवा, नागरी सेवा केंद्रामार्फत देण्यात येणा-या शासकीय सेवा, विभागाच्या स्वतःच्या योजनांशी संबंधित पोर्टलवरील प्रलंबित अर्ज, तसेच झिरो पेन्डन्सी, लोकशाही दिन प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, सुंदर माझे कार्यालय उपक्रमाची अंमलबजावणी, न्यायालयीन व लोकायुक्त यांचेकडील प्रकरणे, जुने अभिलेख अभिलेखागारात पाठविणे, विविध वस्तु व वाहनांचे निर्लेखन, विशाख समितीची अंमलबजावणी, दिव्यांग व्यक्तींना आवश्यक नियमानुसार सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे, आठवडयाचा पहिला व शेवटचा दिवस स्वच्छता दिन म्हणून साजरा करणे तसेच सेवा पंधरवडातील मंगळवार दिनांक २० व २७ सप्टेंबर रोजी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महसूल विभागाने मतदान कार्ड आधार लिंक करणे, ई पिक पाहणी, कोलाम पोड, पारधी बेडे याठिकाणी सर्व योजनांची अंमलबजावणी करणे, दिव्यांग, तृतीयपंथी, निराधार महिला यांना विविध योजनेचा लाभ देणे, सातबारा दुरुस्तीबाबत आढावा घेणे, महाराजस्व अभियानअंतर्गत भुसंपादन केलेल्या प्रकरणी गांव दफ्तर अद्यावत करणे, नाविण्यापुर्ण योजना राबविणे, एका महीण्याचे वर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे व त्याकरीता मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेणे, विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देणे, ई- निस्तार पत्रक व वाजीब उल अर्ज नोंदी अद्यावत करणे, गाव नकाशामधील अतिक्रमण काढणे बाबत मोहीम स्वरुपात काम करणे, अनुसूचित जमातीना जमीन प्रत्याप्रित करणेबाबतच्या कायदयाची अंमलबजावणी करणे, भुदान संदर्भातील तक्रारी निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिले तसेच सेवा पंधरवडयातील कामकाजाचा प्रगती अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील त्यानी दिल्या. याप्रसंगी जिल्ह्यातील संबंधीत अधिकारी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी