महारेन प्रणालीवर दैनंदिन व प्रागतिक पावसाचा अहवाल पुर्ववत उपलब्ध

यवतमाळ, दि. 7 सप्टेंबर (जिमाका):- महारेन प्रणालीमध्ये तांत्रीक सुधारणा पुर्ण करण्यात येवून पर्जन्यमानाचे महसुल मंडळ निहाय दैनंदिन व प्रागतिक अद्यावत अहवाल दि. 22 ऑगस्ट 2022 पासून प्रकाशित करण्यात येत आहे, त्यामुळे महसुल मंडळ निहाय दैनंदिन व प्रागतिक पर्जन्यमानाच्या आकडेवारीसाठी शेतकऱ्यांनी maharain.maharashtra.gov.in या संकेत स्थळाचे अवलोकन करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एन. एम. कोळपकर, यांनी केले आहे महावेध ही प्रणाली मे. स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि. यांनी विकसित केलेली असून त्यामधील एक वर्षापुर्वीची हवामानविषयक आकडेवारी सर्वांसाठी उपलब्ध आहे. तर महारेन ही प्रणाली सार्वजनीक संकेतस्थळावर (maharain.maharashtra.gov.in) असुन त्यावर दैनंदीन व प्रागतीक पर्जन्यमानाची आकडेवारी सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात येते. परंतु महारेन प्रणालीच्या अत्यावश्यक तांत्रीक देखभालीसाठी दि. 6 जुलै पासुन सदरचे संकेतस्थळ देखभाल-दुरूस्ती साठी बंद ठेवण्यात आलेले होते. परंतु असे असताना देखील शेतक-यांना दैनंदिन पर्जन्यमान पाहण्याकरीता थेट महावेध संकेतस्थळाच्या बाह्यलिंक द्वारे महारेन संकेतस्थळावर दैनंदिन व प्रागतिक पर्जन्यमानाची आकडेवारी प्रकाशीत करुन सर्वांना उपलब्ध करुन देण्यात येत होती. त्यामुळे संकेतस्थळ अंडर मेटेनन्स असतांनाही दैनंदीन पर्जन्यमानाची आकडेवारी उपलब्ध करुन देण्यामध्ये शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होवू देण्यात आली नाही, असेही कोळपकर यांनी स्पष्ट केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी