शेतीला द्या पुरक व्यवसायाची जोड ७५ टक्के अनुदानावर शेळ्या - मेंढ्याचा गट पुरवठा योजना

यवतमाळ, दि २३,जिमाका :- शेती हा पूर्णत: निसर्गावर अवलंबुन असलेला व्यवसाय असल्यामुळे कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ तर कधी किडींचा प्रकोप अशा आपत्तिंमुळे शेतीचे उत्पादन बेभरवश्याचे ठरत आहे. त्यामुळे शेतक-यांनी पारंपारिक पिक पद्धतिला फाटा देत पिकपद्धतित बदल स्वीकारण्यासोबतच शेतीला एखाद्या पुरक धंद्याची जोड देणे ही काळाची गरज आहे. शेतक-यांना शेती पुरक व्यवसायासाठी शासन सुद्धा प्रोत्साहन देत असुन अनुदान आधारित योजना राबवित आहे. 'शेळी पालन' हा शेतिशी निगडित असलेला असाच एक जोड व्यवसाय शेतक-यांसाठी फायदेशिर ठरत आहे. शेळी, मेंढी पालन या व्यवसायासाठी ७५ व ५० टक्के अनुदानावर शेळया - मेंढयाचा गट पुरवठा ही योजना शासनामार्फत राबविण्यात येते. ही योजना राज्य आणि जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेतुन सर्वधारण लाभार्थी यांना ५० टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती, अनुसूचित क्षेत्राबाहेरिल अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर १ बोकड व १० शेळयांचा एक गट पुरवठा करण्यात येतो. *एका गटाची किंमत* १ बोकड व १० शेळ्यांच्या एका गटाची किंमत स्थानिक जातींकरिता-- ७८,२३१ रु, व उस्मानाबादी/संगमनेरी जातीसाठी- १,०३,५४५ रु आहे. *लाभ किती?*:- अनुसूचित जाती /जमातीसाठी ७५ टक्के अनुदान. शेळयांचे स्थानिक जातींकरिता - रु.५८,६७३ रुपये तर उस्मानाबादी/संगमनेरी जातीसाठी ७७,६५९ रुपये . २५ टक्के वित्तीय संस्थांचे कर्ज/लाभार्थी हिस्सा (रु.१९,५५८/-, शेळयांचे स्थानिक जातींकरिता व रु. २५,८८६/-, उस्मानाबादी/संगमनेरी जातीसाठी) या प्रमाणे वाटप करण्यांत येतो. सर्व साधारण लाभार्थीसाठी ५० टक्के अनुदान स्थानिक जातीसाठी ३९,११५ रु. व उस्मानाबादी शेळीसाठी ५१,७७२ रु देण्यात येते. तर ५० टक्के लाभार्थी हिस्सा किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज स्वरुपात भरावा लागतो. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आलेल्या या योजनेतुन सन २०१९-२० मध्ये १०२३, २०२०-२१ मध्ये १०९६, २०२१-२२ मध्ये ७२७ व्यक्तींना याचा लाभ मिळाला असुन २०२२-२३ मध्ये ११७१ लाभार्थ्याना लाभ देणे प्रस्तावित आहे. या पुरक व्यवसायामुळे होणारे फायदे- शेतीपुरक व्यवसायामुळे शेतक-याचे उत्पन्नाला हातभार लागुन शेतीत झालेल्या नुकसानीचा फटका कमी करता येऊ शकतो. तसेच शेतीची उत्पदकता वाढविण्यसाठी शेळ्यांचे मल- मुत्र खत म्हणुन उपयुक्त ठरते. अर्ज कुठे करावा:- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर करावा. अधिक माहितीसाठी संपर्क:- संबंधित पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आणि पशुसंवर्धन उपायुक्त यवतमाळ यांचेशी संपर्क साधावा. ००००० --

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी