"मेरी पॉलीसी मेरे साथ"

यवतमाळ, दि. 7 सप्टेंबर (जिमाका):- केंद्र शासना मार्फत आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत प्रधानंत्री पिक विमा योजना व पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना हंगाम २०२२ साठी "मेरी पॉलीसी मेरे साथ" या उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी यवतमाळ जिल्ह्यात 1 सप्टेंबर पासुन राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम सन २०२२ मध्ये भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना त्यांची विम्याची पावती घरपोच देणारा “मेरी पॉलिसी मेरे हाथ" हा उपक्रम विमा कंपन्यांचे सहकार्याने राबविण्यात येत आहे. सदर अभियानात प्रधानमंत्री पिक विमा योजना व पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग बहार २०२२ अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा पॉलीसीच्या मुळ प्रति गावस्तरावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करुन वितरीत करण्यात येणार आहेत. मोहीमेचा अपेक्षित परिणाम : या मोहिमेतून पुढील परिणामांची अपेक्षा आहे. यात १. शेतकऱ्याला विम्याची रक्कम, विमा उतरवलेल्या पिकांचे प्रकार, विमा उतरवलेले एकुण क्षेत्र, विमा हप्त्याची रक्कम, इ. तपशिलांचा पुरावा/रेकॉर्ड प्राप्त होईल आणि हे भविष्यात उपयुक्त, ठरु शकते. विशेषतः विमा दाव्याच्या निश्चितीसाठी संदर्भ म्हणून उपयोगी येईल. २. शेतक-यांना त्यांचे अभिप्राय/प्रश्न/तक्रारी सांगण्यासाठी संधी मिळेल. ३. विमा कंपन्यासाठी प्रचार व प्रसिध्दी साहित्य वितरीत करण्याची आणि शेतक-यांना पीक विमा मोबाईल अॅप्स स्थापीत करण्यासाठी तसेच योजनेची वैशिष्टये आणि फायदे जाणून घेण्यासाठी आणि आगामी हंगामासाठी नावनोंदणी करण्यास प्रोत्साहीत करण्याची संधी म्हणून काम करता येईल. ४. यामुळे शेतकऱ्यांमध्ये पिक विमा योजनेबाबत, राज्य/केंद्रशासन तसेच विमा कंपन्यांबद्दल जागरुकता आणि विश्वास वाढेल. ५. पीक विमा माहितीतील उणी दूर करणे आणि जागरुकता वाढण्यास मदत होते आणि योजने विषयी गैरसमज दूर होवुन खात्रीशीर माहिती मिळेल. ६. पोस्ट ऑफीसद्वारे पॉलीसी वितरीत करण्यात होणारा अवाजवी विलंब आणि खर्च टाळला जाईल. बॅक/सी.एस.सी. द्वारे पोर्टलमध्ये प्रविष्ट केलेले तपशिल तपासून खातरजमा करण्यास देखील मदत होईल आणि अशा प्रकारे केलेल्या कोणत्याही चुका बॅका/सी.एस.सी. समोर आणल्या जातील. त्यांच्या देखील कामात सुधारणा होईल. ७. पिक विमा अंमलबजावणी संदर्भातील सर्व घटक जसे राज्य सरकार, विमा कंपन्या, बँका आणि सामाईक सुविधा केंद्र इत्यादींनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, समान उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी, सर्वांच्या सहकार्याने कार्य करणे यामुळे सर्वांमध्ये योजना समन्वय निर्माण होईल. ८. शेतकरी वर्गाच्या वर्तवणुकीतील अपेक्षित बदल घडेल, शेतीत काम करण्यासाठी आणि पिक विम्यात सहभागी होऊन जोखीम कमी करण्याचे महत्त्व त्यांना समजेल आणि आर्थीक सुरक्षितता प्राप्त होईल. ९. शेतकरी पिक विम्याबाबत माहितीपुर्ण निर्णय घेऊ शकतील, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी