आश्रमशाळा, वसतिगृहातील स्वयंपाकी व् सहाय्यक यांचे प्रशिक्षण घेण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सुचना

यवत्माळ, दि २१, जिमाक: मागील आठवड्यात आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना जेवणातून झालेल्या विषबाधा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हि जे एन टी यांच्यासाठी असलेल्या निवासी शाळा, बालगृह, अनुदानित व विनाअनुदानित वस्तीगृह तसेच विद्यार्थ्यांना भोजन दिले जाते अशा सर्व ठिकाणी स्वयंपाकी आणि स्वयंपाक घर सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना अन्नपदर्थ व अन्नधान्य हाताळण्या संदर्भात प्रशिक्षण देण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. स्वयंपाक करणारे व त्याला हाताळणाऱ्या सर्व लोकांची वैद्यकीय तपासणी बंधनकारक करावी. तीन महिन्यातून एकदा या व्यक्तींची तपासणी करून कोणताही संसर्गजन्य आजार नाही याची खात्री करावी असेही त्यांनी सांगितले. थोड्याच दिवसात नवरात्राला सुरुवात होऊन जिल्ह्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असेल. अशा काळात सार्वजनिक ठिकाणी जेवण दिले जाते त्या जेवणाची सुद्धा अन्न ल्व् औषध प्रशासनाने तपासणी करावी. दुर्गोत्सव मंडळांना अन्न पदार्थ हाताळण्या संदर्भातिल सूचना द्याव्यात. तसेच या काळात मोठ्या प्रमाणात मिठाईची विक्री होते. तेव्हा मिठाई व इतर खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्या दुकानांची सुद्धा तपासणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. दुकानांची नोंदणी नसल्यास अशा दुकानांना दंड करण्यासही त्यांनी बजावले. सर्व शाळांमध्ये पौष्टिक खाद्यपदार्थ, अन्नपदार्थातील भेसळ कशी ओळखावी यासंदर्भात शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे एक दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. गुटखा बंदी कायद्याची अंमलबजावणी करताना सर्व पान टप-यांवर गुटख्याचे दुष्परिणाम,त्यामुळे होणारे आजार आणि कायद्यानुसार होणारी शिक्षा याबाबत जनजागृती करणारे पोस्टर्स लावण्यात यावेत अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्यात. आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत जिल्हास्तरिय सल्लागार समितिच्या बैठकिला जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भाऊराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडु , जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त सागर तेरकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी मनोहर उके,अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे आणि घनश्याम दंदे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी