Posts

Showing posts from May, 2020

आणखी एका पॉझेटिव्हची भर, एकूण संख्या 19 वर

v आयसोलेशन वॉर्डात 20 जण भरती यवतमाळ, दि. 30 : रुग्णवाहिकेने मुंबईवरून मृत पॉझेटिव्ह रुग्णाला यवतमाळ येथे आणणा-या तीन चालकापैकी एकाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुणांची संख्या एकने वाढून 19 झाली आहे. सध्यास्थितीत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 19 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आणि एक प्रिझमटिव्ह केससह एकूण 20 जण भरती आहेत. शनिवारी रात्री पॉझेटिव्ह रुग्णाला घेऊन खाजगी रुग्णवाहिकेने एकूण पाच जण यवतमाळ येथे आले. येथे पोहचण्यापूर्वीच सदर रुग्णाचा मृत्यु झाला. या रुग्णवाहिकेत तीन चालक आणि मृतकाचा भाऊ यांचा समावेश होता. या चारही जणांना लगेच येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले व त्यांचे नमुने तपासणीकरीता पाठविले. रविवारी सकाळी या तीन चालकापैकी एकाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला तर उर्वरीत तीन जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. गत 24 तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण 16 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक पॉझेटिव्ह, 14 निगेटिव्ह तर एका रिपोर्टचे निदान अचूक नसल्यामुळे त्याला पुन्हा पाठविण्यात येणार आहे. वैद्यकीय महावि

मृत पॉझेटिव्ह रुग्णाबरोबर आलेले चार जण विलगीकरण कक्षात दाखल

v रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच झाला मृत्यु यवतमाळ, दि. 30 : मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील मात्र मुंबई येथे पॉझेटिव्ह आढळलेल्या व्यक्तिला रुग्णवाहिकेने येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणतांना त्यांचा मृत्यु झाला. त्यामुळे त्यांच्यावर येथे उपचार करणेही शक्य झाले नाही. रुग्णवाहिकेत या मृतकासोबत आलेल्या चार जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले असून त्यांचे नमुने तपासणीकरीता लगेच पाठविण्यात येणार आहे. दिग्रस तालुक्यातील आरंभी येथील राजेश कालू राठोड (वय 43) हे मुंबई घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पीटलमध्ये गत चार दिवसांपासून भरती होते. मात्र तेथून MH 06 J- 8828  या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत राजेश राठोड, त्यांचा भाऊ आणि तीन चालक यवतमाळकडे निघाले. शनिवारी सायंकाळी सदर रुग्णवाहिका राजेश राठोड यांना घेऊन येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोहचली. मात्र प्रवासादरम्यान रुग्णवाहिकेमध्येच राजेश राठोड यांचा मृत्यु झाल्याचे निदर्शनास आले. वैद्यकीय महाविद्यालयाने मृतकाचे सर्व रिपोर्ट मुंबईवरून मागविले असून त्यांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आहेत. त्यामुळे सोबत आलेले तीन चालक आणि मृतकाचा

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनामुळे पहिला मृत्यू

Image
v 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' सात जणांना सुट्टी यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यात 12 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला. तेव्हापासून ही संख्या 125 पर्यंत गेली. मात्र 12 मार्च ते 29 मे या कालावधीत जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला नव्हता. शनिवारी मात्र उमरखेड तालुक्यातील नागापूर येथील पॉझेटिव्ह असलेल्या महिलेचा (वय 42) मृत्यु झाल्यामुळे जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्युची नोंद झाली आहे. सदर महिला ही मुंबईवरून उमरखेड येथे आली होती. तिचे नमुने तपासणीकरीता पाठविले असता तिचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला. या महिलेला गुरुवारी रात्री येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले होते. तिला श्वसनामध्ये त्रास होऊ लागल्यामुळे सुरवातीपासूनच डॉक्टरांचे तिच्या प्रकृतीवर अतिशय काळजीपूर्वक लक्ष होते. तीला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी मध्यरात्रीपासून शर्तीचे प्रयत्न केले. मात्र अखेर श्वसनाच्या त्रासामुळे शनिवारी सकाळी तिचा मृत्यु झाला. मुंबईवरून आलेला तसेच सुरवातीपासून संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती असलेल्या एका जणाचा रिपोर्ट पॉझेट

'त्या' अपघातील तीन जखमी बरे झाल्यानंतर मध्यप्रदेशला रवाना

Image
v प्रशासनामार्फत खाजगी वाहन आणि जेवणाच्या साहित्याची व्यवस्था यवतमाळ, दि. 30 : स्थलांतरीत मजुरांना घेऊन जाणा-या बस अपघातात जखमी झालेले मध्यप्रदेशातील तीन रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सदर नागरिकांना मध्यप्रदेशला रवाना करण्यासाठी खाजगी वाहन तसेच प्रवासादरम्यान भोजन, पाणी, फूड पॅकेट्सची व्यवस्था करण्याच्या सुचना तहसीलदार कुणाल झाल्टे यांना दिल्या होत्या. त्यानुसार तहसीलदारांनी सर्व व्यवस्था करून तीनही नागरिकांना वैद्यकीय महाविद्यालयातून मध्यप्रदेशसाठी रवाना केले. सुट्टी देण्यात आलेल्या नागरिकांमध्ये सोनूलाल दादू आणि रामराज बैगा हे दोघेही मधप्रदेशातील सिधी या जिल्ह्यातील बहरी तालुक्यात अमरही गावचे रहिवासी आहेत. तर सुनिल सिंह हे रिवा जिल्ह्यातील तेवथर तालुक्यात चौखडा या गावाचे रहिवासी आहेत. 25 मे रोजी झारखंड येथील पलामू जिल्ह्यातील 16 मजुरांना रुग्णालयातून सुट्टी झाल्यामुळे त्यांच्या गृहराज्यात रवाना करण्यात आले होते. दि. 19 मे रोजी सोलापूरवरून नागपूरला स्थलांतरीत मजुरांना घेऊन जाणा-य

नागरिकांनो, उपचार व विलगीकरणाला घाबरू नका - पालकमंत्री राठोड

Image
v नागापूर कोरोनामृत प्रकरणी गावसमितीला जबाबदार पकडणार यवतमाळ, दि. 30 : रेड झोनमधून येणा-या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बाहेरून आलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना विलगीकरण कक्षात राहणे अत्यावश्यक आहे. नागरिकांना कोरोनासदृश्य लक्षणे आढळताच त्यांनी त्वरीत शासकीय यंत्रणेशी संपर्क करावा. स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याच्यादृष्टीने उपचार आणि विलगीकरणाला नागरिकांनी अजिबात घाबरू नये, असे कळकळीचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे. जिल्ह्यात सध्या इतर राज्यातून तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहे. यात रेड झोनमधून येणा-या नागरिकांचाही समावेश आहे. बाहेरून आलेल्या नागरिकांवर लक्ष देण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्याची स्थिती लक्षात आणून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गावस्तरीय समिती स्थापन केली आहे. यात ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, मंडळ अधिकारी आदींचा समावेश आहे. या समितीने विलगीकरणात असलेल्या नागरिकांवर तसेच काही लक्षणे असलेल्या नागरिकांवर गांभिर्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आतापर्यंत अडीच महिन्यात यवत

जलसंपदा विभागातील मंजूर पदे वर्ग करण्याबाबतच्या ‘त्या’ आदेशाला स्थगिती

Image
v वनमंत्र्यांच्या प्रयत्नाने कार्यवाही थांबली यवतमाळ, दि. 29 : जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा अपु-या असल्या तरी त्या वाढविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. अशा परिस्थितीत जलसंपदा विभागात सिंचनासाठी यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत असलेले मनुष्यबळ धरण सुरक्षितता कक्षात स्थलांतरीत केले तर त्याचा परिणाम जिल्ह्याच्या सिंचन व्यवस्थेवर होईल. ही बाब लक्षात घेता राज्याचे वने] भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जलसंपदा विभागातील मंजूर पदे वर्ग करण्याबाबतच्या आदेशाला स्थगिती द्यावी, असे निर्देशित केले होते. त्यांच्या या मागणीची तात्काळ दखल घेऊन सदर आदेशाला जलसंपदा विभागाने स्थगिती दिली आहे. जिल्ह्याची संपूर्ण अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर आधारीत आहे. मान्सुनच्या पावसावरच येथील बहुतांश शेती अवलंबून आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत शेतक-यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा विभागाकडे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सिंचनापासून वंचित आहे. तसेच जलसंपदा विभागामध्ये अधिकारी व कर्मचारी यांची पदेसुध्दा रिक्त आहेत. असे असतांना येथे कार्यरत असलेल्या

पुन्हा एका पॉझेटिव्ह रुग्णाची भर, संख्या 25 वर

Image
v आयसोलेशन वॉर्डात 30 जण भरती यवतमाळ, दि. 29 : उमरखेड येथे मुंबईवरून आलेली महिला पॉजिटिव्ह आल्याने कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत एकने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता एक्टिव पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या 25 झाली असून आयसोलेशन वॉर्डात 30 जण भरती आहेत. यात पाच केसेस प्रिझमटिव्ह आहेत. नव्याने पॉजिटिव्ह आलेली ही महिला संस्थात्मक विलागिकरण कक्षात भरती होती. तिला गुरुवारी रात्री वैद्यकिय रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले आहे. तसेच तिच्या कुटुंबातील 19 सदस्य संस्थात्मक विलागिकरण कक्षात भरती होते. आता त्यांना जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. गत 24 तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण 37 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 11 पॉझेटिव्ह, 25 निगेटिव्ह तर एकाचा रिपोर्ट अचूक नसल्याने तपासणीकरीता तो पुन्हा पाठविण्यात येईल. सुरवातीपासून आतापर्यंत 2042 नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे. यापैकी 2038 रिपोर्ट प्राप्त तर चार रिपोर्ट अप्राप्त आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 124 झाली आहे. यापैकी तब्बल 99 जण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले

धरण सुरक्षितता कक्षाबाबतच्या ‘त्या’ आदेशाला स्थगिती देण्याचे वनमंत्र्यांचे निर्देश

Image
यवतमाळ, दि. 29 : जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा अपु-या असल्या तरी त्या वाढविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. अशा परिस्थितीत जलसंपदा विभागात सिंचनासाठी यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत असलेले मनुष्यबळ धरण सुरक्षितता कक्षात स्थलांतरीत केले तर त्याचा परिणाम जिल्ह्याच्या सिंचन व्यवस्थेवर होईल. त्यामुळे धरण सुरक्षितता कक्षाकरीता येथील मंजूर पदे वर्ग करण्याबाबतच्या आदेशाला त्वरीत स्थगिती द्यावी, असे निर्देश राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना दिले आहे. जिल्ह्याची संपूर्ण अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर आधारीत आहे. मान्सुनच्या पावसावरच येथील बहुतांश शेती अवलंबून आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत शेतक-यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा विभागाकडे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सिंचनापासून वंचित आहे. तसेच जलसंपदा विभागामध्ये अधिकारी व कर्मचारी यांची पदेसुध्दा रिक्त आहेत. असे असतांना येथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांची पदे इतरत्र वर्ग केल्यास त्याचा विपरीत परिणाम येथील सिंचन व्यवस्थेवर

आणखी 10 जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह, संख्या 24 वर

Image
यवतमाळ, दि. 28 : कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या 10 जणांचे रिपोर्ट नव्याने पॉझेटिव्ह आल्याने जिल्ह्यात आता ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 24 वर गेली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला गुरुवारी रात्री 23 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 10 पॉझेटिव्ह, 12 निगेटिव्ह आणि एक रिपोर्ट अचूक निदान नसल्याचे कळविण्यात आले आहे. 10 पॉझेटिव्ह रुग्णांपैकी आठ जण दिग्रस येथील तर दोन जण पुसद येथील आहेत. हे सर्व जण पॉझेटिव्ह रुग्णांच्या अगदी निकटच्या संपर्कातील (हाय रिस्क काँटॅक्ट) आहेत. दिग्रस येथील सहा जण एकाच कुटुंबातील आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या नागरिकांच्या संपर्कातील इतर नागरिकांचा तातडीने शोध घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले आहे. जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, आरोग्य विभाग व संपूर्ण यंत्रणा कोरोनाच्या संकटाचा सामना अहोरात्र करीत आहे. मात्र असे असतांना दिग्रस येथे मुंबईवरून आलेल्या नागरिकांना गृह विलगीकरणात ठेवण्याचे सक्त आदेश असतांना त्यांनी कुटुंबासह पार्टी केली. यातून ते पॉझेटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले. त्यामुळे या सर्वांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदर्शन

विविध ठिकाणी भरती असलेल्या 53 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

v आयसोलेशन वार्डात 14 पॉझेटिव्हसह 17 जण भरती यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात विविध ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती असलेले 43 आणि इलेक्टिव्ह सर्जरी कक्षात भरती असलेले 10 असे एकूण 53 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणातील 43 रिपोर्टपैकी दिग्रस येथील 16 रिपोर्ट, पुसद येथील 16 रिपोर्ट, आर्णी येथील 3 रिपोर्ट, केळापूर येथील 2 रिपोर्ट, यवतमाळ येथील 2 रिपोर्ट तर घाटंजी, वणी, मारेगाव आणि सर्जरी वॉर्डातील प्रत्येकी 1 रिपोर्टचा समावेश आहे. तर उपचारासाठी विविध तालुक्यातील इलेक्टिव्ह सर्जरी कक्षात भरती असलेल्या 10 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. गत आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीला ब्रेक लागला आहे. सद्यस्थितीत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 14 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण 17 जण भरती आहेत. यात तीन केसेस प्रिझमटिव्ह आहे. आज (दि.28) वैद्यकीय महाविद्यालयाने 26 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत तपासणीकरीता पाठविलेल्या एकूण नमुन्यांची संख्या 2034 असून यापैकी 1991 रिपोर्ट प्राप्त तर 34 रिपोर्ट अप्राप्त

अवैधरित्या कापूस विकणा-यांविरुध्द होणार कडक कारवाई - पालकमंत्री संजय राठोड

Image
यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यातील शेतक-यांचा कापूस युध्दस्तरावर खरेदी करण्याचे निर्देश सहकार विभाग, कॉटन फेडरेशन, सीसीआय आदींना देण्यात आले आहे. जिल्ह्यात कोव्हिडनंतर नोंदणी झालेल्या शेतक-यांचा सर्वे करण्यात येत असून त्यांच्या घरात किती कापूस आहे, याची नोंद घेण्यात येत आहे. यात बोगस नोंदणी किंवा दुस-याचा कापूस स्वत:च्या नावावर दाखवून अवैधरित्या कापसाची विक्री करणा-यांविरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, अकोला येथील सीसीआयचे अजयकुमार व कापूस पणन महासंघाचे श्री. महाजन उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील शेतक-यांचा कापूस खरेदी करण्याला प्राधान्य असून इतर जिल्ह्यातून विक्रीकरीता येणा-या कापसाला जिल्हाबंदी करावी. तसेच आतापर्यंत खरेदी करण्यात आलेल्या सर्व शेतक-यांची यादी सीसीआय व फेडरेशनकडून घेण्यात येईल. या आधारावर तहसीलदार, सहाय्यक निबंधक, तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत सखोल चौकशी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये दोषी आढळलेल्

रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य द्या

Image
v जिल्हाधिका-यांनी घेतला विविध विषयांचा आढावा यवतमाळ, दि. 28 : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. मात्र यात शिथिलता मिळाल्यामुळे विविध ठिकाणी अडकलेले मजूर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात परत आले आहेत.   दैनंदिन उदरनिर्वाह करण्यासाठी या मजुरांना आता कामाची गरज आहे. त्यामुळे रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य देऊन ‘मागेल त्याला काम’ या प्रमाणे प्रत्येकाला काम उपलब्ध करून द्यावे, अशा सुचना जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिल्या. नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात जवळपास 66 हजार लोक बाहेरून आले आहेत. यात मजुरांचाही समावेश आहे. या मजुरांना तहसीलदार आणि गटविकास अधिका-यांनी जॉब कार्ड उपलब्ध करून द्यावे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान दहा कामे सुरू केली तर जवळपास 12 हजार कामे सुरू होऊ शकतात. त्यामुळे मजुरांना रोजगार उ

रोज अडीच हजार शेतक-यांचा कापूस खरेदी करण्याचे नियोजन

Image
v पालकमंत्री आणि जिल्हाधिका-यांचे विशेष लक्ष v बोगस नोंदणी आणि उत्पनापेक्षा जास्त विक्री आढळल्यास कारवाई यवतमाळ, दि. 28 : शेतक-यांच्या कापसाला चांगला भाव मिळावा, त्याच्या हातात दोन पैसे जास्त यावे, या उद्देशाने शासन हमी भावाप्रमाणे शेतक-यांकडून कापूस खरेदी करते. मात्र जिल्ह्यातील शेतक-यांचा कापूस घरातच असल्याचे निदर्शनास आल्यामुळे शेतक-यांकडील कापूस त्वरीत खरेदी करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला दिले. त्यानुसार आता रोज अडीच हजार शेतक-यांचा कापूस खरेदी करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यावर्षीचा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. मात्र अजूनही जिल्ह्यातील शेतक-यांचा कापूस घरात आहे. यावर पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच शेतक-यांना दिलासा देण्यासाठी घरात असलेला कापूस त्वरीत खरेदी करा, असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनासह सहकार विभागाला दिले होते. यावर नियोजन करीत जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सहकार विभाग, सीसीआय, कॉटन फेडरेशनच्या सर्व अधिका-यांची विशेष बैठक बोलावली. तसेच जिनिंग मालकांसोबतही चर्चा केली. त्यानुसार नोंदणी झालेल्या सर्व श

‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : आणखी एकाला सुट्टी

Image
v आयसोलेशन वॉर्डात आता 14 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण यवतमाळ, दि. 27 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या व सुरवातीला पॉझेटिव्ह रिपोर्ट आलेला रुग्ण उपचारानंतर बरा झाल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सदर रुग्णाला पुढील 14 दिवास गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डातील ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या एक ने कमी होऊन 14 झाली आहे. गत चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण वाढीला ब्रेक लागला आहे. एवढेच नाही तर उपचाराअंती बरे होण्याचे प्रमाण यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आहे. कोव्हिडमुळे आतापर्यंत एकही मृत्यु झाला नाही. ही प्रशासनासाठी अभिनंदनीय बाब आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 113 वर गेली असून यापैकी तब्बल 99 जण बरे होऊन घरी गेले आहेत. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 14 ॲक्टीव्ह रुग्णांसह एकूण 15 जण भरती आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी 61 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 2006 नमुने तपासणीकरीता पाठविण्

मजूरांना रोहयोची कामे उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करा

Image
v पालकमंत्र्यांचे अधिका-यांना निर्देश यवतमाळ, दि. 27 : अडकलेल्या नागरिकांना स्वगृही जाण्याची परवानगी मिळाल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरीक आले आहेत. यात मजुरांचाही समावेश आहे. ‘मागेल त्याला काम’ या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तसेच बाहेरून आलेल्या मजुरांना रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिका-यांनी आतापासून योग्य नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मग्रारोहयोच्य कामाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगिता राठोड, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मनोज चौधर आदी उपस्थित होते. लॉकडाऊनमुळे लोकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आवासून उभा आहे, असे सांगून पालकमंत्री राठोड म्हणाले, रोजगारासाठी बाहेर राज्यात व जिल्ह्यात गेलेले मजून स्वगृही परत आले आहेत. दैनंदिन कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्यांना कामाची गरज आहे. 31 मे नंतर हे मजूर कामे मागण्यासाठी येतील. त्यांना रो

16 तालुक्यात मोबाईल फिवर क्लिनीक सुरू

Image
v जिल्हाधिका-यांच्या संकल्पनेतून गावागावात उपचार उपलब्ध यवतमाळ, दि. 27 : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आता शहरातून ग्रामीण भागातही पसरू लागला आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे हा प्रादुर्भाव इतर नागरिकांना होऊ नये म्हणून प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या आहेत. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या संकल्पनेतून गावागावात नागरिकांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यासाठी मोबाईल फिवर क्लिनीक सुरू करण्यात आले आहे. मोबाईल फिवर क्लिनीक म्हणजे चाकावरील फिरता दवाखाना असून 16 तालुक्यात मोबाईल व्हॅनद्वारे नागरिकांची तपासणी व त्वरीत उपचार असा याचा उद्देश आहे. या वाहनात एक डॉक्टर, एक आरोग्य सेवक / सेविका, एक औषध निर्माण अधिकारी अशा तीन सदस्यांचा समावेश आहे. सोबतच मोबाईल व्हॅनमध्ये अत्याधुनिक इंफ्रारेड थर्मामीटर, पल्स ऑक्सीमीटर तसेच सर्व प्रकारची औषधी उपलब्ध राहील. यासाठी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडून प्रति तालुका एक याप्रमाणे स्कलू बस अधिग्रहीत करण्यात आली आहे. या मोबाईल व्हॅनमध्ये इतर सर्व बाबी आरोग्य विभागाच्या आहेत. वाहनांवर जीपीआरएस प्रणाली लाव

5 जूनपूर्वी सर्व नोंदणी धारकांचा कापूस खरेदी करणार - पालकमंत्री संजय राठोड

Image
यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी लॉकडाऊन कालावधीत 20 ते 30 एप्रिल 2020 दरम्यान कापूस विक्री नोंदणी केली होती. त्यापैकी शिल्लक असलेल्या एकूण 17500 वैध नोंदणी धारकांचा कापूस 5 जून 2020 पूर्वी खरेदी केल्या जाईल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व्हीसीद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीनंतर झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यवतमाळ जिल्ह्यात 2019-20 च्या कापूस हंगामात आजपर्यंत एकूण 2 लक्ष 45 हजार 454 कापूस उत्पादकाकडून 50 लक्ष 27 हजार 172 क्विंटल कापूस खरेदी केला आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे लॉकडाऊन काळात दिनांक 24 मार्च  ते 2 मे 2020 पर्यंत कापूस खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना बराचसा त्रास सहन करावा लागला, असेही पालकमंत्री म्हणाले. लॉकडाऊन कालावधीमुळे कापूस खरेदीबाबत सुक्ष्म नियोजन करून दिनांक 20 ते 30 एप्रिल 2020 दरम्यान एकूण 30 हजार 876 उत्पादकांनी बाजार समित्यांमध्ये नोंदणी केली. जिल्ह्यातील एकूण 52 जिनिंगपैकी 44 जिनिंग हे सीसीआय व कॉटन फेडरेशन यांच्यासोबत करारबध्द होते. परंतु लॉकडाऊनमुळे परप्रांतात मजूर गेल्यामुळे 28 जिनिंग तातड

कोरोना : गावस्तरीय समित्यांनी गांभिर्याने कामे करावीत

Image
v पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले निर्देश यवतमाळ, दि. 26 : जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या असून आता गावस्तरीय समित्यांचे गठन केले आहे. या समितीमध्ये पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आदींचा समावेश आहे. या समितीने अत्यंत काळजीपूर्वक कामे करून दैनंदिन अहवाल प्रशासनाला सादर करावा, अशा सुचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत. कोरोनाचा प्रादर्भाव आता शहरातपुरता मर्यादीत न राहता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पसरला आहे. शासन आणि प्रशासन नागरिकांची काळजी घेत असून संकटाच्या या काळात नागरिकांनी शासनाच्या सर्व आदेशांचे पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात आता पुणे, मुंबई आदी ठिकाणांवरून नागरिक येत आहे. त्यांच्यामुळे प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. जिल्हामध्ये  मुंबईवरून आलेल्या लोकांमुळे संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्या त्या भागातील विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, बीट जमादार, मंडळ अधिकारी आदी सर्वांनी गावागावात भेट देऊन कोण बाहेरून आले, त्यांची आरोग्य तपासणी आदी बाबी कराव्यात. बाहेरून आलेल्या लोकांना शाळ

बरे झालेले 16 मजुर झारखंडला रवाना

Image
v बस आणि टिप्परच्या अपघातात झाले होते जखमी यवतमाळ, दि. 25 : स्थलांतरीत मजुरांना नागपूरला घेऊन जाणा-या बस अपघातात जखमी झालेले 16 मजुर उपचारानंतर पुर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना आज (दि. 25) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सुट्टी देण्यात आली. तसेच त्यांच्या गृहराज्यात झारखंडला या मजुरांना पाठविण्यासाठी येथील जिल्हा प्रशासनाने विशेष व्यवस्थासुध्दा केली. गत आठवड्यात 19 मे रोजी सोलापूरवरून नागपूरला स्थलांतरीत मजुरांना घेऊन जाणा-या बसचा आर्णी तालुक्यातील कोळवण येथे अपघात झाला होता. या अपघातात चार जण ठार तर 28 जण जखमी झाले होते. जखमींमध्ये झारखंडचे 19 मजूर, छत्तीसगडचे आठ आणि मध्यप्रदेशचे तीन असे एकूण 30 जण आणि दोन चालक होते. सर्व जखमींना यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आल्यावर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. यापैकी 16 मजूर उपचाराअंती पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना झारखंड राज्यातील पलामू जिल्ह्यात विशेष व्यवस्थेने रवाना करण्यात आले. अपघाताचे वृत्त माहित होताच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी रुग्णालयात जावून जखमींची विचा

'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' : दोन जणांना सुट्टी

Image
v 15 पॉझेटिव्हसह आयसोलेशन वॉर्डात 21 जण भरती यवतमाळ, दि. 25 : गत दोन दिवसांत जिल्ह्यात कारोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नाही. त्यातच सुरवातीला पॉझेटिव्ह असलेले दोन जण 14 दिवसांच्या उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना वैद्यकीय महाविद्यालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढील 14 दिवस त्यांना आरोग्य विभागाच्या निगराणीखाली गृह विलगीकरणात ठेवण्यात येईल. जिल्ह्यात सद्यस्थितीत 15 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण 21 जण आयसोलेशन वॉर्डात भरती आहेत. यापैकी सहा केसेस प्रिझमटिव्ह आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 113 वर गेला असून यापैकी तब्बल 98 जण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यातच जिल्ह्यात कोव्हिडमुळे एकही मृत्यु झाला नाही. ही जिल्ह्याच्या प्रशासनाच्या दृष्टीने अतिशय दिलासादायक बाब आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सोमवारी 25 नमुने तपासणीकरीता पाठविले. आतापर्यंत महाविद्यालयाने एकूण 1938 नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 1914 रिपोर्ट प्राप्त तर 24 रिपोर्ट अप्राप्त आहेत. आतापर्यंत निगेटिव्ह असलेल्या रिपोर्टची संख्

कर्जमुक्ती योजनेच्या थकीत खातेदारांनाही मिळणार खरीपामध्ये कर्ज

Image
v वनमंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्याला यश v यवतमाळ, बुलडाणा व अमरावतीसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतक-यांना होणार लाभ यवतमाळ, दि. 25 : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतक-यांना त्यांचे कर्ज थकीत असले तरी चालू हंगामाकरीता पीक कर्ज मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतक-यांसाठी ही अतिशय दिलासा देणारी बाब असून वनमंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक व आचारसंहितेमुळे महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे जवळपास 98 हजार शेतकरी चालू खरीप हंगामाकरीता थकबाकीदार झाले होते. त्यामुळे त्यांना खरीप हंगामात कर्ज वाटपाबाबत अडचण येत होती. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीमध्ये सदर शेतक-यांना चालू हंगामाकरीता पीक कर्ज देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन शासनाने त्याच दिवशी शासन निर्णय निर्गमीत केला. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पात्र असणा-या परंतु ग्रामपंचायत निवडणुकीच्य

17 पॉझेटिव्हसह आयसोलेशन वॉर्डमध्ये 31 जण भरती

Image
यवतमाळ, दि. 24 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये 17 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण 31 जण आहे. यात 14 प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे. आज (दि.24) चार जण आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती झाले आहे. रविवारी वैद्यकीय महाविद्यालयाने 18 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 1912 नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे. यापैकी 1894 रिपोर्ट प्राप्त तर 18 रिपोर्ट अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1781 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 113 वर गेली असून यापैकी 96 रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डमध्ये 17 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण भरती आहेत. संस्थात्मक विलगीकरण कक्षात 13 जण तर गृह विलगीकरणात 491 जण आहेत. रमजान ईदनिमित्त शुभेच्छा : मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान ईदचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना रमजान ईद निमित्त जिल्हाधिकारी एम.डी. सिंह आणि पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्याकडून हार्दिक श

जिल्ह्यात आणखी एकाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह

v 17 पॉझेटिव्हसह आयसोलेशन वॉर्डमध्ये 22 जण भरती  यवतमाळ, दि. 23 : जिल्ह्यात पुणे येथून आलेल्या व्यक्तिचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यामुळे आता ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 17 झाली आहे. सदर व्यक्ती कळंब येथील असून सध्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये भरती आहेत. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये 17 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण 22 जण आहे. यात सहा प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे. आज (दि.23) दोन जण आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती झाले आहे. आतापर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून एकूण 1894 नमुने तपासणीकरीता पाठविले. यापैकी 1887 रिपोर्ट प्राप्त तर सात रिपोर्ट अप्राप्त आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत 1775 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 113 वर गेली असून यापैकी 96 रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डमध्ये 17 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण भरती आहेत. संस्थात्मक विलगीकरण कक्षात 15 जण तर गृह विलगीकरणात 486 जण आहेत. 00000000

जिल्ह्यातील महिलांकरीता बांबूपासून रोजगार उपलब्ध करून देणार - पालकमंत्री संजय राठोड

Image
                                                  v अगरबत्ती आणि लाखेपासून बांगड्या बनविण्याचे नियोजन यवतमाळ, दि. 23 : पुजा करतांना देवासमोर लावण्यात येणारी अगरबत्ती निर्मिती हा घरबसल्या व्यवसाय महिलांसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. सोबतच लाखेपासून बांगड्या निर्मितीच्या व्यवसायाबाबतही विचार सुरू आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील 500 महिलांना रोजगार उपलब्ध होईल, असे प्रतिपादन राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. विश्रामगृह येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या अधिका-यांसोबत बांबूपासून रोजगारनिर्मितीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील, वनमंत्र्यांचे खाजगी सचिव रवींद्र पवार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक डॉ. रंजन वानखेडे आदी उपस्थित होते. बांबूपासून अनेक वस्तुंची निर्मिती करणे शक्य आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, घरोघरी बचत गटाला बांबूपासून रोजगार निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून