यवतमाळ शहरात 24 ठिकाणी भाजीविक्रीला सुरवात

 


v प्रतिबंधित भागात प्रशासनामार्फत भाजी, फळे, दूधाचा पुरवठा
v नागरिकांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे
यवतमाळ, दि.2 :  लॉकडाऊनच्या काळात यवतमाळ शहरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा होण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. किराणा, फळे, दूग्धजन्य पदार्थ आदी बाबी नागरिकांना सकाळी 8 ते 12 या वेळेत खरेदी करता येणार आहे. तसेच शहरातील भाजीमंडीतून सकाळी 3 ते 6 यावेळेत भाजीची उचल होत आहे. ही भाजी अधिकृत विक्रेत्यांद्वारे शहरात 24 ठिकाणी ठराविक वेळी नागरिकांना खरेदीकरीता उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शहरातील प्रतिबंधित भागातसुध्दा प्रशासनामार्फत भाजी, फळे, दूध, पाणी आदी जीवनावश्यक वस्तु नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे.
शहरातील हॉटस्पॉट असलेल्या व प्रतिबंधित भागात प्रशासनाने परवाना दिलेल्या अधिकृत विक्रेत्यांकडून भाजी विक्री होत होत आहे. या भागातील काही नागरिक भाजीचा नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या उद्देशाने परवान्याची मागणी करीत आहे. मात्र सर्व बाबींची पडताळणी करूनच त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. शहरात 24 विविध ठिकाणी भाजी विक्रेत्यांची जागा निश्चित करण्यात आली असून जिल्हा प्रशासन व नगर पालिका प्रशासन यावर देखरेख ठेवत आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात तसेच हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्रात नागरिकांपर्यंत भाजीपाला व फळे पोहचत आहे.
भाजीविक्रीसाठी शहरात निश्चित केलेली ठिकाणे :  1. मोहाफाटा चौक, 2. पिंपळगाव बायपास जवळील बालाजी स्पोर्ट क्लब मैदान, 3. नौशाद राणा ले-आऊट पिंपळगाव रोड, 4. भगतसिंग क्रीडामंडळ गेडामनगर, 5. वर्गीस ग्राऊंड शिरभाते ले-आऊट, 6. नगर परिषद शाळा क्रमांक 4 वंजारी ले-आऊट, 7. पोस्टल ग्राऊंड, 8. लोहारा कलमेश्वर मंदीर, 9. दत्तात्रय ग्राऊंड लोहारा, 10. हर्षवर्धन सोसायटी हनुमान मंदीरजवळ, 11. सिंघानिया ले-आऊट, 12. चिंतामणी मंदीर गोपीकृष्णा पार्क प्रजापती नगर, 13. भुरचंडी ले-आऊट, वसंत घुईखेडकर यांच्या घरासमोर, 14. वीर सावरकर मैदान बालाजी सोसायटी, 15. गिलानी गनर खुले मैदान उमरसरा, 16. न.प.संताजी प्लॉट, 17. यवतमाळ पंचायत समिती समोरील ग्राऊंड, 18. अवधूत व्यायाम शाळा, 19. रुपनार मंगल कार्यालयाजवळील मैदान, 20. वाघापूर पाण्याच्या टाकीजवळील बौध्दविहार, 21. राणाप्रताप नगर मधील सिध्दीविनायक ऑटो पॉईंट, 22. श्रध्दानगर खुले मैदान, 23. सुयोग मंगल कार्यालयाजवळील खुले मैदान आणि 24. अमृत गार्डन मागील मैदान येथे नागरिकांकरीता सकाळी 8 ते 12 या वेळेत भाजी उपलब्ध आहे.
शहरात मुबलक प्रमाणात भाजी व फळे उपलब्ध असून नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये. प्रशासनाच्या आदेशाचे पालन करूनच ठराविक वेळेत भाजीची खरेदी करावी. कोरोनाला हद्दपार करायचे असेल तर नागरिकांनी मास्कचा वापर करावा तसेच दोन व्यक्तिंमधील किमान अंतर दोन मीटर ठेवावे. प्रशासनाच्या सुचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी