‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : आणखी एकाला सुट्टी


v आयसोलेशन वॉर्डात आता 14 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण

यवतमाळ, दि. 27 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या व सुरवातीला पॉझेटिव्ह रिपोर्ट आलेला रुग्ण उपचारानंतर बरा झाल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सदर रुग्णाला पुढील 14 दिवास गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डातील ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या एक ने कमी होऊन 14 झाली आहे.

गत चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण वाढीला ब्रेक लागला आहे. एवढेच नाही तर उपचाराअंती बरे होण्याचे प्रमाण यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आहे. कोव्हिडमुळे आतापर्यंत एकही मृत्यु झाला नाही. ही प्रशासनासाठी अभिनंदनीय बाब आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 113 वर गेली असून यापैकी तब्बल 99 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 14 ॲक्टीव्ह रुग्णांसह एकूण 15 जण भरती आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी 61 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 2006 नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असून यापैकी 1945 नमुन्याचे रिपोर्ट प्राप्त तर 61 नमुन्यांचे रिपोर्ट अप्राप्त आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 1832 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 14 जण तर गृह विलगीकरणात एकूण 504 जण आहेत.  

००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी