‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : आयसोलेशन वॉर्डातून एकाला सुट्टी

v सहा पॉझेटिव्ह रुग्णांसह 19 जण भरती

यवतमाळ, दि.19 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या व सुरवातीला पॉझेटिव्ह रिपोर्ट आलेल्या एका व्यक्तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढील 14 दिवस त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात सहा ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण 19 जण भरती आहेत. यात 13 प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.

मंगळवारी आयसोलेशन वॉर्डात चार जण भरती करण्यात आले. जिल्ह्यात सुरवातीपासून पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 100 वर गेला असून आतापर्यंत 1693 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 14 जण तर गृह विलगीकरणात एकूण 760 जण आहेत.

०००००००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी