कोरोना : गावस्तरीय समित्यांनी गांभिर्याने कामे करावीत


v पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले निर्देश

यवतमाळ, दि. 26 : जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या असून आता गावस्तरीय समित्यांचे गठन केले आहे. या समितीमध्ये पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आदींचा समावेश आहे. या समितीने अत्यंत काळजीपूर्वक कामे करून दैनंदिन अहवाल प्रशासनाला सादर करावा, अशा सुचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत.

कोरोनाचा प्रादर्भाव आता शहरातपुरता मर्यादीत न राहता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पसरला आहे. शासन आणि प्रशासन नागरिकांची काळजी घेत असून संकटाच्या या काळात नागरिकांनी शासनाच्या सर्व आदेशांचे पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात आता पुणे, मुंबई आदी ठिकाणांवरून नागरिक येत आहे. त्यांच्यामुळे प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. जिल्हामध्ये  मुंबईवरून आलेल्या लोकांमुळे संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्या त्या भागातील विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, बीट जमादार, मंडळ अधिकारी आदी सर्वांनी गावागावात भेट देऊन कोण बाहेरून आले, त्यांची आरोग्य तपासणी आदी बाबी कराव्यात. बाहेरून आलेल्या लोकांना शाळेमध्ये विलगीकरण करण्यात येत आहे. तेथे हे नागरिक थांबण्यास नकार देतात. त्यामुळे पोलिस पाटील किंवा बीट जमादार गावात गेले तर त्यांच्यावर वचक राहील. त्यासाठी समितीच्या सदस्याने संबंधित गावात भेट केल्याबाबतचे एक रजिस्टर ठेवणे गरजेचे आहे. गावात समितीच्या कोणत्या सदस्याने भेट दिली, याची दैनंदिन माहिती रजिस्टरमध्ये भरून प्रशासनाला सादर करावी.

बाहेरगावरून मोठ्या संख्येने मजूर जिल्ह्यात येत आहे. या मजुरांना काम देण्यासाठी रोजगार हमीच्या कामाबाबत सर्व यंत्रणांनी तयारी करून ठेवावी. सिंचन तलाव, पांदण रस्ते, सीसीटीची कामे तसेच रोजगार हमीची इतर कामे मजुरांना देणे आवश्यक आहे. त्यापध्दतीने सर्व विभागांनी नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी