यवतमाळकरांना दिलासा : पॉझेटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ नाही



v आयसोलेशन वॉर्डात 80 पॉझेटिव्हसह 160 भरती
यवतमाळ, दि.2 :  चालू आठवड्याच्या सुरवातीला कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनासह नागरिकही चिंतेत होते. सुरवातीच्या तीन दिवसात तर कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांच्या संख्येत 50 च्या वर वाढ झाली. त्यानंतर शुक्रवारपर्यंत कधी एक तर कधी दोन अशी वाढ सुरू होती. मात्र आज (दि. 2) प्रथमच पॉझेटिव्ह रुग्णांच्या संख्येत कोणतीही वाढ नसून यवतमाळकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे. सद्यस्थितीत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 80 ॲक्टीव्ह पॉझेटिव्हसह एकूण 160 जण भरती आहेत.
या आठवड्याचे सुरवातीचे दिवस सोडले तर शेवटच्या दोन दिवसात जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्ण वाढीचा वेग मंदावला, ही नक्कीच दिलासा देणारी बाब आहे. मात्र असे असले तरी जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 24 तासात पाच जण नव्याने भरती झाल्याने भरती असलेल्या रुग्णांची संख्या 160 वर पोहचली आहे. यात 80 प्रिझमटिव्ह केसेस आहेत. तपासणीकरीता शनिवारी 11 नमुने वैद्यकीय महाविद्यालयाने पाठविले. आतापर्यंत तपासणीकरीता पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 1173 आहे. यापैकी 1155 नमुन्यांचे अहवाल प्राप्त तर 18 नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. प्राप्त रिपोर्टपैकी 1064 रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. संस्थात्मक विलगीकरणात असलेल्यांची संख्या 108 तर गृह विलगीकरणात एकूण 1091 जण आहेत.
जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीकरीता प्रशासनाने सकाळी 8 ते 12 ही वेळ निश्चित केली आहे. मात्र असे असले तरी नागरिकांनी गर्दी करू नये. तसेच अत्यावश्यक कारणासाठी मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नये. एकमेकांपासून किमान दोन मीटरचे सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. शासन व प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे वेळोवेळी पालन केले तरच आपण कोरोनाला हद्दपार करू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी