आयसोलेशन वॉर्डातील 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह


v ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 80
यवतमाळ, दि.3 :  जिल्ह्यात सलग दुस-या दिवशीही पॉझेटिव्ह रुग्णवाढीच्या संख्येला 'ब्रेक' लागला आहे. दोन दिवसांत पॉझेटिव्ह रुग्णांच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नाही. त्यातच आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने यवतमाळकरांना तसेच जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 80 ॲक्टीव्ह पॉझेटिव्हसह एकूण 154 जण भरती आहेत.
रविवारी सकाळी एकूण 15 जणांचे रिपोर्ट वैद्यकीय महाविद्यलायाला प्राप्त झाले. यापैकी 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर एकाचा रिपोर्ट 14 दिवसाच्या कालावधीनंतर पुन्हा पॉझेटिव्ह आला आहे. त्यामुळे पॉझेटिव्ह रुग्णांच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नसून सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 80 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह तर 74 प्रिझेमटिव्ह केसेस आहेत. आज (दि.3) 24 नमुने तपासणीकरीता वैद्यकीय महाविद्यालयाने पाठविले आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 1197 नमुने पाठविण्यात आले असून यापैकी 1170 प्राप्त तर 27 नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. प्राप्त नमुन्यांपैकी आतापर्यंत 1080 नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. संस्थात्मक विलगीकरणात असलेल्यांची संख्या 109 तर गृह विलगीकरणात एकूण 1098 जण आहेत.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी लॉकडाऊनच्या व संचारबंदीच्या काळात अनावश्यकपणे बाहेर पडू नये. जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीकरीता बाहेर पडलो तर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये. तसेच मास्कचा उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी