45 पॉझेटिव्हसह आयसोलेशन वॉर्डात 53 जण भरती



यवतमाळ, दि.13 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 45 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण 53 जण भरती आहेत. यात आठ प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णवाढीचा वेग मंदावला असून पॉझेटिव्ह रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. गत 24 तासात एक नवीन रुग्ण आयसोलेशन वॉर्डात भरती झाला आहे. बुधवारी वैद्यकीय महाविद्यालयाने तपासणीकरीता 45 नमुने पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 1626 नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे. यापैकी 1576 प्राप्त तर 50 अप्राप्त आहेत. तसेच गत 24 तासात महाविद्यालयाला नऊ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एकाचा रिपोर्ट पुन्हा पॉझेटिव्ह आला असून आठ रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1478 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 20 जण तर गृह विलगीकरणात एकूण 1326 जण आहेत.
जिल्ह्यात आता केवळ 4 प्रतिबंधित क्षेत्र : यवतमाळ शहरातील इंदिरा नगर आणि पाटीपुरा, नेर शहरातील वलीसाहब नगर आणि उमरखेड़ तालुक्यातील धानोरा या 4 प्रतिबंधित क्षेत्रातूनच पॉझेटिव्ह केसेस येत असल्यामुळे जिल्ह्यात आता हे चार क्षेत्रच प्रतिबंधित म्हणून राहणार आहे. त्यामुळे जाफर नगर, मेमन सोसायटी व जिल्ह्यातील इतर क्षेत्रात प्रशासनाने लावलेले प्रतिबंध उद्या दि. 13 मे 2020 रोजी सकाळी 6 वाजतापासून काढून घेण्यात आल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
००००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी