Posts

Showing posts from January, 2017
विकास अहवालातून विकासाची दिशा ठरणार -जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह *जिल्हा विकास अहवालाचे सादरीकरण *जिल्ह्यातील समस्यांवर लक्ष केंद्रीत होणार यवतमाळ, दि. 31 : यशदाने जिल्ह्यातील विविध भागातून महत्त्वाच्या समस्या आणि त्यावरील उपायोजनांचे सादरीकरण केले आहे. यामुळे जिल्ह्याचे चित्र स्पष्ट होण्यास मदत झाली आहे. यातून सुचविलेल्या उपाययोजनांवर जिल्ह्याच्या विकासाची दिशा ठरणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. आज जिल्हाधिकारी कार्यालयात यशदातर्फे जिल्हा विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यशदातर्फे जिल्ह्यातील क्षेत्रिय भेटी आणि विविध पाहणी अहवालाच्या सहाय्याने जिल्हा विकास अहवाल तयार केला आहे. यात प्रामुख्याने शिक्षण, शेती, स्वच्छता, माता-बालमृत्यू, जन्मदर आणि जिल्ह्यातील पायाभूत सुविधा आदींबाबत माहिती सादर केली. मुलींचे प्रमाण दोन दशकामध्ये कमालीचे कमी होत असून प्रामुख्याने केळापूर आणि घाटंजी तालुक्यात हे प्रमाण अधिक आढळले. बालमृत्यूदर, अर्भक मृत्यूदर, जन्मदर हा जिल्ह्याचा समाधानकारक आहे. जिल्ह्यातील महिलांमध्ये ॲमिबिया आण
नव्या आरक्षणानुसार सहा जिल्हा परिषद गटाची निवडणूक यवतमाळ, दि. 31 : मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात विडूळ जिल्हा परिषद गटासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेनुसार आता नव्याने आरक्षणानुसार सहा जिल्हा परिषद गटाची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसोबत होणार आहे. कुंभा-पार्डी, घोन्सा-कायर, वटफळी, लाडखेड, देऊरवाडी बु.-सुकळी, विडुळ या सहा जिल्हा परिषद गटासाठी 25 नोव्हेंबर 2016 रोजी आरक्षण जाहिर करण्यात आले होते. यातील विडुळ मतदारसंघाच्या सर्वसाधरण महिला आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या सहा मतदारसंघाबाबत नव्याने आरक्षण काढण्यात आले होते. यात कुंभा-पार्डीसाठी सर्वसाधारण-महिला, घोन्सा-कायरसाठी सर्वसाधारण-महिला, वटफळीसाठी सर्वसाधारण, लाडखेडसाठी सर्वसाधारण, देऊरवाडी बु.-सुकळीसाठी सर्वसाधारण-महिला, विडुळसाठी सर्वसाधारण आरक्षण जाहिर करण्‍यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नव्याने आरक्षण काढण्यात आलेल्यानुसार मतदान घेण्यात येणार आहे. ही निवडणूक आता राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान कार्यक्रमानुसार घे
Image
आजपासून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन, ग्रंथोत्सव यवतमाळ, दि. 30 : जिल्हातरीय विज्ञान प्रदर्शन आणि ग्रंथोत्सव मंगळवार, दि. 31 जानेवारी आणि बुधवार, दि. 1 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. येथील अभ्यंकर कन्या शाळेत होणाऱ्या प्रदर्शनामध्ये तालुक्यातून निवड झालेल्या विद्यार्थी, शिक्षण प्रयोगशाळा परिचर यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी केले आहे. 00000 राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली        यवतमाळ दि. 30 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हुतात्मा दिन पाळण्यात येतो. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात राष्ट्रपित्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते उपस्थित होते. कार्यक्रमात दोन मिनीटांचे मौन पाळण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महिलांनी भजन सादर केले. 00000
यवतमाळ तालुक्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज *1 लाख मतदार बजावणार हक्क *4 आचार संहिता पथक स्थापन *120 मतदान केंद्रांची निश्चिती यवतमाळ, दि. 27 : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने यवतमाळ तालुक्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत एक लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 120 मतदान केंद्रे राहणार आहे. ही निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी 11 जानेवारीपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आजपासून दि. 27 जानेवारीपासून 1 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहे. नामनिर्देशन आणि शपथपत्राच्या नमुन्यासाठी panchayatelection.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारी अर्ज ऑनलाईन करावयाचा असून त्याची प्रिंट विहित मुदतीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावयाची आहे. नामनिर्देशन पत्रे स्विकारण्याची अंतिम मुदत 1 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी आणि वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारां
Image
प्रजासत्ताक दिनाच्या पालकमंत्र्यांकडून शुभेच्छा
Image
भारतीय राज्यघटनेमुळेच देश एकसंघ   -पालकमंत्री मदन येरावार *पालकमंत्र्यांच्याहस्ते मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम *प्रजासत्ताक दिनाच्या पालकमंत्र्यांकडून शुभेच्छा *देशाची राज्यघटना जगात सर्वात प्रगल्भ यवतमाळ दि. 26 : विविध जाती, धर्म, पंथांचा हा देश असूनही केवळ भारतीय राज्यघटनेमुळे संपूर्ण देश एकसंघ राहिला आहे. स्वातंत्र्यानंतर देशात स्थापन झालेल्या लोकशाहीने देशबांधवांत विश्वास आणि आत्मियता निर्माण केली आहे. यामुळेच देशाचे अखंडत्व प्रत्येक भारतीयासाठी भुषणावह आहे. आज जगात सर्वात मोठी आणि निकोप लोकशाही म्हणून भारताचा गौरव होतो, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. येथील पोस्टल मैदानावर भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. यानिमित्ताने पालकमंत्री श्री. येरावार यांनी जनतेस संदेश दिला. यावेळी आमदार डॉ. अशोक उईके, नगराध्यक्ष कांचन चौधरी, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी र
Image
मतदानात प्रत्येक समस्येचे उत्तर -जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह *राष्ट्रीय मतदान दिवसानिमित्त विविध उपक्रम *स्पर्धेतील विजेत्यांचा पुरस्कार देऊन गौरव यवतमाळ दि. 25 : भारतीय राज्य घटनेने प्रत्येक नागरीकास विविध अधिकार दिले आहे. हे सर्व अधिकार समानतेने दिले आहे. यात सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक समस्येचे उत्तर हे मतदानात आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात आयोजित राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा नियोजन अधिकारी डी. टी. राठोड आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, नुकत्याच तामीळनाडूमधील जलीकट्टू आंदोलनामुळे नागरीकांचा दबाव किती असू शकतो. जलीकट्टू हा मुलभूत प्रश्न नव्हता तरीही त्या राज्याला तात्काळ कायदा अंमलात आणावा लागला. मात्र मतदान हा घटनादत्
वैद्यकीय चाचणीत उत्तीर्णांसाठी मार्गदर्शन *सैन्य भरतीसाठी लेखी परीक्षेचे मार्गदर्शन *30 जानेवारी रोजी पुन्हा मार्गदर्शन यवतमाळ दि. 23 : यवतमाळ येथे झालेल्या सैन्य भरतीमध्ये वैद्यकीय चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लेखी परिक्षेचे मार्गदर्शन 21 जानेवारी रोजी करण्यात आले. या मार्गदर्शनात सहभागी होऊ शकले नाहीत, अशा उमेदवारांसाठी पुन्हा सोमवारी, 30 जानेवारी रोजी  मार्गदर्शन करण्यात येणार आहे. येथील जिल्हा क्रीडा संकुलात 6 आणि 7 जानेवारी रोजी सैन्य भरती झाली आहे. यात मैदानी आणि वैद्यकीय चाचण्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. या परीक्षेबाबत यवतमाळ जिल्ह्यातील उमेदवारांकरीता मार्गदर्शनासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, टांगा चौक, यवतमाळ येथे सोमवारी, दि. 30 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे. या भरतीमध्ये वैद्यकीय चाचणीत उत्तीर्ण झालेल्या आणि तात्पुरते अपात्र झालेल्या जिल्ह्यातील उमेदवारांनी या मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 7875087902 या क्रमांकावर संपर्क साधावा,
Image
उमेदवारांची माहिती मतदान केंद्रांबाहेर लावणार -राज्य निवडणूक आयुक्त जे. एस­. सहारिया *पात्र नोंदणीकृत पक्षांना समान चिन्ह मिळणार *उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करणे सक्तीचे यवतमाळ , दि. 22 : जिल्ह्यात येत्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. या निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर उमेदवारांनी शपथपत्रामध्ये दिलेल्या माहितीचा गोषवारा फ्लेक्सद्वारे प्रदर्शित करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जगेश्वर स्वरूप सहारिया यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात राज्य निवडणूक आयुक्त श्री. सहारिया यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यावेळी विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता, निवडणूक सचिव शेखर चन्ने, अतिरिक्त पोलिस महासंचालक बिपीन बिहारी, विशेष पोलिस महानिरीक्षक विजयसिंह जाधव, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते. सुरवातीला निवडणूक आयुक्त श्री. सहारिया यांनी जिल्ह्यातील निवडणुकीसंदर्भात माहित