नव्या आरक्षणानुसार सहा जिल्हा परिषद गटाची निवडणूक
यवतमाळ, दि. 31 : मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात विडूळ जिल्हा परिषद गटासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेनुसार आता नव्याने आरक्षणानुसार सहा जिल्हा परिषद गटाची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसोबत होणार आहे.
कुंभा-पार्डी, घोन्सा-कायर, वटफळी, लाडखेड, देऊरवाडी बु.-सुकळी, विडुळ या सहा जिल्हा परिषद गटासाठी 25 नोव्हेंबर 2016 रोजी आरक्षण जाहिर करण्यात आले होते. यातील विडुळ मतदारसंघाच्या सर्वसाधरण महिला आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या सहा मतदारसंघाबाबत नव्याने आरक्षण काढण्यात आले होते. यात कुंभा-पार्डीसाठी सर्वसाधारण-महिला, घोन्सा-कायरसाठी सर्वसाधारण-महिला, वटफळीसाठी सर्वसाधारण, लाडखेडसाठी सर्वसाधारण, देऊरवाडी बु.-सुकळीसाठी सर्वसाधारण-महिला, विडुळसाठी सर्वसाधारण आरक्षण जाहिर करण्‍यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नव्याने आरक्षण काढण्यात आलेल्यानुसार मतदान घेण्यात येणार आहे. ही निवडणूक आता राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान कार्यक्रमानुसार घेण्यात येणार आहे.
यात 1 फेब्रुवारी रोजी निवडणुकीची सुचना आणि कार्यक्रम जाहिर करण्यात येणार आहे. 1 ते 6 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरावा लागणार आहे. हे नामनिर्देशन पत्र 6 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील. 7 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. छाननीनंतर लगेच वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 10 फेब्रुवारी पर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल करता येणार आहे. 13 फेब्रुवारीपर्यंत अपिलावर सुनावणी करण्यात येणार आहे. 13 फेब्रुवारी रोजी अंतिम वैध उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. 13 फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशन मागे घेता येऊ शकतील. तसेच याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. 15 फेब्रुवारी रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 21 फेब्रुवारी रोजी मतदान तर 23 फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात ेणार आहे. 28 फेब्रुवारी रोजी निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी