Posts

Showing posts from May, 2023

दोन कर्तबगार महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामपंचायतस्तरीय पुरस्काराने होणार स्न्मान

यवतमाळ,दि.३०मे.(जीमाका) यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती देश साजरा करीत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन म्हणजे धर्मनिष्ठा,कर्तव्यपरायणता आणि भक्ती व शक्तीचे अद्वितीय उदाहरण आहे.यांच्या जयंतीचे औचित्य साधून या वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर समाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामपंचायतस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतलेला आहे. या पुरस्कारासाठी राज्यातील एकूण २७,८९७ ग्रामपंचायतींमध्ये १,३९,४८५ महिलांनी पुरस्कार मिळणेसाठी अर्ज सादर केले होते. शासन निर्णयानुसार गठीत समितीच्या माध्यमातून छाननी करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सुमारे ५५,७९४ महिलांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ आणि रोख रक्कम रू. ५००/- देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायतस्तरावर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी ३१ मे रोजी त्याचे जन्मगांव श्रीक्षेत्र चौंडी,ता.जामखेड,जि. अहमदनगर येथे राज्याचे मुख्यमंत्री आण

युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

यवतमाळ,दि.३० मे.(जिमाका):-आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध विषयांत युवकांनी पार पाडलेल्या भूमिका,दिलेले योगदान यामुळे युवांची एक अद्वितीय ओळख समाजात झालेली आहे. युवकांचा विकास प्रक्रीयेत सहभाग आवश्यक झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण २०१२ नुसार जिल्हास्तरावर ‘एक युवा व एक संस्था’ यांना पुरस्कार देण्यासाठी प्रस्ताव ईच्छुक व्यक्ती व संस्थांकडुन प्रस्ताव मागविण्यात येत आहे. पुरस्काराचे स्वरुप: जिल्हा युवा पुरस्कार जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती तसेच एका नोंदणीकृत संस्थेस देण्यात येतो. सदरचा पुरस्कार गौरव पत्र,सन्मान चिन्ह,रोख रक्कम १० हजार प्रति युवक व युवतीसाठी, तसेच संस्थेसाठी गौरव पत्र,सन्मान चिन्ह,रोख रक्कम ५० हजार रुपये अशा स्वरुपाचा असेल. पात्रतेचे निकष: अर्जदार युवक युवतींचे वय पुरस्कार वर्षातील १ एप्रिल रोजी १३ वर्ष पूर्ण व ३१ मार्च रोजी ३५ वर्ष पर्यंत असावे. जिल्हास्तरावर पुरस्कारासाठी जिल्ह्यात सलग पाच वर्ष वास्तव्य असल्याचा दाखला जोडणे गरजेचे. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागून दिला जाणार नाही, पुरस्कार मरणोत्तर जाहिर करण्यात येणार नाही, केलेल्या

सधन कुक्कुट विकास गटासाठी अर्ज आमंत्रित

यवतमाळ,दि.३०मे.(जिमाका):-जिल्हयात “सार्वजनिक- खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे"ही योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी परिपुर्ण अर्ज ८ जुन २०२३ पर्यंत संबंधीत पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी यांचेकडे सादर करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.राजेंद्र अलोने यांनी केले आहे. सदर योजने अंतर्गत यवतमाळ तालुक्यामध्ये सधन कुक्कुट गट अस्तित्वात असल्यामुळे यवतमाळ तालुका वगळता इतर १२ तालुक्यात ही योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत झरी व पुसद तालुक्यातील लाभार्थी निवडी करीता अर्ज प्राप्त न झाल्यामुळे लाभार्थी निवड झाली नाही व घाटंजी तालुक्यात मंजुर लाभार्थ्यानी योजनेचा लाभ घेतला नाही. सदर तालुक्याअंतर्गत लाभार्थी निवडी करीता, पशुसंवर्धन आयुक्त पुणे यांचे निर्देशनावरून पुसद, झरी व घाटंजी तालुक्यात प्रत्येकी एक लाभार्थी निवडीकरीता इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज व सविस्तर माहीतीसाठी संबंधीत पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.

गळती उद्भवल्यामुळे शहरात पाच दिवस पाणी पुरवठा बंद

यवतमाळ,दि.२९ मे.(जिमाका):-दत्त चौक परिसरात दोन दिवसापूर्वी वाघापूर ग्राम टाकीला जोडणाऱ्या सातशे मिलिमीटर व्यासाची पाईपलाईन फुटल्यामुळे तिच्या दुरुस्तीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने प्रारंभ केला असून ती दुरूस्त होईपर्यंत शहरातील काही भागातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वैभवनगर,वाघापूर टेकडी,मेडीकल टाकी,बालाजी मंगलम टाकी,विठ्ठलवाडी टाकी,पॉलीटेक्नीक व चांदोरे नगर टाकी या उंच पाण्याच्या टाकीवरून होणारा पाणी पुरवठा गळतीचे काम दुरस्त होईपर्यंत शहरातील या भागाचा पाणीपुरवठा अंदाजे चार ते पाच दिवस बंद राहील, असे उपविभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण निखिल कवठळकर यांनी कळविले आहे.

५ ते १७ जुन विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा तांडे, कोलाम पोड, बंजारा वस्त्या, शहरी भागातिल झोपडपट्टी भागात लक्ष केंद्रित करा -जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ

यवतमाळ २९ मे जिमाका:- भारतामध्ये शुन्य ते ५ वर्ष या वयोगटात होणाऱ्या एकूण बालमृत्यूमध्ये अतिसार व निमोनियामुळे होणारे कुपोषण कारणीभूत आहे. आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात अतिसारामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण शून्य टक्केवर आणण्यासाठी धडक अतिसार नियंत्रण पंधरवडा ५ जुन ते १७ जुन या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेत आदिवासी भागातील तांडे, कोलाम पोड, बंजारा वस्त्या तसेच शहरी भागातिल झोपडपट्ट्या आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागापर्यंत ही मोहीम पोहोचवण्याचे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले. अतिसार पंधरवडा यशस्वीरीत्या राबविण्यासाठी आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. चव्हाण, जिल्हा शल्चिकित्सक डॉ आर.डी राठोड,डॉ ठोसर, डॉ मनोज तागडपल्लिवार, डॉ प्रिती दुधे, डॉ स्मिता पेटकर, नितीन ठाकूर, व सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. लसीकरण व आपला दवाखाना याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी ओ. आर. एस. चे द्रावण कसे बनवावे याची माहिती आणि प्रात्यक्षिक प्र

तालुकास्तरावर स्त्रीशक्ती समाधान शिबीराचे ३० मे पर्यंत आयोजन

यवतमाळ, दि. २५ मे (जिमाका):- समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व त्यांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपयोजना म्हणून तालुकास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबीर आयोजित करण्यात येत आहे. सदर शिबीर तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली होणार असून याशिबिरासाठी सर्व शासकीय यंत्रणांचे प्रमुखांची उपस्थिती राहणार आहे. त्याअनुषंगाने,आर्णी, दिग्रस, कळंब ,वणी व झरी जामणी येथे ३० मे रोजी, बाभूळगाव, घाटंजी, राळेगाव व नेर येथे २९ मे, मारेगाव , महागाव, उमरखेड येथे २६ मे याप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबीर होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत थोरात यांनी दिली. या शिबिरास संबंधित तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती राहणार असून पिडीत महिलांच्या समस्यांचे निराकरण जागेवरच करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे. समस्याग्रस्त पीडित मह

शालेय विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा -जिल्हा ग्रंथालय अधिकारी

यवतमाळ,दि.२५ मे.(जिमाका):-लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने सर्वाकरिता खुले ग्रंथ प्रदर्शन जिल्हा शासकीय ग्रंथालय,यवतमाळ येथे २६ मे पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. उन्हाळी सुट्टीच्या अनुषंगाने लहान मुलांकरिता विविध बोधपर कथा,प्रवास वर्णन,विविध गोष्टीचे व इतर पुस्तके वाचनासाठी येथे उपलब्ध असणार आहे.या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन वसंतराव नाईक वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी संतोष झिंजे यांच्या हस्ते करण्यात आले. या उदघाटन प्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आ.अ.ढोक, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष, मनोज रणखाम, कार्यवाह प्रशांत पंचभाई, संतोष कंडारकर,अजय शिरसाट,अनिल बागवाले,अरविंद बोरकर तसेच ग्रंथालयाचे कार्यकते व पदाधिकारी उपस्थित होते. जास्तीत जास्त बालकांनी व पालकांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आ.अ.ढोक यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी तक्रारीसाठी ९४०३२२९९९१ टोल फ्री क्रमांकाचा उपयोग करावा -जिल्हा कृषी अधिकारी

यवतमाळ,दि. २५ मे (जिमाका):- खरीप हंगाम २०२३- २४ लवकरच सुरु होणार असून शेतकरी मोठयाप्रमाणात बियाणे, रासायनीक खते व किटकनाशकांची खरेदी करतात. विविध कृषिनिविष्ठा केंद्रामधुन शेतकऱ्यांना निकृष्ठ दर्जाचे बियाणे, रासायनीक खते व किटकनाशके मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी बियाण्यांची उगवण,पिकाची वाढ, जणुकीय अशुध्दता, रासायनीक खते किंवा किटकनाशके यांचे मुळे पिकांचे नुकसान अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्या करीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय यवतमाळ येथे तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. सदर शेतकरी तक्रार निवारण कक्षाचा संपर्क क्रमांक ९४०३२२९९९१ असा आहे. तेव्हा शेतकऱ्यांना बियाणे, रासायनीक खते व किटकनाशके संदर्भामध्ये तक्रारी असल्यास शेतक-यांनी टोल फ्री क्रमांक ९४०३२२९९९१ वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यवतमाळ नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.

स्वाधार योजना' जनजागृती शिबीराचे २९ ला आयोजन

दि. २५ मे (जिमाका):- शासनाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विदयार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागु केली आहे. याची जनजागृती करण्यासाठी शिबीराचे आयोजन २९ मे रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, यवतमाळ येथे करण्यात आले आहे. मागासवर्गीय शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी पात्र विद्यार्थी यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास भत्ता, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर सुविधा विद्यार्थ्यांनी स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी राज्य शासनाने स्वाधार योजना सुरु केली आहे. या योजनेची माहिती मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात समाज कल्याण प्रादेशिक आयुक्त सुनिल वारे मार्गदर्शन करणार आहेत. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील इच्छुक विदयार्थ्यांनी शिबीरात उत्स्फुर्तपणे सहभाग घेवून लाभ देण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यवतमाळ यांनी केले आहे.

प्रलंबित कृषी पंप वीज जोडण्या ३० जुनपर्यंत पूर्ण करा -जिल्हाधिकारी

यवतमाळ दि २५ मे जिमाका:- कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी पैशांचा भरणा करूनही मार्च २०२२ पर्यंत प्रलंबित असलेल्या सर्व जोडण्या ३० जून २०२३ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. महावितरणच्या विविध विषयांचा आढावा आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महसुल भवन येथे घेतला. यावेळी माहावितरणचे अधिक्षक अभियंता प्रकाश राऊत, यवतमाळ विभागाचे कार्यकारी अभियंता संजय खंगार, पुसद चे कार्यकारी अभियंता संजय आडे, पांढरकवडा नरेंद्र कटारे, दारव्ह्याचे योगेश तायडे उपस्थित होते. कृषी पंपाच्या विज जोडणीसाठी जिल्ह्यात एकूण १० हजार ५६५ प्रस्ताव मार्च २०२२ पर्यंत प्रलंबित होते. यात दारव्हा विभागात २८६६ प्रलंबित अर्जापैकी ९१६ अर्ज मंजुर केले असुन ३१७ अर्ज रद्द केले तर १६३३ अर्ज प्रलंबित आहे. तसेच पांढरकवडा विभागात १९५४ प्रलंबित अर्जांपैकी १६५ अर्ज रद्द केले होते तर ९१८ लोकांना वीज जोडणी दिली आहे ८७१ अर्ज प्रलंबित आहेत व सर्व विभागात ३५९३ प्रलंबित अर्जांपैकी ३४४ अर्ज रद्द करण्यात आले तर एकूण ११९१ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली असुन २०५८ अर्ज प्रलंबित आहेत. यवतमाळ तालुक्यात यवतमा

दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, युवकांना स्वयंरोजगारासाठी सहाय्य

यवतमाळ, दि २५:- दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच त्यांच्या व्यंगत्वावर मात करत त्यांचे जीवनमान सुकर करण्यासाठी शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसह युवकांना स्वयंरोजगार करून स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी अर्थसहाय्याच्या योजनांचा समावेश आहे. दिव्यांगांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांमध्ये शालांतपूर्व शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देणे योजनेचा समावेश आहे. योजनेंतर्गत अंध, अंशत: अंध, अस्थिविकलांग, कुष्ठरुग्णमुक्त, कर्णबधिर, इत्यादीच्या इयत्ता १ ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 100 रुपये, इयत्ता 5 ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना दरमहा 150, इयत्ता 8 वी ते 10 च्या विद्यार्थ्यांना दर दरमहा 200 रुपये तर दिव्यांग कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थ्याना दरमहा 300 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थी एकाच इयत्तेत दोन वेळा नापास झालेला नसावा. तसेच मतिमंद व मानसिक आजाराच्या विशेष शाळांतील 18 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्याना दरमहा 150 रु शिष्यवृत्ती देण्यात येते. मॅट्रीकोत्तर शि

नगरपरिषद, नगरपंचायतमधील अनुकंपा उमेदवारांची प्रतीक्षासूची जाहीर हरकती घेण्यास २६ मे पर्यंत मुदत

यवतमाळ, दि. २३ मे (जिमाका):- यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद , नगरपंचायत मधील गट क व गट-ड संवर्गातील अनुकंपा उमेदवारांची १ जानेवारी २०२३ या दिनांकावर आधारित सन २०२२ या वर्षातील पात्र उमेदवारांची सुधारित सामाईक प्रारूप प्रतीक्षासूची जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयातील सूचना फलकावर, yavatmal.nic.in या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद /नगरपंचायत कार्यालयाचे सूचना फलकावर आज २३ मे रोजी प्रसिध्दी करण्यात आलेली आहे. सदर गट-क व गट-ड संवर्गातील अनुकंपा उमेदवारांच्या सुधारित सामाईक प्रारूप प्रतीक्षा सूचीवर ज्या अनुकंपा धारकांना काही हरकती व सूचना दाखल करावयाच्या असतील, त्यांनी संबंधित नगरपरिषद /नगरपंचायत यांच्या मुख्याधिकारी यांचेकडेच संबंधित नगरपरिषद / नगरपंचायत कार्यालय येथे २४ मे (बुधवार) ते दिनांक २६ मे २०२३ (शुक्रवार) या कालावधित कार्यालयीन वेळेत पुराव्यासहीत लेखी स्वरुपात सादर कराव्यात. त्यानंतर येणाऱ्या हरकती व सूचना विचारात घेण्यात येणार नाही. कोणत्याही व्यक्तीचे लेखी हरकती व सूचना संबंधित नगरपरिषद /नगरपंचायत यांच्या मुख्याधि

खरीप हंगाम विशेष पंधरवाडा राबविणार -जिल्हा कृषी अधिकारी

यवतमाळ,दि.२३ मे.(जिमाका):- जिल्ह्यात प्रमुख पिकाचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टिने कृषी संलग्न क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने जिल्ह्यात खरीप हंगाम विशेष पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. मोहीम कालावधी २० मे ते १० जुन पर्यंत आहे. यात सोयाबीनचे घरगुती बियाणे राखून ठेवणे, उत्पादन व वापर, १० जूनपर्यंत बीज प्रक्रिया मोहिम, ३१ मे पर्यंत तर रुंद सरी वरंबा पध्दतीचा वापर, २० मे ते १० जून तसेच दहा वर्षाच्या आतील सुधारीत वाणांचा वापर, १० जून पर्यंत कापूस पिकांबाबत एक गाव,एक वान अभियान, गुलाबी बोंड अळी नियंत्रण कार्यक्रम ऑगस्ट ते सप्टेंबर २०२३ तसेच बोंडसड नियंत्रण सप्टेंबर ते ऑेक्टोबर २०२३,सुक्ष्म सिंचनाव्दारे कापूस पिकांचे लागवडी व्दारे उत्पादन वाढ तंत्रज्ञान २० मे ते १० जून तर १ जून नंतर पेरणी ३१ जुनपर्यंत व जिनिंग मिलवर ल्युर व ट्रॅप लावणे २० मे ते डिसेंबर २०२३, तसेच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कालावधी जून,जुलै,ऑगस्ट २०२३ असा असेल. तूर या पिकांसाठी बीज प्रक्रिया मोहीम २ मे ते ३१ मे तर तूर पिक शें

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे ३१ ला होणार वितरण

यवतमाळ, दि. २3 मे (जिमाका):- महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत/ गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती निमित्य ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार विजेत्याना सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सदर पुरस्काराकरिता पात्रता निकष असे आहे. महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट/ उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या महिला,सदर महिला ह्या त्याच ग्रामपंचायतीतील/ गट ग्रामपंचायतीतील रहिवासी असावी, त्यांचे कार्य हे त्याच ग्रामपंचायती /गटग्रामपंचायती मध्ये केलेले असावे. ह्या क्षेत्रात किमान 3 वर्ष कार्य केलेले असावे, महिलांच्या समस्या व प्रश्नांबाबत जाणीव व संवेदनशीलताअसावी, सामाजिक क्षेत्रात सक्रीय सहभाग असावा, महिला अत्याचारामध्ये समाविष्टनसावी, बालविवाह प्रतिबंध, हुंडा निर्मुलन, लिंग चिकित्सा प्रतिबंध, घरगुती हिंसाप्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वयं

नुकसान भरपाईच्या रकमेतुन कर्ज वसुली करु नये -जिल्हाधिकारी

यवतमाळ, दि. २३ मे (जिमाका):- गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केलेल्या रकमेतून काही बँकाकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम वसूल केल्याचे निदर्शनास आले आहे. गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी वाटप केलेल्या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करतांना मदतीच्या रकमेमधून कोणत्याही प्रकारची वसुली होणार नाही, याची संबंधित बँकांनी नोंद घेण्याच्या सुचना असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी एका पत्राद्वारे बॅंकांना दिल्यात.

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

यवतमाळ,दि.23 मे.(जिमाका):-शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यवतमाळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनेकरीता इच्छुकांकडुन प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहे. या कर्ज योजनेत महामंडळाचा ९५ टक्के सहभाग तर लाभार्थ्यांचा ५ टक्के सहभाग राहणार आहे. या योजनेसाठी विहीत नमुन्यातील अर्ज महामंडळाच्या कार्यालयात उपलब्ध असुन संपुर्ण कागदपत्रासह ३० मे २०२३ पर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या कर्ज योजनेतून महिला सशक्तीकरण (२ लक्ष रूपये) लक्षांक ११, बचत गट योजना (०५ लक्ष रूपये) लक्षांक १, कृषी आणी संलग्न व्यवसाय (२ लक्ष रूपये) लक्षांक १५, होटेल ढाबा व्यवसाय (५ लक्ष रूपये) लक्षांक ३, स्पेअर पार्ट/ऑ़टो वर्क शॉप (५ लक्ष रूपये) लक्षांक ३ , वाहन व्यवसाय (१० लक्ष रूपये) लक्षांक १, लघु उद्योग व्यवसाय (३ लक्ष रूपये) लक्षांक २ प्राप्त झाला आहे. सदर कर्ज योजनेसाठी व्यवसायाचे प्रस्ताव सादर करतांना जातीचा दाखला,शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.),उत्पनाचा दाखला, शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्र, आदिवासी विभागात नाव नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र,अनुभव प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल, रेशन

ग्रामिण भागातील महिलांना रोजगार देण्यासाठी कॉटन टू क्लॉथ प्रकल्प राबवावा -खा. भावना गवळी

Image
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा)बैठक यवतमाळ, दि २२ मे जिमाका:- ग्रामिण महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासोबतच उदरनिर्वाहासाठी कापसावर आधारित 'कॉटन टु क्लॉथ' हातमाग प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या अध्यक्षा खासदार भावना गवळी यांनी आज दिल्यात. जिल्हा परिषदेच्य्या सभागृहात आज जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक खासदार भावना गवळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या बैठकीला आमदार मदन येरावर, आमदार इंद्रनील नाईक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ सहाय्यक जिल्हाधिकारी मेघा कवळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी वैशाली रसाळ उपस्थित होत्या. आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन होते. त्यामुळे कापसावर आधारित लघुउद्योग गावातच उभे राहिल्यास ग्रामीण भागातील बेरोजगारांसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल. यासाठी महिलांना तशा पद्धतीचे प्रशिक्षण देणे

घाटंजी येथे २३ मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

यवतमाळ, दि १६ मे (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घाटंजी यांचे संयुक्त विद्यमाने २३ मे सकाळी १० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घाटंजी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रोजगार मेळाव्याकरीता एकूण ९०५ रिक्तपदे विविध नामांकित कंपन्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक,यवतमाळ, भुमी विकास इन्डस्ट्रीज, पुसद, आरोही इन्फो एफ आय मॅनेजमेंट लि. अकोला संभाजी नगर, वैभव एन्टर प्रायजेस, नागपूर, टॅलेनसेतू सर्व्हिसेस प्रा.लि. पुणे, नवभारत फर्टिलायझर, अमरावती, धुत ट्रान्समिशन, औरगाबाद, परमस्किल ट्रेनिंग इंडिया प्रा.लि. औरंगाबाद/ पूणे, नवकिसान बायोप्लँटेक लि. नागपूर, मेगाफिड बायोटेक, नागपूर यांच्याकडुन उपलब्ध झालेली आहे. सदर मेळाव्यामध्ये इयत्ता १०वी, १२ वी, आय.टि.आय पदविकाधारक, पदवीधर तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहुन या संधीचा लाभ घेता येणार आहे. सदर मेळाव्यास उद्योजकांकडून उमेदवारांशी प्रत्यक्ष थेट मुलाखतीव्दारे

ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मतदान व मतमोजणीला मद्य विक्री बंद

यवतमाळ,दि.१६ मे (जिमाका) : जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणूकीच्या अनुषंगाने मतदानाच्या अगोदरच्या दिवशी १७ मे, मतदानाच्या दिवशी १८ मे आणि मतमोजणी १९ मे ते अंतिम निर्णय घोषीत होईपर्यंत मद्य विक्रीच्या सर्व अनुज्ञप्त्या बंद राहतील असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. यवतमाळ जिल्हयातील ग्रामपंचायतीच्या निर्वाचन क्षेत्रात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व मंजूर व कार्यान्वीत असलेल्या नमुना सीएल-३, एफएल -२, सीएलएफएलटिओडी-३, एफएल-३, व एफएलबीआर- २ अनुज्ञप्त्या नमूद कालावधीकरीता बंद राहतील असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

बालसंगोपन योजनेचा ९६८ बालकांना १ कोटी २५ लक्ष रुपयांचा लाभ वितरित नविन १०५० प्रस्तावाना मंजुरी प्रलंबित अर्ज निकाली काढण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना

यवतमाळ, दि १६ मे:- अनाथ, निराश्रीत, बेघर व अन्य आपत्तीत सापडलेल्या बालकांचे कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे या हेतूने शासन बालसंगोपन योजना राबविते. जिल्ह्यात मार्च २०२३पर्यंत ९६८ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आलेला असून १ कोटी २५ लक्ष २४ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये बाल संगोपन योजनेसाठी २९४६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये शहरी भागातील ६६५ तर ग्रामीण भागातील २२८१ प्रस्तावाचा समावेश आहे. यापैकी १२३३ प्रस्तावांची गृह चौकशी पूर्ण झाली असून १०५० प्रकरणात सी डब्ल्यू सी ने बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याचे आदेश केलेले आहेत अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रशांत थोरात यांनी बैठकित दिली. यावेळी उर्वरित १७१३ प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत. ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती मधील अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक व मुख्याध्यापक यांनी गृह चौकशी तात्काळ करण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकांना आदेश द्यावेत, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर

जवाहर नवोदय विद्यालयात ११ वी प्रवेशाची सुवर्णसंधी

यवतमाळ, दि.१५मे.(जिमाका) :- जवाहर नवोदय विद्यालय,बेलोरा, तालुका घाटंजी येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करितासी.बी.एस.ई. अभ्यासक्रम असलेल्या इयात्ता ११ वी तील रिक्त जागांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची प्रवेश परिक्षा शनिवार दिनांक २२ जुलै २०२३ रोजी होणार आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे सुरू झालेले आहे. www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.ऑनलाईन प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ३१ मे आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईच मागविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध आहे. परिक्षेकरिता लागणारी विस्तारीत माहिती नवोदयच्या संकेतस्थळावर व jnvyavatmal@gmail.com ईमेलवर उपलब्ध आहे. तसेच दुरस्ती विंडो (correction window) १व २ जुन २०२३ या दोन दिवसाकरिता उघडणार आहे. पात्रता :- १.विद्यार्थी शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये इयत्ता १० वी यवतमाळ जिल्ह्यातील शासन मान्यता प्राप्त शाळेचाच असावा. ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी इयत्ता १० वी ची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे असे विद्यार्थी परीक्षेकरिता

नागरिकांनो पुढील दहा दिवस उष्णतेचे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

यवतमाळ,दि.१५मे.(जिमाका):-जिल्ह्यात मागील काही दिवसा पासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. पुढील १० दिवस तापमान आणखी वाढ होऊन ते ४५ अंश डिग्री सेल्सियस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. या काळात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे व काय करू नये,याबाबत जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तीव्र उन्हात मुख्यत: दुपारी १२ ते ४ या वेळात घराबाहेर पडणे टाळवे. थोड्या- थोड्या अंतराने पाणी प्यावे, हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावे, घराबाहेर पडताना टोपी,गमछा, दुपट्टा डोके व तोंड झाकण्यासाठी वापरावा, छत्रीचा वापर करावा व सोबत पाणी ठेवावे. मद्य,चहा,कॉफी व कार्बोनेटेड शितपेय पिण्याचे टाळावे. तसेच शिळे अन्न खाणे टाळवे. उन्हात काम करताना चेहरा व डोके पांढ-या कपड्याने झाकावे. चक्कर येत असल्यास व आजारी वाटल्यास लवकरात लवकर डॉक्टराकडे जावे. तत्पूर्वी ओआरएस, लस्सी, ताक, लिंबूपाणी सेवन करावे. घरामध्ये लहान मुलं असल्यास त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे. दुपारी १२ ते ४ या वेळेत मुले बाहेर पडणार नाहीत,याची काळजी घ्यावी. दिवसभर पुरेसे पाणी पीत राहतील याक

खनिज प्रतिष्ठान निधीचा उपयोग शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी या मुलभुत सुविधांसाठी करावा - पालकमंत्री संजय राठोड

जिल्हा खनिज प्रतिष्ठान नियामक परिषदेची बैठक संपन्न यवतमाळ, दि 15 मे :- जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडील निधीचा उपयोग शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ता, महीला व बालकल्याण, दिव्यांग व्यक्तींचे कल्याण या बाबींसाठी प्राधान्याने करण्यात यावा. त्याचबरोबर बाधित क्षेत्रातील गावांना प्राथम्य देण्यात यावे अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्यात. जिल्हा खनिज प्रतिष्ठान नियामक परिषदेची बैठक पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवन येथे झालेल्या या बैठकीला खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, आमदार प्रा. अशोक उइके, आमदार इंद्रनील नाईक, आमदार निलय नाईक, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. शिरीष नाईक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा प्रदीप कोल्हे उपस्थित होते. जिल्ह्यात प्रत्यक्ष खाण बाधित आणि अप्रत्यक्ष खाण बाधित क्षेत्रातील गावांची यादी तयार करण्यात आली आहे. २१४

युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन नेमक्या कोणत्या क्षेत्रात करियर करावे हे ठरवितांना विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक -अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

यवतमाळ,दि.13 मे.(जिमाका): इयत्ता दहावी ,बारावी हा विद्यार्थ्यांसाठी टर्निग पॉईंट असतो. इथुन पुढे त्यांच्या करियरला सुरुवात होते. आज शिक्षणाचे अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत. नेमक्या कोणत्या क्षेत्रात करियर करावे हे ठरवितांना विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आजच्या करियर मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी मिळाली आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपल्या आयुष्याला आकार द्यावा असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे आज छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करियर शिबिराचा शुभारंभ राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी गजानन राजुरकर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,यवतमाळचे प्राचार्य विनोद नागोरे, प्राचार्य औ.प्र.सं दारव्हा आर.यु.राठोड, प्राचार्य औ.प्र.सं.आर्णी सुधीर पाटबाने, प्रकल्प अधिकारी,आश्रम शाळा अंतरगाव उषा त

शहरातील अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश

यवतमाळ दि, 13: अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस शहरातील विविध अपूर्ण विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिलेत. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपविभागिय अधिकारी आणि तहसिलदार समाधान गायकवाड, जिल्हा क्रिडा अधिकारी नंदा खुरपुडे, मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवणे उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 ए या महामार्गाच्या दिग्रस शहरातून जाणाऱ्या मार्गाचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी या बैठकित दिले. या महामार्गांमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात यावे. मानोरा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत महामार्गाचे काँक्रिटीकरण चालू करण्यासही त्यांनी सांगितले. दिग्रस शहरातील टाऊन हॉलचे बांधकामाचा आढावा घेताना टाऊन हॉलचे डिझाईन करून घेण्यात आले तसेच इतर अतिरिक्त बाबींची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरी घेऊन वास्तूविशारद यांच्याकडे पाठपुरावा करावा. मंजुरी प्राप्त दोन्ही ब

प्रदूषणविरहित एस टी बसचे पालकमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण

यवतमाळ,दि.११ मे.(जिमाका):- राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारात दाखल झालेल्या नविन तंत्रज्ञानाच्या बी.एस.६ प्रदुषण विरहीत १० साध्या बसेसचे लोकार्पण आज अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांनी फीत कापून व पूजा करून बसेसचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी बसची पहाणी केली व बस चालवण्याचा आनंदही घेतला. उपस्थित अधिका-याकडून त्यांनी अद्यावत यंत्रणा असलेल्या बसची इत्यंभुत माहिती जाणुन घेतली. अशा आणखी नविन ४० बसेस विभागास प्राप्त करून देण्याकरिता पाठपुरावा करून बसेस मिळवून देण्याचे आश्वाशीत केले. बस स्थानकाच्या स्वच्छतेबाबत व बस स्थानकातील रोड दुरूस्ती करण्याबाबतच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यानी दिल्या. उपस्थित चालक,वाहक यांच्याशी त्यांनी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. यावेळी उपमहाव्यस्थापक श्रीकांत गभणे, यवतमाळ आगर प्रमुख दिप्ती वड्डे, विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, विभाग वाहतूक अधिकारी उमेश इंगळे, कामगार अधिकारी सुनिल मडावी, विभागीय लेखा अधिकारी गणेश शिंदे,वाहतूक निरिक्षक हरीष थोरात तसेच बस

निष्काळजीपणामुळे होणारी जीवित हानी टाळा मान्सुन पूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांचे निर्देश मान्सुनपुर्व उपाययोजनेची कामे मे अखेर पूर्ण करा नियंत्रण कक्षाचे कामकाज 24 तास चालू ठेवावे

यवतमाळ, दि. 11 मे (जिमाका) :- मान्सून कालावधीत वीज पडणे, नदी-नाल्यांना पूर येणे, साथीचे आजार, धरणसाठ्यातून पाण्याचा विसर्ग अशा बाबी हातळण्यातील निष्काळजीपणामुळे होणारी जीवित हानी टाळण्यासाठी नागरिकांमध्ये योग्य माहिती देवून जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. मान्सुन पुर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी आज घेतला. या आढावा बैठकीला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा साथरोग अधिकारी तन्वीर शेख, मुख्याधिकारी डोल्हारकर तसेच दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सिंचन मंडळाचे सर्व कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, सर्व नगरपरिषद मुख्याधिकारी, तहसिलदार, कृषी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी येडगे यांनी याप्रसंगी जिल्ह्यातील पूर प्रवण गावांचे ओळख करणे, मुख्य नद्यांच्या प्रवाहामधील अडथळे काढणे, नैसर्गिक जलाशयांचे साफसफाई करणे व त्यातील गाळ काढणे, नदीकाठावरील बंधारे व साठवण तलावाचे बळकटीकरण व डागडूजी आदि कामे मे महिन्यापुर्वी करण्याचे निर्देश दिलेत. जिल्ह्यातील सर्व

मे अखेरपर्यंत पन्नास टक्के कर्ज वाटप करावे -जिल्हाधिकारी अमोल येडगे

बॅंकर्स जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकित सूचना यवतमाळ, दि ११ मे (जिमाका):- खरीप हंगाम 2023 साठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे. यावर्षी सर्व बँकांना मिळून दोन हजार कोटी रुपयांचा लक्षांक असून आजपर्यंत केवळ एकवीस टक्के कर्ज वाटप झाले आहे. ही रक्कम मागिल वर्षाच्या तुलनेत कमी असून सर्व बँकांनी त्यांना दिलेल्या लक्षांकाच्या ५० टक्के कर्ज वाटप मे अखेरपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवन येथे आज बॅंकर्सची जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी त्यांनी सदर सूचना दिल्यात. या बैठकिला नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक दीपक पेंदाम, लिड बँक मॅनेजर अमर गजभिये, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर ,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, आत्म्याचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे, एस बी आय चे श्रिकांत कोहळे, बॅंक ऑफ बरोदा आर एम सोमकुवर, बॅंक ऑफ ईंडियाचे सचिनचंद्र पाटिदार, वायडीसीसी चे श्री सिद्दिकी तसेच इतर बँकांचे जिल्हा समन्वयक व अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधि

'रक्तदान' हे मानवी सेवा कार्याचा उद्देश साध्य करणारे - जिल्हाधिकारी अमोल येडगे

Image
रेडक्रॉस दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन शिबिरात 231 रक्तदात्यांचे रक्तदान यवतमाळ,दि.८ मे(जि.मा.का):- रेड क्रॉस संस्था ही जगभरात आपत्तीग्रस्त लोकांसाठी कार्य करणारी संस्था असून १५० वर्षापेक्षा जास्त काळापासून मानव सेवेसाठी कार्य करणारी संस्था म्हणून या सोसायटीचा गौरव केला जातो. ८ मे हा जागतिक रेडक्रॉस दिन असून रेड क्रॉस सोसायटीचे संस्थापक ‘हेनरी ड्यूनेट’ यांची जयंती आज रक्तदान करुन साजरा करीत आहोत. उन्हाळ्यामध्ये भासणारा रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी आज केलेले रक्तदान हे ख-या अर्थाने या संस्थेचा मानवी सेवा कार्याचा उद्देश साध्य करणारे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हा प्रशासन व इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज रेड क्रॉस दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी जिल्हाधिकारी यांनी रेड क्रॉस भवन येथे ध्वजारोहण केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी रक्तदान करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी यांनी जागतिक रेड क्रॉस दिनाच्या शुभेच्छा देत मागील वर्षी सुद्धा याच द

*दारव्हा विभागीय कार्यालयाच्या निर्मितीमुळे विभागातील वीज ग्राहकांना मिळतील दर्जेदार सेवा* *-पालकमंत्री संजय राठोड*

Image
यवतमाळ,दि.६ मे :- परिसरातील शेतकरी,घरगुती,वाणिज्यिक,औद्योगिक अशा सर्वच ग्राहकांच्या सोयीसाठी दारव्हा येथे महावितरणच्या नविन विभागीय कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे.स्वतंत्र फिल्टर युनिट,कार्यकारी अभियंतासहीत ३६ नविन अधिकारी, कर्मचारी दारव्हा विभागाला अतीरिक्त मिळाल्याने ग्राहकांना अधिक चांगली वीज सेवा मिळेल असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. गोदावरी नगर,दारव्हा येथे पार पडलेल्या महावितरणच्या नवनिर्मिती विभागीय कार्यालयाच्या उद्धाटनाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी,मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी,अधिक्षक अभियंते सुरेश मडावी,दिपक देवहाते,गटविकास अधिकारी राजीव शिंदे, प्रा.अजय दुबे, राजीव पाटील, वैशाली मसाळ, बबनराव इर्वे, विनोद जाधव,मनोज सिंगी,संतोष चव्हाण,काजी आणि यशवंत पवार उपस्थित होते. यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, दारव्हा,नेर,दिग्रस व आर्णी मिळून नविन विभागीय कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे.नविन विभागाची निर्मिती झाल्याने विभागाला स्वतंत्र फिल्टर युनिट मिळाले आहे. त्यामु

नगरपरिषद, नगरपंचायतमधील अनुकंपा उमेदवारांची प्रतीक्षासूची जाहीर हरकती घेण्यास ८ मे पर्यंत मुदत

यवतमाळ, दि. 3 मे (जिमाका):- यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद , नगरपंचायत मधील गट क व गट-ड संवर्गातील अनुकंपा उमेदवारांची १ जानेवारी २०२३ या दिनांकावर आधारित सन २०२२ या वर्षातील पात्र उमेदवारांची सामाईक प्रारूप प्रतीक्षासूची जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयातील सूचना फलकावर, yavatmal.nic.in या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद /नगरपंचायत कार्यालयाचे सूचना फलकावर आज ३ मे रोजी प्रसिध्दी करण्यात आलेली आहे. सदर गट-क व गट-ड संवर्गातील १ जानेवारी २०२२ ते दिनांक ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीमधील पात्र अनुकंपा उमेदवारांच्या सामाईक प्रारूप प्रतीक्षा सूचीवर ज्या अनुकंपा धारकांना काही हरकती व सूचना दाखल करावयाच्या असतील, त्यांनी संबंधित नगरपरिषद /नगरपंचायत यांच्या मुख्याधिकारी यांचेकडेच संबंधित नगरपरिषद / नगरपंचायत कार्यालय येथे दिनांक ३ मे (बुधवार) ते दिनांक ८ मे २०२३ (सोमवार) रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत पुराव्यासहीत लेखी स्वरुपात सादर कराव्यात. त्यानंतर येणाऱ्या हरकती व सूचना विचारात घेण्यात येणार नाही. कोणत्याही व्यक्तीचे ले

आदिवासींना विविध व्यवसायासाठी अनुदान लाभार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

यवतमाळ,दि.३ मे.(जिमाका):- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येत असलेल्या आदिम जमातींचे कोलाम लाभार्थ्यांसाठी न्युक्लिअस बजेट अंतर्गत विविध योजनेसाठी लाभार्थ्याकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे. कुकुटपालन व्यवसाय : आदिम जमाती (कोलाम) १०० टक्के, सर्वसाधारण ८५ टक्के अनुदान लक्षांक ५०. व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य : आदिम जमाती (कोलाम) १०० टक्के अनुदान लक्षांक ५० तसेच सर्वसाधारण ८५ टक्के अनुदान, लक्षांक १५. शिलाई मशिनसाठी अर्थसहाय: आदिम जमाती (कोलाम) १०० टक्के अनुदान, लक्षांक ५०. अदिवासी महिलांना ८५ टक्के अनुदान, लक्षांक ५० आहे. शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक मोटरपंप,पाईप व अनुषंगिक साहित्य: आदिम जमाती (कोलाम) १०० टक्के अनुदान लक्षांक ३० तसेच सर्वसाधारण ८५ टक्के अनुदान लक्षांक ३० आहे. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह, यवतमाळ,घाटंजी,मारेगांव,राळेगांव,झरी, कळंब व वणी याठिकाणी आहे. वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी अर्ज उपलब्ध आहे यासाठी ३२५ लक्षांक आहे. २० मे पर्यंत लाभार्थ्याकडील भरलेले

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा ४४ शेतक-यांना लाभ

यवतमाळ,दि.३ मे.(जिमाका):- "शासकीय योजनांची जत्रा-सर्वसामान्यांच्या विकासाची यात्रा" हा उपक्रम १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अनुशंगाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अपघात ग्रस्त होऊन मृत्यू झालेल्या ४ शेतकऱ्यांच्या वारसदारांना प्रत्येकी २ लाख रुपये रकमेचे धनादेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते देऊन विमा योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. शासकीय योजनांची जत्रा-सर्वसामान्यांच्या विकासाची यात्रा या उपक्रमाच्या कालावधीत नागरिकांना विविध विभागाच्या योजनाची माहिती पोहोचविणे, प्रस्थापित लाभार्थ्यांची यादी तयार करणे तसेच त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्हास्तरावर व तालुका स्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट या उपक्रमा अंतर्गत ठरविण्यात आलेले आहे. कृषी विभागामार्फत विविध योजना अंतर्गत १३ हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले

शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा शासनाचा प्रयत्न - पालकमंत्री संजय राठोड

महाराष्ट्र दिनाचा 63 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा यवतमाळ, दि.01(जिमाका) : शेती व शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी राज्य शासन नवनवीन योजना राबवत आहे. नमो शेतकरी महा सन्मान योजना, मागेल त्याला फळबाग, पिक विमा 1 रुपयात, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, अशा विविध योजनांच्या माध्यमातून शासन शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. समता मैदान येथे महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनाचे मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड, निवासी उपजिल्हाधिकारी सविता चौधर तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र दिनाच्या आणि अंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या पालकमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस दल व गृहरक्षक दलाच्या पथसंचलनाचे पालकमंत्री यांनी निरिक्षण केले. यावेळी बोलतांना पालक