जवाहर नवोदय विद्यालयात ११ वी प्रवेशाची सुवर्णसंधी

यवतमाळ, दि.१५मे.(जिमाका) :- जवाहर नवोदय विद्यालय,बेलोरा, तालुका घाटंजी येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करितासी.बी.एस.ई. अभ्यासक्रम असलेल्या इयात्ता ११ वी तील रिक्त जागांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची प्रवेश परिक्षा शनिवार दिनांक २२ जुलै २०२३ रोजी होणार आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे सुरू झालेले आहे. www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.ऑनलाईन प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ३१ मे आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईच मागविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध आहे. परिक्षेकरिता लागणारी विस्तारीत माहिती नवोदयच्या संकेतस्थळावर व jnvyavatmal@gmail.com ईमेलवर उपलब्ध आहे. तसेच दुरस्ती विंडो (correction window) १व २ जुन २०२३ या दोन दिवसाकरिता उघडणार आहे. पात्रता :- १.विद्यार्थी शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये इयत्ता १० वी यवतमाळ जिल्ह्यातील शासन मान्यता प्राप्त शाळेचाच असावा. ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी इयत्ता १० वी ची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे असे विद्यार्थी परीक्षेकरिता पात्र नाही. २.विद्यार्थ्यांचा जन्म दिनांक १जून २००६ ते ३१ जुलै २००८ च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. या अटी सर्व प्रवर्गाकरिता लागू आहे. भारतात १० वी शिकलेले व भारतीय राष्ट्रीयत्व असणारे विद्यार्थींच पात्र असतील. असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य के.डी.धोपटे यांनी कळविले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी