दोन कर्तबगार महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामपंचायतस्तरीय पुरस्काराने होणार स्न्मान

यवतमाळ,दि.३०मे.(जीमाका) यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती देश साजरा करीत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन म्हणजे धर्मनिष्ठा,कर्तव्यपरायणता आणि भक्ती व शक्तीचे अद्वितीय उदाहरण आहे.यांच्या जयंतीचे औचित्य साधून या वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर समाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामपंचायतस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतलेला आहे. या पुरस्कारासाठी राज्यातील एकूण २७,८९७ ग्रामपंचायतींमध्ये १,३९,४८५ महिलांनी पुरस्कार मिळणेसाठी अर्ज सादर केले होते. शासन निर्णयानुसार गठीत समितीच्या माध्यमातून छाननी करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सुमारे ५५,७९४ महिलांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ आणि रोख रक्कम रू. ५००/- देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायतस्तरावर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी ३१ मे रोजी त्याचे जन्मगांव श्रीक्षेत्र चौंडी,ता.जामखेड,जि. अहमदनगर येथे राज्याचे मुख्यमंत्री आणि उप-मुख्यमंत्री यांचे उपस्थितीत जयंती सोहळा संपन्न होत आहे.या सोहळ्यात अहमदनगर जिल्हातील १० ग्रामपंचायतींमधील पुरस्कार विजेत्या महिलांचा सन्मान होणार आहे. तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यातील प्रत्येकी १५ ग्रामपंचायतींधील ६० पुरस्कार विजेत्या महिलांचा सन्मान सह्याद्री अतिथीगृह,मलबार हिल,मुंबई येथे दुपारी ३ वाजता संपन्न होत आहे. जिल्ह्यात २४०४ महिलांचा होणार सन्मान जिल्ह्यातही ग्रामपंचायत स्तरावर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या जिल्ह्यातील १२०२ ग्रामपंचायतमधील प्रत्येकी दोन महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी