स्वाधार योजना' जनजागृती शिबीराचे २९ ला आयोजन

दि. २५ मे (जिमाका):- शासनाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विदयार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागु केली आहे. याची जनजागृती करण्यासाठी शिबीराचे आयोजन २९ मे रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, यवतमाळ येथे करण्यात आले आहे. मागासवर्गीय शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी पात्र विद्यार्थी यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास भत्ता, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर सुविधा विद्यार्थ्यांनी स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी राज्य शासनाने स्वाधार योजना सुरु केली आहे. या योजनेची माहिती मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात समाज कल्याण प्रादेशिक आयुक्त सुनिल वारे मार्गदर्शन करणार आहेत. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील इच्छुक विदयार्थ्यांनी शिबीरात उत्स्फुर्तपणे सहभाग घेवून लाभ देण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यवतमाळ यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी