५ ते १७ जुन विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा तांडे, कोलाम पोड, बंजारा वस्त्या, शहरी भागातिल झोपडपट्टी भागात लक्ष केंद्रित करा -जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ

यवतमाळ २९ मे जिमाका:- भारतामध्ये शुन्य ते ५ वर्ष या वयोगटात होणाऱ्या एकूण बालमृत्यूमध्ये अतिसार व निमोनियामुळे होणारे कुपोषण कारणीभूत आहे. आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात अतिसारामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण शून्य टक्केवर आणण्यासाठी धडक अतिसार नियंत्रण पंधरवडा ५ जुन ते १७ जुन या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेत आदिवासी भागातील तांडे, कोलाम पोड, बंजारा वस्त्या तसेच शहरी भागातिल झोपडपट्ट्या आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागापर्यंत ही मोहीम पोहोचवण्याचे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले. अतिसार पंधरवडा यशस्वीरीत्या राबविण्यासाठी आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. चव्हाण, जिल्हा शल्चिकित्सक डॉ आर.डी राठोड,डॉ ठोसर, डॉ मनोज तागडपल्लिवार, डॉ प्रिती दुधे, डॉ स्मिता पेटकर, नितीन ठाकूर, व सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. लसीकरण व आपला दवाखाना याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी ओ. आर. एस. चे द्रावण कसे बनवावे याची माहिती आणि प्रात्यक्षिक प्रत्येक घरापर्यंत आशा मार्फत पोचवावे. त्याचबरोबर शरीर पाणीयुक्त कसे ठेवावे, अतिसारामुळे होणारे दुष्परिणाम, अतिसार कशामुळे होतो आणि त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत सुद्धा पोहोचवावी. बालकांची विशेष काळजी घेण्यात यावी असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात ३४ पैकी १३ ठिकाणी आपला दवाखाना सुरु करण्यात आला असुन उरवरीत ठिकाणी सुरु करण्यासाठी येणा-या अडचणी त्यांनी जाणुन घेतल्या. तसेच सुरु झालेल्या दवाखान्याला मिळणारा प्रतिसाद, येणा-या अडचणी, नागरिकांची मागणी इत्यादीबाबत त्यांनी आढावा घेतला. सोबतच बालकांचे नियमित लसीकरण १०० टक्के करण्यावर भर देण्याच्या सुचना त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना दिल्यात.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी