खरीप हंगाम विशेष पंधरवाडा राबविणार -जिल्हा कृषी अधिकारी

यवतमाळ,दि.२३ मे.(जिमाका):- जिल्ह्यात प्रमुख पिकाचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टिने कृषी संलग्न क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने जिल्ह्यात खरीप हंगाम विशेष पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. मोहीम कालावधी २० मे ते १० जुन पर्यंत आहे. यात सोयाबीनचे घरगुती बियाणे राखून ठेवणे, उत्पादन व वापर, १० जूनपर्यंत बीज प्रक्रिया मोहिम, ३१ मे पर्यंत तर रुंद सरी वरंबा पध्दतीचा वापर, २० मे ते १० जून तसेच दहा वर्षाच्या आतील सुधारीत वाणांचा वापर, १० जून पर्यंत कापूस पिकांबाबत एक गाव,एक वान अभियान, गुलाबी बोंड अळी नियंत्रण कार्यक्रम ऑगस्ट ते सप्टेंबर २०२३ तसेच बोंडसड नियंत्रण सप्टेंबर ते ऑेक्टोबर २०२३,सुक्ष्म सिंचनाव्दारे कापूस पिकांचे लागवडी व्दारे उत्पादन वाढ तंत्रज्ञान २० मे ते १० जून तर १ जून नंतर पेरणी ३१ जुनपर्यंत व जिनिंग मिलवर ल्युर व ट्रॅप लावणे २० मे ते डिसेंबर २०२३, तसेच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कालावधी जून,जुलै,ऑगस्ट २०२३ असा असेल. तूर या पिकांसाठी बीज प्रक्रिया मोहीम २ मे ते ३१ मे तर तूर पिक शेंडा खुडणे ऑगस्ट ते ऑंक्टोबर २०२३ तसेच तूर मर रोग नियंत्रण नोव्हेंबर ते डिसेंबर २०२३ याप्रमाणे पंधरवाडा मोहीम जिल्हयात राबवून खरीप हंगाम यशस्वी करावा,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी