पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे ३१ ला होणार वितरण

यवतमाळ, दि. २3 मे (जिमाका):- महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत/ गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती निमित्य ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार विजेत्याना सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सदर पुरस्काराकरिता पात्रता निकष असे आहे. महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट/ उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या महिला,सदर महिला ह्या त्याच ग्रामपंचायतीतील/ गट ग्रामपंचायतीतील रहिवासी असावी, त्यांचे कार्य हे त्याच ग्रामपंचायती /गटग्रामपंचायती मध्ये केलेले असावे. ह्या क्षेत्रात किमान 3 वर्ष कार्य केलेले असावे, महिलांच्या समस्या व प्रश्नांबाबत जाणीव व संवेदनशीलताअसावी, सामाजिक क्षेत्रात सक्रीय सहभाग असावा, महिला अत्याचारामध्ये समाविष्टनसावी, बालविवाह प्रतिबंध, हुंडा निर्मुलन, लिंग चिकित्सा प्रतिबंध, घरगुती हिंसाप्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य, साक्षरता,मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार या सारख्या कार्यामध्ये उत्सफुर्तपणे पुढाकार घेतलेला असावा. सदर पुरस्कारासाठी इच्छुक महिलेने स्वत:ची वैयक्तीक माहिती व केलेल्या कार्याच्या तपशिलासह संबंधित ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करावयाचा आहे. त्याकरिता अर्जदाराने संबंधित ग्रामपंचायती / गट ग्रामपंचायतीमध्ये संपर्क करावा. अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, श्री. प्रशांत थोरात यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी