युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

यवतमाळ,दि.३० मे.(जिमाका):-आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध विषयांत युवकांनी पार पाडलेल्या भूमिका,दिलेले योगदान यामुळे युवांची एक अद्वितीय ओळख समाजात झालेली आहे. युवकांचा विकास प्रक्रीयेत सहभाग आवश्यक झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण २०१२ नुसार जिल्हास्तरावर ‘एक युवा व एक संस्था’ यांना पुरस्कार देण्यासाठी प्रस्ताव ईच्छुक व्यक्ती व संस्थांकडुन प्रस्ताव मागविण्यात येत आहे. पुरस्काराचे स्वरुप: जिल्हा युवा पुरस्कार जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती तसेच एका नोंदणीकृत संस्थेस देण्यात येतो. सदरचा पुरस्कार गौरव पत्र,सन्मान चिन्ह,रोख रक्कम १० हजार प्रति युवक व युवतीसाठी, तसेच संस्थेसाठी गौरव पत्र,सन्मान चिन्ह,रोख रक्कम ५० हजार रुपये अशा स्वरुपाचा असेल. पात्रतेचे निकष: अर्जदार युवक युवतींचे वय पुरस्कार वर्षातील १ एप्रिल रोजी १३ वर्ष पूर्ण व ३१ मार्च रोजी ३५ वर्ष पर्यंत असावे. जिल्हास्तरावर पुरस्कारासाठी जिल्ह्यात सलग पाच वर्ष वास्तव्य असल्याचा दाखला जोडणे गरजेचे. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागून दिला जाणार नाही, पुरस्कार मरणोत्तर जाहिर करण्यात येणार नाही, केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. (उदा.वृत्तपत्रीय कात्रणे,प्रशस्तीपत्रे,चित्रफिती व फोटो इत्यादी),अर्जदार युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान २ वर्षे क्रीयाशिल कार्यरत रहाणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील,अर्जदार संस्था,सार्वजनिक विश्वस्थ नियम १८६० किंवा मुंबई ॲक्ट १९५० नुसार पंजीबद्ध असावी,अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान ५ वर्ष कार्यरत असणे आवश्यक आहे,अर्जदार संस्थेचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने असावे, एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र रहाणार नाही, संस्थेच्या सदस्यांचा पोलीस विभागाने प्रमाणीत केलेला चारित्र्य दाखला (संबंधीत परिक्षेत्रातील पोलीस स्टेशनचा)देणे आवश्यक राहील. पुरस्कारासाठी मुल्यांकन: युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी गत तीन वर्षाची केलेली कामगीरी विचारात घेण्यात येईल. युवा अथवा नोंदणीकृत संस्थानी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य तसेच राज्याचे साधन संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य,समाजातील दुर्बल घटक,अनुसूचित जाती,जमाती व जनजाती आदिवासी भाग इत्यादी,कार्य,शिक्षण,प्रौढशिक्षण,रोजगार, आरोग्य,पर्यावरण,सांस्कृतीक,कला,क्रीडा, मनोरंजन,विज्ञान तंत्रज्ञान,व्यवसाय,महिला सक्षमीकरण,स्त्रिभृण,व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य,राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य,नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा झोपडपट्टी,आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या,महिला सक्षमीकरण,साहस इत्यादी बाबतचे कार्य, पुरस्कार मुल्यांकनासाठी गरजेचे ठरणार आहे. जिल्हा युवा पुरस्कारासाठी लाभार्थ्याना अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय येथे उपलब्ध आहे. सदर अर्ज २ प्रतीत सिलबंद लीफाफ्यात २८ जून २०२३ पूर्वी अर्ज सादर करावे,सदर पुरस्काराच्या अतिरिक्त माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नेहरु स्टेडीयम,गोधणी रोड,यवतमाळ येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा,असे जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी कळविले आहे

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी